Health : ​भिजवलेले बदाम सेवन करण्याचे हे फायदे माहित आहेत का?

रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी सेवन केल्यास त्याचे अधिक फायदे मिळत असल्याचे संशोधनात आढळले आहे. जाणून घेऊया भिजवलेल्या बदामांचे आरोग्यदायी फायदे.

Health : ​भिजवलेले बदाम सेवन करण्याचे हे फायदे माहित आहेत का?
Published: 31 Aug 2017 12:19 PM  Updated: 31 Aug 2017 12:19 PM

बदामाचे अनेक आरोग्यदायी फायदे पाहता प्रत्येक सेलिब्रिटी त्याचे सेवन नियमित करीत असतात. मात्र रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी सेवन केल्यास त्याचे अधिक फायदे मिळत असल्याचे संशोधनात आढळले आहे. जाणून घेऊया भिजवलेल्या बदामांचे आरोग्यदायी फायदे.
भिजवलेल्या बदामात व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने हे बदाम सेवन केल्यास स्मरणशक्ती तल्लख राहते. शिवाय आरोग्य निरोगी राहण्यासही मदत होते. पण हे सारे गुणधर्म शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून  घेण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात भिजवणे फार गरजेचे आहे. बदामाच्या सालींमध्ये असणाऱ्या काही एन्जाईम्समुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच त्यांना रात्रभर भिजत ठेवा. यामुळे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला बदामांतून अधिकाधिक पोषणता मिळण्यास मदत होते.
भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे

 * हृदयाच्या समस्या दूर हेतात
जर्नल आॅफ न्युट्रीशनच्या अहवालानुआर बदामातील अ‍ॅन्टीआॅक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृदयविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा. 

*  गर्भाच्या वाढीसाठी आरोग्यदायी 
गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्यासोबतच गर्भाच्या वाढीसाठीदेखील फार आरोग्यदायी आहेत. बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ  करण्यास मदत करतात. भिजवलेले बदाम मऊ असल्याने गरोदर स्त्रियांना सहज पचायला शक्य असतात.  

* रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवते 
रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. ‘जर्नल आॅफ फ्री रॅडीकल रिसर्च’ यांच्यानुसार बदामातील  ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. असे देखील या संशोधनातून पुढे आले आहे. विशेषत: ३० ते ७० वयोगटातील पुरूंषांमध्ये हा फरक प्रामुख्याने आढळून आला. 

* पचनशक्ती सुधारण्यास मदत होते
‘जर्नल आॅफ फूड सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार कच्चे व भिजवलेले बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते. कारण भिजवलेल्या  बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.




कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :