OMG : ​चुकूनही ठेऊ नका विवाहित पुरुषांशी अफेयर, नाही तर?

वेळीच सावरले नाही तर विवाहित पुरुषाचा आपल्या पत्नीशी घटस्पोटही होऊ शकतो. जाणून घेऊया काय नुकसान होते...

OMG : ​चुकूनही ठेऊ नका विवाहित पुरुषांशी अफेयर, नाही तर?
Published: 12 Sep 2017 01:20 PM  Updated: 12 Sep 2017 01:20 PM

कंगना राणौत आणि ह्रतिक रोशन सध्या खूपच चर्चेत आहेत. एका मुलाखतीत कंगनाने आपल्या मनातील गोष्ट सांगितली. कंगनाच्या गोष्टींवरुन समजते की, जेव्हा ह्रतिक आणि सुजैन खान विवाहित होते तेव्हा तिचे ह्रतिकसोबत अफेयर सुरु होते. या दरम्यान ते कधी एक मेकांच्या जवळ आले तर कधी दूर झाले. एकंदरीत तिच्या बोलण्यावरून एक गोष्ट समजते की, विवाहित पुरुषांवर प्रेम केल्याने नुकसानच होते. शिवाय विवाह बाह्य संबंधावर बऱ्याच चित्रपटांच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्यात महिलेचे नुकसान तर होतेच शिवाय ज्या पुरुषांशी अफेयर असते त्याच्याही संसारात समस्या निर्माण होतात. वेळीच सावरले नाही तर विवाहित पुरुषाचा आपल्या पत्नीशी घटस्पोटही होऊ शकतो. 
जाणून घेऊया काय नुकसान होते...

* विवाह बाह्य संबंधात महिलांना सर्वात जास्त खरे-खोटे ऐकावे लागते मग चुक दोघांचीही का असेना. आपल्या प्रेमीच्या चुकांची शिक्षा आपणासच भोगाव्या लागतात.  

* विवाहित असताना बरेच पुरुष विवाह बाह्य संबंध प्रस्थापित करतात, मात्र काहीच पुरुष असे असतात जे आपल्या प्रेमिकेसाठी आपल्या पत्नीला सोडतात. बहुतांश पुरुष आपल्या विवाहित आयुष्य बोअर वाटू लागल्याने विवाह बाह्य संबंध निर्माण करतात. ते दुसऱ्या महिलांकडे आकर्षित होऊ लागतात, मात्र आपल्या पत्नीलादेखील अधिक महत्त्व देतात.  

* जो व्यक्ती विवाहित असून आपल्या सोबत रिलेशनमध्ये आहे तर तो कधीही सत्य असू शकत नाही. एक गोष्ट लक्षात असू द्या की, उद्या जर त्याला एखादी मुलगी पसंत पडली तर तो तिच्यासाठी आपणास सोडू शकतो.  
 
* जर आपले रिलेशन इतरांसमोर आले तर लोक तुम्हालाच बरे-वाईट बोलतील की, समोरचा व्यक्ती विवाहित आहे, तरी तुम्हाला त्यांच्या सुखी संसारात पडण्याची काय गरज होती. शिवाय आपणास अपमानास्पद वागणूक मिळेल. यासाठी आपण आपले अफेयर पुढे सुरु ठेवण्यापूर्वी नक्कीच विचार करावा.    

एकंदरीत दोघांचे नुकसान होऊ नये म्हणून विवाहित पुरुषाशी अफेयर करणे टाळावे.  

Also Read : ​Relation : ​पार्टनर प्रामाणिक आहे की नाही, कसे ओळखाल?
                    : केवळ हृतिक रोशनचं नाही तर या अनेकांशी झालेयं कंगना राणौतचे भांडण!


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :