HEALTH : ​दिवसभर एनर्जेटिक राहायचे असेल तर करा हे बदल !

आपण आपल्या वाईट सवयी बदलून आणि डायटमध्ये काही खाद्यपदार्थांचा समावेश करुन एनर्जी लेवल वाढवू शकता आणि आपणही दिवसभर सेलेब्ससारखे ऊर्जावान राहू शकता. जाणून घ्या सविस्तर...!

HEALTH : ​दिवसभर एनर्जेटिक राहायचे असेल तर करा हे बदल !
Published: 19 Sep 2017 04:43 PM  Updated: 19 Sep 2017 04:43 PM

सेलिब्रिटींच्या लाइफस्टाइलचा विचार केला तर  दिवसभर शुटिंगसाठी इकडे-तिकडे धावपळ, कामाचा ताण, त्यातच स्वत:साठी आणि फॅमिलीसाठी वेळ आदी सर्व गोष्टी फॉलो करणे म्हणजे तारेवरची कसरतच. एवढ्या गोष्टी सांभाळण्यासाठी ते एनर्जेटिक असायला हवेच, आणि ते असतातही. कारण त्यांचे लाइफस्टाइल सर्वसामान्यांसारखे नसून थोडे वेगळे असते म्हणून ते नेहमी एनर्जेटिक असतात. 

धावपळीच्या मॉडर्न लाइफस्टाइलमध्ये बहुतांश लोक योग्य डायट फॉलो करु शकत नाही आणि वेळेवर जेवण होत नसल्याने आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात. शिवाय शरीरास योग्य पोषण मिळत नसल्याने शरीराच्या फिटनेसवर प्रतिकुल परिणाम होतो आणि आपली एनर्जी लेव्हल घटू लागते, ज्यामुळे कामदेखील व्यवस्थित होत नाही. अशा स्थितीत आपण आपल्या वाईट सवयी बदलून आणि डायटमध्ये काही खाद्यपदार्थांचा समावेश करुन एनर्जी लेवल वाढवू शकता आणि आपणही दिवसभर सेलेब्ससारखे ऊर्जावान राहू शकता.   

अ‍ॅनर्जेटिक राहण्यासाठी काय कराल?
* दिवसभर अ‍ॅक्टिव्ह राहायचे असेल तर ब्रेकफास्ट करणे कधीही टाळू नका. सकाळी ब्रेकफास्ट करणे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे त्याला प्राधान्य द्यावे. ब्रेकफास्टमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त सेवन केल्यास दिवसभर एनर्जी लेव्हल उच्च राहील. प्रोटीनसोबतच विटॅमिन आणि मिनरल्सवरदेखील भर द्यावा. ज्यामुळे दिवसभर आपल्या शरीरास भरपूर प्रमाणात एनर्जी मिळू शकते.  

* दिवसभर एनर्जेटिक राहायचे असेल तर बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळा. आपण कामानिमित्त बाहेर पडत असाल तर बाहेरच्या खाण्याचे असंख्य पर्याय उपलब्ध असतात, मात्र सोबत घरचेच खाद्यपदार्थ असावेत आणि त्यांचेच सेवन करावे. यामुळे आपल्या पैशांची तर बचत होईल शिवाय घराचे हेल्दी जेवणही मिळेल आणि आपला अन्य आजारांपासून बचाव होईल.      

* कामानिमित्त बाहेर जात असाल तर सोबत पाण्याची बॉटल असावी. शरीर डिहायड्रेड होऊ नये म्हणून दर दोन तासांनी किमान एक ग्लास पाणी सेवन करावे. यामुळे दुपारीदेखील एनर्जी लेव्हल टिकून राहते.  

* जंक फुडच्या सेवनाने लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे आजार उद्भवू शकतात, त्यामुळे आपली एनर्जी लेव्हल घटते. यासाठी जंक फूड सेवन करणे टाळावे.  

 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :