OMG : ​लग्नाच्या बाबतीत प्रत्येक अविवाहित मुलगी या ‘१०’ गोष्टींचा करते विचार !

आपणास माहित आहे का, की तिच्या मनात लग्नाच्या बाबतीत कोणकोणते विचार येतात? जाणून घेऊया काय विचार करते ती...

OMG : ​लग्नाच्या बाबतीत प्रत्येक अविवाहित मुलगी या ‘१०’ गोष्टींचा करते विचार !
Published: 14 Sep 2017 01:15 PM  Updated: 14 Sep 2017 01:22 PM

असे म्हणतात की, अविवाहित मुलगी टेंशन फ्री असते, ती एकदम बिंधास्त जगते, फिरते आणि आपले आयुष्य एन्जॉय करीत असते. मात्र आपणास माहित आहे का, की तिच्या मनात लग्नाच्या बाबतीत कोणकोणते विचार येतात? ती एखाद्या लग्न सोहळ्यात किंवा पार्टीमध्ये गेल्यानंतर काय विचार करते? 
प्रत्येक मुलीचे एक स्वप्न असते की, तिचा जोडीदार कसा असावा, त्याचा स्वभाव, त्याचे दिसणे, त्याची वागणूक कशी असावी? एकंदरीत तिचा स्वप्नाचा राजकुमार चारचौघात हटके दिसावा असे ती स्वप्न पाहत असते. यावरुनच तिच्या मनात वेगवेगळे विचार येत असतात, आज आम्ही आपणास अशाच काही गोष्टींच्या बाबतीत सांगणार आहोत, ज्याच्या बाबतीत प्रत्येक सिंगल मुलगी विचार करीत असते. जाणून घेऊया काय विचार करते ती. 

* ती स्वत:लाच प्रश्न विचारते की, मला लग्नासाठी एक चांगला मुलगा कुठे मिळेल?
 
* ओह! नवरदेवाचा भाऊ खूपच स्मार्ट आहे, मी प्रयत्न करायला हवा का? मात्र त्याचीही गर्लफ्रेंड असू शकते.  

* का माझ्या समोर सर्वजण लग्न-लग्न करीत असतात, का मी म्हातारी झाली का?  

* ओह गॉड! मम्मी-पप्पा या लग्नात माझे लग्न तर निश्चित करणार नाहीत ना? 

* नवरीवर रेड कलर खूपच सूट करीत आहे, मी देखील माझ्या लग्नात रेडच परिधान करेल. तसा माझ्यावर गोल्डनदेखील खूप चांगला वाटतो.  

* मी या पार्टीत खूपच सुंदर दिसायला हवे, कारण सर्वांनी मला नोटीस करायला हवे.  

* किती खर्च केला आहे लग्नावर, खूप श्रीमंत असतील. कोण एका दिवसाच्या लग्नासाठी एवढा खर्च आणि मेहनत करेल.  

* नवरदेव, नवरीपेक्षा कमी सुंदर आहे. माझादेखील असाच असावा. मात्र यापेक्षा अधिक सुंदर असेल तरी चालेल.

* तो मुलगा माझ्याकडे खूपच पाहत आहे, तसा दिसायला खूपच सुंदर आहे.   

* मला नाही करायचं लग्न, मी सिंगलच ठिक आहे.   
  


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :