-Ravindra More
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी प्रत्येक सेलिब्रिटी जिमचा आधार घेत असतात. विशेष म्हणजे त्यांच्या व्यस्त जीवनशैलीतही ते कधी जिममध्ये कसरत करणे सोडत नाही. एका अभ्यासानुसार, ज्या सेलिब्रिटींनी किंवा इतरांनी अर्ध्यावर जिम सोडली त्यांना गंभिर समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. कदाचित याच भीतीने सेलिब्रिटी अर्ध्यावर जिम बंद करत नाही. आपणही मध्येच जिम सोडण्याचा विचार करीत असाल तर उद्भवणाऱ्या समस्यांच्या बाबतीत आपणास सतर्क व्हावे लागेल.
जाणून घेऊया जिम सोडल्याने काय नुकसान होते ते.
* प्रतिकार शक्तीवर प्रभाव
अचानक जिम सोडल्याने प्रतिकार शक्तीवरदेखील अनिष्ट प्रभाव पडतो. जिम करतेवेळी आहाराची योग्य काळजी घेतली जाते, मात्र जिम सोडल्यानंतर आहाराच्या बाबतीत निष्काळजीपणा येतो. यामुळे प्रतिकार शक्ती कमकुवत होते.
* ह्रदय विकाराची समस्या
अचानक जिम सोडल्याने ह्रदयासंबंधी समस्या निर्माण होतात. या समस्या दिर्घकाळ तशाच राहिल्या तर मोठे नुकसान होऊ शकते.
* मांसपेशी कमकुवत होतात
जिम सोडल्यानंतर मांसपेशीत कमकुवतपणा येतो. सोबतच मांसपेशींची क्षमतादेखील कमी होते.
* वजनात वाढ होते
जिम करणे मध्येच सोडले तर शरीराचे वजन वाढण्यास सुरूवात होते. वर्कआउट केल्याने शरीराचे मेटॅबॉलिज्म वाढतो आणि कॅलरीच बर्न होतात, मात्र जेव्हा जिम सोडता तेव्हा वजनात वाढ होण्यास सुरुवात होते.
* फिटनेसवर प्रभाव
जिम सोडल्यानंतर अवघ्या तीन महिन्यानंतरच आपली फिटनेस लेवल कमी व्हायला लागते. जिम करतेवेळी शरीराचा फिटनेस वाढतो तसा जिम सोडल्यानंतर फिटनेस कमी होत जातो.
Also Read : Unbelievable : ट्रेनरच्या आग्रहास्तव शाहरूख खानने पहिल्यांदाच टाकले जीममध्ये पाऊल
: बॉलिवूडचे हे पाच कपल्स करतात जोडीने व्यायाम!