हॅँडबॅगने मिळवा स्टायलिश लुक !!!

​अगोदर हॅँडबॅग फक्त गरजेची वस्तू म्हणून वापरली जायायची.

हॅँडबॅगने मिळवा स्टायलिश लुक !!!
Published: 01 Oct 2016 03:42 PM  Updated: 01 Oct 2016 03:42 PM

अगोदर हॅँडबॅग फक्त गरजेची वस्तू म्हणून वापरली जायायची. मात्र सध्या स्टायलिश लुक मिळण्यासाठी हॅँडबॅगकडे पाहिले जाते. यासाठीच मार्केटमध्ये किंवा फिरायला जाताना महिलावर्गाकडे हॅँडबॅग असणार नाही, हे कदापी शक्य नाही. प्रत्येक महिला कुठेही जायचे असेल तर हॅँडबॅग सोबत घेतेच. कारण त्या बॅगची तशी गरज पडतेच. शिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वाला वेगळेपण मिळत असल्याने महिला आकर्षक व नवनवीन व्हरायटीच्या हॅँडबॅग खरेदी करताना दिसत आहेत. नेमकी हीच निकड ओळखून महिलावर्गाच्या व्यक्तिमत्त्वाला स्टायलिश लुक देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करुन हॅँडबॅग मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आजच्या सदरात कोणत्या प्रकारच्या  हॅँडबॅगमुळे स्टायलिश लुक मिळतो हे ‘सीएनएक्स’च्या माध्यमातून जाणून घेऊया......



१. मध्यम आकाराच्या हॅँडबॅग
फिरायला जायचे असेल, प्रवासाला किंवा आॅफिसला जायचे असेल तर मध्यम आकाराच्या बॅग सर्वात जास्त गरजेची आहे. या बॅगमध्ये आपले कॉस्मेटीक, मोबाईल, पेन, कंगवा, लहान पर्स यांसारख्या गोष्टी सहज ठेवू शकतो. या हॅँडबॅगमुळे सहज आपल्या व्यक्तिमत्त्वात वेगळेपण येत असते. 

२. क्रॉस शोल्डर बॅग
बºयाचदा फिरताना हातात काहीही न पकडता बिनधास्त फिरण्याचा विचार मनात येतो. अशावेळी क्रॉस शोल्डर बॅग हा उत्तम पर्याय आहे, आणि सध्या या बॅगचा विशेष ट्रेंडदेखील सुरु आहे. तरुण मुली मनमोकळे फिरताना याच बॅगचा वापर करताना दिसतात. 

३. टोट बॅग 
ही थोड्या वेगळ्या स्वरुपाची तसेच हॅँडबॅगपेक्षा मोठ्या आकाराची दिसते. त्यामुळे यात बरेच साहित्य मावते. आॅफिसला जाणाºया महिला तसेच कॉलेजीयन तरुणीसाठी ही बॅग उत्तम आहे. 

४. क्लासी क्लच 
के्रडीट कार्ड, विजिटींग कार्ड आणि काही रुपये आरामात ठेवण्यासाठी क्लासी क्लच हा आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. एखाद्या खास कार्यक्रमात तर क्लासी क्लचमुळे आपला स्टायलिश लुक सर्वांना आकर्षक करेलच. हे क्लच मार्केटमध्ये अनेक व्हरायटी आणि आकारात उपलब्ध आहेत. 

५. पोटली बॅग
भारतीय बॅग्ज म्हणून जी बॅग प्रसिद्ध आहे, ती बॅग म्हणजे पोटली बॅग होय. सिल्क, साटन, वेल्वेट आदी प्रकारात पोटली बॅग उपलब्ध असून कोणत्याही समारंभात किंवा पार्टीत या बॅग आपण सहज हाताळू शकतो. 

६. मॅसेंजर बॅग 
बºयाचदा अचानक आपले बाहेर जायायचे ठरते, त्यावेळी मात्र तयारीसाठी फारसा वेळ मिळत नाही. अशावेळी मॅसेंजर बॅग जर आपल्याजवळ असली तर त्यात फटाफट सर्व साहित्य ठेवता येईल. म्हणजे सर्वांकडे ही बॅग असणे आवश्यकच आहे. 

७. स्पोर्टी बॅग 
आपण जर खेळाशी संबंधीत असाल तर आपल्याकडे स्पोर्र्टी बॅग असणे गरजेचे आहे. कारण ही बॅग फिटनेस फ्रिक असण्याचे एक लक्षण समजले जाते. 


मुलांमध्येही साईड बॅगची क्रेझ 
बॅग्ज डिझायनरांनी फक्त मुलींसाठीच अनेक व्हरायटींची निर्मिती केली नसून मुलांसाठीही सध्या बाजारात अनेक प्रकारच्या बॅग उपलब्ध करुन दिल्या आहेत. यात फॅशनेबल साईड बॅग खास मुलांसाठी नवीन डिझाईन्स आणि आकारामध्ये आले आहेत. यामुळे हा मुलांसाठी एक नवा फॅशन ट्रेंड बनलेला आहे. त्यात रकसॅक, कंबरेला बांधायचे साईड पाउच अशा प्रकारचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या बॅगचे वजन कमी असल्याने वापरणे सोयीस्कर ठरते. या बॅगमुळे हातही मोकळे राहतात. सोबतच फॅशनेबल लुकही दिसतो. यामुळे कॉलेजगोईंग तरुणांमध्ये याची क्रेझ सध्या बघायला मिळत आहे. 
फॅशनची ही के्रझ फक्त शाळा-महाविद्यालयातच नव्हे, तर ट्रेकर्स, जिमला जाणाºयांमध्येही अधिक पसंतीची ठरत आहे. यात ट्रेनची किंवा बसची तिकिटे, चोटा डिजीकॅम, टॉर्च, घराची किल्ली, रुमाल किंवा नॅपकीन, मोबाईल, थोडेसे पैसे, एखाद-दोन गोळ्या असे साहित्य सहज बसू शकते. 
एकंदरीत स्टायलिश लुक मिळण्यासाठी सर्वचजण आकर्षक व फॅशनेबल बॅग्जचा वापर करताना दिसत आहेत. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :