स्टायलिश ओव्हरकोटची तरूणींना भुरळ

सध्या बॉलीवूडसह मार्केटमध्ये चर्चा आहे ती म्हणजे स्टायलिश ओव्हरकोटची. कॅटरिना कैफ, आलिया भट्ट आणि पूजा हेगडे यांनी नुकतेच वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये कलरफुल ओव्हरकोट घातले होते. त्यामुळे तरूणींना या कोटची भलतीच भुरळ पडलेली दिसतेय.

स्टायलिश ओव्हरकोटची तरूणींना भुरळ
Published: 28 Aug 2016 06:24 PM  Updated: 28 Aug 2016 06:24 PM

अबोली कुलकर्णी
 फॅशन जगत हे बॉलीवूडमधील नवनवीन ट्रेंडनुसार बदलत असते. ‘बी टाऊन’ चे सेलिब्रिटी जसे कॉस्च्युम घालतात तशाच ड्रेसिंगची मार्केटमध्ये चर्चा असते. एखादा चित्रपट रिलीज झाला की, त्यात हिरो किंवा हिरोईनने केलेली वेशभुषा, हेअरस्टाईल यांना प्रचंड महत्त्व असते. तसेच तरूणपिढी त्या ड्रेसिंगवर लक्ष ठेऊन तसेच व्यक्तिमत्त्व बनवण्यिासाठी प्रयत्न करते. सध्या बॉलीवूडसह मार्केटमध्ये चर्चा आहे ती म्हणजे स्टायलिश ओव्हरकोटची. कॅटरिना कैफ, आलिया भट्ट आणि पूजा हेगडे यांनी नुकतेच वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये कलरफुल ओव्हरकोट घातले होते. त्यामुळे तरूणींना या कोटची भलतीच भुरळ पडलेली दिसतेय. 

* लाईटवेट आणि कलरफुल :
 एखाद्या इव्हेंटला जायचे म्हटले की, पहिला प्रश्न पडतो मी ड्रेस कोणता घालू? मी कोणत्या ड्रेसवर चांगली दिसेल? असे एक ना अनेक प्रश्न तरूणींना पडत असतात. कधी पार्टी तर कधी आऊटींग यावेळी मी  कोणता ड्रेस घातला म्हणजे चांगले दिसेल? असेही वाटत असते. त्यामुळे तरूणींच्या या कायमच्याच अडचणीवर आता लाईटवेट आणि कलरफुल असा ओव्हरकोट हा परफेक्ट आॅप्शन उपलब्ध झाला आहे. याचा फायदा असा आहे की, या ओव्हरकोटच्या प्रकारामुळे आपण घातलेला कोणताही ड्रेस एकदम खुलून दिसतो. तसेच कोटमधील ड्रेस जरी प्लेन असेल तरीही तो वरील कोटला साजेशा दिसतो.
katrina kaif
* लाँग अ‍ॅण्ड कम्फर्टेबल : 
 सध्या लाँग ड्रेसची फॅशन इन आहे. ड्रेसेसमध्ये कराची पॅटर्न, लाँग स्क र्टची सध्या चलती आहे. त्यामुळे लाँग असूनही कम्फर्टेबल असणाऱ्या  ओव्हरकोटला तरूणींकडून मोठी पसंती मिळत आहे. लाँग ओव्हरकोटचा फायदा असा आहे की, कोटच्या आत घातलेला ड्रेस जरी लहान असला तरी ओव्हरकोटमुळे कम्फर्टेबल वाटते. ड्रेसमध्ये आपण कम्फर्टेबल असणं फार गरजेचे असते. त्यामुळे ओव्हरकोट हा आता आपल्याला येत्या काळात एक चांगला आॅप्शन ठरू शकेल, यात काही शंकाच नाही. 
alia bhatt
* वन फॉर आॅल :
 काही तरूणींना मॅचिंग अ‍ॅक्सेसेरीज घालण्याची फार आवड असते. प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग अ‍ॅक्सेसरीज हे अनिवार्य असणे त्यांना गरजेचे वाटते. पण, काहींकडे जर नसेल तर मग अशावेळी ओव्हरकोट हा एक चांगला पर्याय तयार झाला आहे. यावर असलेल्या डिझाईन आणि कलरमुळे ते कोणत्याही ड्रेसवर सुट करू शकते. असे हे ‘वन फॉर आॅल’ ओव्हरकोटची चलती सध्या आहे. सेलिब्रिटींमध्ये या ओव्हरकोट वापरण्याचे प्रमाण वाढले की, लगेचच त्याची डिमांड मार्केटमध्ये सुरू झाली आहे. 
pooja hegde
* ट्रेंडी अ‍ॅण्ड कुल :
 सध्याच्या तरूणाईला एखादी गोष्ट ट्रेंडी असेल तरच आवडते. ट्रेंडी आणि एकदम हटके हवी जी दुसऱ्या  कुणाकडेच नको. वस्तू ट्रेंडी असेल तरच कुल लूक मिळतो, अशी एक मानसिकता सर्वांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे कलरफुल ओव्हरकोट हा अतिशय ट्रेंडी वाटतो. तरूणींना कुल लुक देणारा असा हा ट्रेंडी ओव्हरकोट तरूणींच्या पसंतीस मोठ्या प्रमाणात उतरत आहे. सध्या त्याच्या किंमती प्रचंड महाग आहेत. मात्र, ते सर्वसामान्य तरूणी वापरू लागल्या की मग त्याच्या किंमती नक्कीच ओसरतील, असे वाटतेय.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :