HEALTH : व्यस्त जीवनशैलीतही फिट राहण्यासाठी असे करा नियोजन !

योग्य नियोजन केल्यास आणि काही बदल स्वीकारण्याची तयारी असल्यास व्यस्त जीवनशैलीतही आपण आपले आरोग्य निरोगी ठेवून फिट राहू शकता.

HEALTH : व्यस्त जीवनशैलीतही फिट राहण्यासाठी असे करा नियोजन !
Published: 18 Apr 2017 04:30 PM  Updated: 18 Apr 2017 04:30 PM

-Ravindra More
सध्या प्रत्येकाचे जीवन खूपच धावपळीचे झाले आहे. आॅफिसातील काम, मीटिंग, डेडलाईन्स, डायनिंग आऊट, लेट नाईट किंवा अर्ली मॉर्निंग शिफ्ट यामुळे प्रत्येकाला दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे नकळत आपल्या आरोग्याचे तंत्र तर बिघडणारच. मात्र योग्य नियोजन केल्यास आणि काही बदल स्वीकारण्याची तयारी असल्यास व्यस्त जीवनशैलीतही आपण आपले आरोग्य निरोगी ठेवून फिट राहू शकता. 

काय उपाय कराल?
* पाणी चवदार करा
पाण्यात पुदीन्याची पाने किंवा लिंबूचा रस मिक्स करु न पाण्याची चव बदलवा. यामुळे पाण्याची चवच सुधारणार नाही तर आळस व मनाची मरगळही दूर होईल आणि तुम्ही फ्रेश व्हाल. 

* श्वासासंबंधी क्रिया करा
हळूहळू श्वास घेऊन मनातल्या मनात वीसपर्यंत आकडे मोजा. श्वास बाहेर सोडा आणि असे पुन्हा-पुन्हा करा. मन आणि शरीर स्थिर झाले आहे असे वाटेपर्यंत हा क्रम सुरू ठेवा. 

* हेल्दी किट जवळ ठेवा
जसे आपण मेकअप किट कधीही विसरत नाही त्याप्रमाणे हेल्दी किटदेखील जवळ बाळगा. या किटमध्ये मसाज बॉल, प्रोटीन बार, डार्क चॉकलेट, नट्स, फळे व ज्यूस अशा गोष्टींचा समावेश असायला हवा. 

* कॉफी नकार देऊ नका
कॉफी आरोग्यासाठी चांगली नाही असे म्हटले जाते. परंतु योग्य प्रमाणात घेतलेले कॅफिन शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे एखादेवेळी घेतलेली कॉफी उत्साहवर्धक ठरते. 

* आॅफिसमध्ये जेवणाचा टिफीन असावाच
जेवणाच्या वेळेत बदल होऊ नये म्हणून आॅफिसात जाताना जेवणाचा टिफीन सोबत ठेवा. यामुळे तुम्ही आपले वजन नियंत्रित ठेवू शकता. हळूहळू ही एक सवय बनेल. 

* फिटनेसला प्राधान्य द्या 
तुमच्या महत्वाच्या गोष्टींच्या यादीत आरोग्य अग्रस्थानी असायला हवे. असे केले नाही तर तुम्ही इतर कामे उत्तम रितीने पार पाडू शकणार नाही. म्हणून वर्क आऊट करणे आवडत असेल तर काहीही करून ते सोडू नका. 


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :