​चला ‘इकोफ्रेंडली’ जगूया!!!

सध्या पावसाळा संपल्यामुळे पहाटे गुलाबी थंडी आणि दुपारी उन्हाच्या झळा बसायला लागल्या आहेत.

​चला ‘इकोफ्रेंडली’ जगूया!!!
Published: 18 Oct 2016 10:03 PM  Updated: 18 Oct 2016 04:34 PM


सध्या पावसाळा संपल्यामुळे पहाटे गुलाबी थंडी आणि दुपारी उन्हाच्या झळा बसायला लागल्या आहेत. बºयाचजणांना उन्हाचा त्रास होत असल्याने काहीअंशी निसर्गावर नाराजीही व्यक्त करतात. मात्र असे न करता या उन्हापासून मिळणाºया ऊर्जेचा सकारात्मक उपयोेग करुन घेणे महत्त्वाचे आहे. भारतात मोठ्या प्रमाणात सौर उर्जा उपलब्ध असून याद्वारे आपल्याला रोज लागणारी विविध गॅजेट्स, वस्तू कार्यान्वित करु शकतो. आजच्या सदरात आपण सौर ऊर्जेचा वापर करुन ’इको फ्रेंडली’ कसे जगू शकतो याबाबत जाणून घेऊया...

मोबाईल चार्जर : 
आजच्या टेक्नोसॅव्ही युगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने त्यासोबत असलेला चार्जर हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. कारण विना चार्ज असलेला मोबाईल काहीच कामाचा नसतो. तसेच सततच्या वापरामुळे नेहमी उतरणारी बॅटरी ही सध्या यूजर्ससमोरची समस्या झाली आहे. आता मोबाईलची बॅटरी सौरऊर्जेच्या माध्यमाने चार्ज होणे शक्य झाले आहे. सायबेरियातील एका कंपनीने जगातील पहिला सोलर चार्जर बाजारात आणला असून, याद्वारे तीन तासांत तुमचा फोन चार्ज होतो.

बॅकपॅक:
प्रवासादरम्यान आपल्या जवळची गॅजेट्स चार्ज करण्यासाठी हॅण्डबॅगपासून मोठ्या सॅकपर्यंत विविध प्रकार बाजारात आहेत. या बॅगेच्या साह्याने आपण स्मार्टफोन, लॅपटॉप, पॉवर बँक चार्ज करु शकतो. या बॅकपॅकवर बसविलेल्या सोलर फिल्ममुळे सूर्य प्रकाशाचे रूपांतर ऊर्जेत करतो. अमेरिकेच्या लष्कराने हे बॅकपॅक प्रथम विकसित केले. याद्वारे लॅपटॉप पूर्ण चार्ज केल्यानंतर तीन तास व इमर्जन्सी लाइट तास कार्यान्वित राहतात.

किंडल कव्हर :
बदलत्या काळानुसार वाचन संस्कृतीदेखील बदलत चालली आहे. लॅपटॉप, स्मार्टफोनवर वाचन करणारे आता किंडलवर तासनतास वाचन करु लागले आहे. मात्र किंडलवर रात्री वाचन करताना येणाºया अडचणी लक्षात घेता त्याच्या कव्हरवर दिव्याची सोय करुन देण्यात आली. ही सुविधा अमेरिकेतील ‘सोलर फोकस’ या कंपनीने प्रत्यक्षात आणली आहे. किंडलचे कव्हर सौरऊर्जेवर चार्ज केल्यानंतर त्यातील एलईडी दिवा 50 तासांपर्यंत सुरू राहतो. 

ई-रिडर्स : 
र्ई-रिडर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या स्मार्ट यूजर्ससाठी मोठ्या नामांकित कंपन्यांनी सौरऊर्जेवर चालणारे ई-रिडर्स विकसित केले आहेत. पुरेशा सूर्यप्रकाशात वाचताना रिडरचे दहा सेंटीमीटर आकाराचे पॅनेल चार्ज होतात. एलजी आणि सोनी या कंपन्यांनी हे रिडर्स विकसित केले असून, चार-ते पाच तास पुरेशा सूर्य प्रकाशात चार्ज झाल्यानंतर दिवसभर कार्यान्वित राहतात.

सोलर रेफ्रिजरेटर : 
आपल्या वीज बिलात सर्वात जास्त भर असेल तर फ्रीजची. कारण हे सर्वाधिक वीज खाणारे उपकरण होय. मात्र यावर उपाय म्हणून बॅटरीशिवाय व सौरऊर्जेवर चालणारा असा फ्रीज तयार करण्यात आला असून, त्याच्या कॉम्प्रेसरला होणारा वीजपुरवठा हा थेट सोलर पॅनेलशी जोडलेला असतो. ज्या ठिकाणी वीज पुरवठा नाही अशा ठिकाणी हा फ्रीज उत्तम पर्याय ठरतो. या फ्रीजला सुरू ठेवण्यासाठी केवळ पुरेसे पाणी, सूर्य प्रकाशाची गरज असते. विजेवर चालणाºया फ्रीजच्या तुलनेत याची देखभाल कमी असते. ऊर्जा साठवून ठेवता येत असल्याने तो सूर्यास्तानंतरही वापरता येतो. नामांकित कंपन्यांनी असे फ्रीज बाजारात आणले आहेत.  

सोलर जॅकेट्स : 
आपला लूक बदलण्यासाठी तरुणाई स्टायलिश जॅकेट्स परिधान करतात. त्यात अजून भर टाकण्यासाठी टॉमी हिलफिगर या जगप्रसिद्ध फॅशन डिझायनरने सोलर पॅनेल्स लावलेली काही जॅकेट्स बाजारात आणली आहेत. मुला-मुलींसाठी स्टायलिश लॉंग व शॉर्ट जॅकेट्स डिझाईन केली आहेत. या जॅकेटमध्ये दोन यूएसबी पोर्ट असून, गॅजेट्स सौरऊर्जेवर चार्ज होतात. या जॅकेटला पाठीवर सोलर पॅनेल बसवून पुढच्या बाजूला असलेल्या पॉकेट्समध्ये एकाच वेळी दोन डिव्हाइस चार्ज करता येतात.

सोलर सनग्लासेस : 
लहान एमपी प्लेअर, हेडफोन, ब्ल्यूटूथ हेडसेट तसेच इयरफोन चार्ज करण्यासाठी आपल्याला काहीप्रमाणात वीज लागते. मात्र हून जिआंग किम आणि क्वॉग सेओक जिआंग या इकोडिझायनर्सनी स्टायलिश सोलर सनग्लासेसची निर्मिती केली असून, या सनग्लासेसला बसविलेल्या पातळ पॅनेलमध्ये ऊर्जा साठविली जाते व त्याद्वारे वरील सर्व गॅजेट्स आपण चार्ज करु शकतो.  

की-बोर्ड :
संगणकावर काम करणाºयांची संख्या तशी मोठीच आहे. त्यामुळे की-बोर्ड हा सर्वांनाच परिचयाचा विषय आहे. आता हे की-बोर्ड सौर ऊर्जेवर कार्य करणार असून ‘लॉजिटेक’ कंपनीने वायरलेस की-बोर्ड विकसित केला आहे.

-ravindra.more@lokmat.com

RELATED ARTICLES


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :