Relationship : ​‘या’ कारणांनी पार्टनर होऊ शकतो नाराज !

अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपला पार्टनर नाराज होऊ शकतो. जाणून घ्या कोणती आहेत ती कारणे !

Relationship : ​‘या’ कारणांनी पार्टनर होऊ शकतो  नाराज !
Published: 13 Jul 2017 02:54 PM  Updated: 13 Jul 2017 03:27 PM

बऱ्याचदा आपण काही गोष्टी कमविण्याच्या प्रयत्नात आनंदाचे आणि महत्त्वाचे क्षण गमवून बसतो. विशेषत: अति पैसा कमविण्याचा हव्यास, त्यामुळे निर्माण झालेली स्पर्धा, जबाबदाऱ्या यांच्या नादात आपले आपल्या जवळच्या व्यक्तींकडे दुर्लक्ष होते. शिवाय पार्टनरला पुरेसा वेळ देऊ न शकल्यामुळे आयुष्यातील रोमान्स कमी होतो आणि पार्टनर नाराज होतो. याव्यतिरिक्तही अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपला पार्टनर नाराज होतो. 

* लवकर यश मिळवण्याच्या नादात अनेकजण ८ तासांऐवजी अधिक वेळ काम करतात. यामुळे ते घरी वेळ देऊ शकत नाही. 

* शिक्षण व करिअरमध्ये असलेली अती महत्वाकांक्षा पुरुषांना बेचैन करते. सगळ्यांच्या पुढे जाण्याच्या शर्यतीत ते अनेक गोष्टी गमावतात. 

* पुरुषांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी दिवसेंदिवस बिघडत असल्यामुळे त्यांची शारिरीक शक्ती कमी होते. 

* सतत पॉर्न फिल्म पाहणाऱ्या व्यक्तीचे मन नेहमी वासनेने भरलेले असते. त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यातील संबंधांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्याला आपल्या जोडीदाराच्या सहवासाने फारसे समाधान मिळत नाही. 

* व्यसनांमुळे हजारो लोकांचे कौंटुंबिक जीवन उद्धवस्त झाले आहे. या सवयींमुळे स्पर्म काऊंट कमी होतो. 

* तणावामुळे व्यक्ती दुर्बळ बनते. मन तणावाने भरलेले असेल तर व्यक्ती कोणतीच गोष्ट मनापासून व आनंदाने करू शकत नाही. 

* सध्या उपलब्ध असलेल्या टीव्ही, मोबाईल अशा उपकरणांमुळे घरातील संवाद कमी होत आहे. त्यामुळे आपल्या जोडीदाराशी जी जवळीक निर्माण व्हायला हवी ती अनेक जोडप्यांमध्ये होत नाही. 

Also Read : ​Relationship : मुलींनो, त्याचा लग्नास नकार कसे ओळखाल?
                   : ​Relationship : त्याचे मन जिंकण्यासाठी काय कराल?


कपिल शर्माचा छोट्या पडद्यावरील कमबॅक हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :