​जॉनी लिव्हरच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार !

या आजारातून बाहेर पडण्यासाठी जेसे लिव्हरला शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर १२ वीनंतर शिक्षण सोडावे लागले.

​जॉनी लिव्हरच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार !
Published: 13 Jul 2017 11:13 AM  Updated: 13 Jul 2017 11:15 AM

बॉलिवूडचा कॉमेडियन जॉनी लिव्हरला आपण ओळखतोच. कोणत्याही चित्रपटात जॉनीने आपल्या दर्शकांना हसवून लोटपोट केले आहे. जॉनीने आपल्या अभिनयातून चित्रपटसृष्टीत ठसा उमटविला असून त्याचा मुलगा जेसे लिव्हरदेखील बॉलिवूडमध्ये डेब्यूच्या तयारीत आहे. 
जेसे आता २७ वर्षाचा झाला असून त्याला चित्रपटाच्या आॅफर यायला सुरुवात झाली आहे. मात्र तो चांगल्या भूमिकेची वाट पाहत आहे. जोपर्यंत चांगला रोल मिळत नाही, तोपर्यंत चित्रपटसृष्टीपासून लांबच राहणार आहे, असे जेसेचे म्हणणे आहे. जेसेला लहाणपणीच एका गंभीर आजाराचे लक्षणे जाणवायला लागले होते. वयाच्या १२ व्या वर्षी जेसेला गळ्यात ट्यूमर झाला होता. हा ट्युमर एवढा वाढला की त्याने कँसरचे रूप घेतले. अनेक वर्षे परदेशांत उपचारानंतर कँसरशी सामना करत जेसे ठीक झाला.  
विशेष म्हणजे या आजारातून बाहेर पडण्यासाठी जेसेला शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर १२ वीनंतर शिक्षण सोडावे लागले. बहिणीचे करिअर पाहून आणि वडिलांनी समजावल्यानंतर त्याने पुन्हा शिक्षण सुरू केले आणि लंडनमध्ये ह्युमन रिसोर्सेसमध्ये पदवी घेतली. जेसेने वडिलांप्रमाणे कॉमेडीत प्रयत्न केले नाही. सुरुवातीपासून तो म्युझिकवर लक्ष देत आहे. जेसे उत्कृष्ट म्युझिशियन असून तो ड्रम वाजवतो. जेसेचा एक म्युझिकल ग्रुपही आहे. त्यांच्याबरोबर जेसेने अनेक शो केले आहेत. त्याच्यासाठी कॉमेडी नव्हे तर म्युझिक हे करिअर आहे.जेसेने करिअरबरोबरच फिटनेसकडेही विशेष लक्ष दिले आहे. जेसे नेहमी त्याच्या ६ पॅक अ‍ॅब्समुळे  सोशल मीडियात चर्चेत राहतो. सोशल मीडियावर तो नेहमी अ‍ॅब्स फ्लॉन्ट करत फोटो पोस्ट करत असतो. जेसे उत्कृष्ट मिमिक्री आर्टिस्टही आहे. त्याला वडिलांकडून हा वारसा मिळाला आहे. त्याने स्टँडअप कॉमेडियन म्हणून अनेक शो केले पण यश मिळाले नाही. पण इमोशनल रोल्समध्ये त्याला पुरस्कार मिळाले. त्यामुळे त्याने कॉमेडी सोडून अ‍ॅक्टींगकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.  Also Read : ​​सबसे बडा कलाकारमध्ये जॉनी लिव्हर आणि मुलगी जॅमी लिव्हर यांची जुगलबंदी


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :