Health Alert : ​त्वचेवर 'ही' लक्षणे आढळल्यास समजावा आहे "लैंगिक आजार" !

आपल्या शरीरावरील त्वचेवर पुळ्या येणे, खाज सुटणे, त्वचा लाल होणे आदी लक्षणे सहज घेऊ नका, असू शकतो लैंगिक आजार. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा...

Health Alert : ​त्वचेवर 'ही' लक्षणे आढळल्यास समजावा आहे "लैंगिक आजार" !
Published: 21 Apr 2017 01:17 PM  Updated: 21 Apr 2017 01:23 PM

-Ravindra More
लैंगिक आजाराविषयी आपण फक्त ऐकत असतो, मात्र याविषयी आपणास सर्व माहिती असणे आवश्यक आहे. लैंगिक आजारांनाच सेक्शूली ट्रान्समिटेड डिसिस म्हणजेच एसटीडी म्हटले जाते. लैंगिक आजारामध्ये विशेषत: कोणतेही लक्षण लगेच दिसून येत नाही. हा विकार वाढल्यावर त्याची लक्षणे दिसू लागतात. एसटीडी मध्ये निरनिराळे प्रकार आहेत. हे आजार संक्रमित व्यक्तीसोबत सेक्स संबंध आल्यास पसरतात. या विकारांचे संक्रमण झाल्यास त्या व्यक्तीच्या त्वचेमध्ये देखील अनेक बदल दिसून येतात. आज आम्ही अशीच काही लक्षणांची माहिती देत आहोत जे लैंगिक आजारांमध्ये त्वचेवर आढळतात.

* फोड अथवा जखम होणे
Herpes virus infection  अथवा नागीण हा आजार असल्यास जननेंद्रिये व गुद्दवाराच्या मुखाकडील भागावर छोटे पाणीदार फोड येतात. हे फोड खूप संवेदनशील असून लगेच फुटू शकतात. ओठांवर देखील लहान फोड येणे हे Herpes virus infection चे एक लक्षण आहे. जननेंद्रिय, गुदाशय, तोंड अथवा ओठ अशा इनफेक्शन झालेल्या भागाला वेदनारहित छोटे फोड येणे ‘सिफलीस’ या विकाराचे एक प्रमुख लक्षण आहे. दहा दिवसांनंतर हे फोड लालसर झाल्यास व शरीरावर पेनी-साईज रॅशेस आल्यास हे सिफलीस या विकाराचे दुसऱ्या टप्यातील लक्षण असू शकते.
गुप्तांगाला वेदना व फोड हे Chancroid चे लक्षण आहे. एका दिवसामध्ये त्याचे रुपांतर पिवळसर राखाडी रंगाच्या अल्सरमध्ये होते.

* त्वचा लालसर होणे व खाज येणे
लैंगिक आजारादरम्यान येणाऱ्या बुरशीमुळे त्वचा लालसर होते व मांड्यांजवळच्या भागावर खाज सुटते. तसेच यीस्ट संक्रमणामध्येही व्हरजायनामध्ये आणि पेनिसमध्ये खाज येते. शिवाय खरुज (Scabies) झाल्यास रात्रीच्या वेळी अधिक खाज येते. ट्रायकोमोनास या परजीवी इनफेक्शन मध्ये देखील गुप्तांगाला खाज, जळजळ, लालसरपणा व वेदना होतात. ‘सिफलीस’ या विकाराच्या दुसऱ्या टप्प्यात योनीमार्ग व गुद्दवाराच्या मुखाच्या भागाला लाल किंवा तपकिरी रॅशेस येतात. त्याचप्रमाणे हे रॅशेस हात व पायाच्या तळव्यांना देखील येतात. नागिण मध्ये देखील प्रथम त्वचेला दाह होतो व मुंग्या येतात. 

* त्वचा व डोळे पिवळसर होणे
हिपॅटायटीस इनफेक्शन झाल्यास त्वचा व डोळे पिवळसर होतात. 

* अल्सर
अल्सर दोन प्रकारचा असून पहिला जेनीटल अल्सर वेदना रहित असतो ज्यात मांड्याच्या सांध्या कडील भागात 
Granuloma inguinale येतात. तर दुसरा अल्सर वेदनायुक्त असून Chancroid मध्ये असतो.

* चामखीळ अथवा Warts
संक्रमण झालेल्या त्वचेचा जवळून संबध आल्यास एचपीव्ही विकार होतो ज्यामुळे जनेनद्रियांना चामखीळे अथवा Warts येतात.या संक्रमणामुळे जनेनद्रिंयाला लहानलहान त्वचेच्या रंगाचे चामखीळ अथवा काळपट सूज येते. या विकाराच्या संक्रमित व्यक्तीसह ओरल सेक्स केल्यास त्यामुळे तोंड अथवा घश्यामध्ये देखील हे संक्रमण होते. काही जणांमध्ये या चामखीळांचा आकार मोठा असू शकतो.

* लहान पुळ्या येणे
Molluscum contagiosum अथवा नागीण इनफेक्शन मध्ये देखील जननेद्रिंयावर लहान लहान पुळ्या येतात.  शिवाय Herpes  infection मध्ये त्वचेवर अगदी लहान आकाराच्या पुळ्या येतात.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :