Health : ​गरोदरपणात अवश्य करावित ही ‘५’ योगासने !

त्या समस्यांपासून आराम, डिलिवरीमध्ये सहजता आणि बाळाचा विकास योग्यप्रकारे होण्यासाठी करा ही पाच योगासने...

Health : ​गरोदरपणात अवश्य करावित ही ‘५’ योगासने  !
Published: 06 Jul 2017 11:58 AM  Updated: 06 Jul 2017 12:01 PM

-रवींद्र मोरे 
गरोदरपणात महिलांनी काही ठराविक योगासने केल्यास त्यांना फक्त त्या समस्यांपासून आरामच मिळत नाही तर डिलिवरीमध्येही सहजता येऊ शकते आणि बाळाचाही विकास योग्यप्रकारे होतो. यासाठीच बहुतेक अभिनेत्र्या गरोदरपणात योगाचा आधार घेतात. 
गरोदरपणात महिलांच्या शरीरात बरेच हार्मोनल बदल घडत असतात. शरीरात वेदना आणि मूड स्विंगची समस्या सामान्य असते, मात्र जर महिलांनी गरोदरपणात योगासन केले तर बऱ्याच समस्या दूर होतात. 
यासाठी मात्र सर्वच योगासन न करता काही ठराविकच योगासन करायला हवीत. तज्ज्ञांच्या मते, आई होणाऱ्या महिलांसाठी हे पाच योगासन फायदेशीर आहेत.  

Image result for यस्तिकासन

* यस्तिकासन
शरीराचा तणाव कमी करण्यासाठी हे आसन सर्वश्रेष्ठ मानले जाते. यामुळे संपूर्ण शरीराला पूर्णत: स्ट्रेच करण्यासाठीही मदत मिळते.  * कोनासना
या आसनाने आपणास कंबरेच्या वेदनेपासून मुक्तता मिळते, सोबतच डिलिवरीनंतर चरबी कमी होण्यास मदत होते. या योगामुळे कंबर लवचिक होईल ज्यामुळे प्रसुतीदरम्यान वेदना जास्त होणार नाहीत. मात्र प्रेग्नन्सीच्या सात महिन्यानंतर हा योगाप्रकार बंद करावा. 

Related image

* पर्वतासन
गरोदरपणात या आसनाचा खूप फायदा होत असतो. शिवाय जास्त बैठे काम करणाऱ्यांसाठी किंवा ज्यांच्या पाठीच्या कण्यात समस्या आहे, अशांनाही हे आसन फायदेशीर ठरते. यामुळे खांदेदुखीवरदेखील आराम मिळतो. * भद्रासन
या आसनाला सामान्य भाषेत फुलपाखरु आसन म्हणतात. संपूर्ण शरीराचा भार उठविणाऱ्या पायांवर गरोदरपणात दबाव वाढतो. यासाठी हे आसन करण्याचा सल्ला दिला जातो. 

Related image

* वक्रासन
वक्रासन केल्यास यकृत, किडनी, पॅनक्रियाजवर सकारात्मक परिणाम होतो. सोबतच स्पायनल कॉर्डदेखील मजबूत होतो. 

* महिलांनी गरोदरपणात कोणताही व्यायाम किंवा योगाभ्यास करताना विशेषतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.  

Also Read : ​HEALTH : ​बाळंतपणानंतरच्या "या" गोष्टी जाणून व्हाल चकित !
                    : HEALTH : म्हणून प्रेग्नन्सीदरम्यान प्यावे जिऱ्याचे पाणी !


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :