Health : ​परफेक्ट फिगरसाठी ‘हे’ आहेत ५ घरगुती उपाय !

काही घरगुती उपाय आहेत जे फॉलो केल्यास नैसर्गिक रित्या आपले वजन कमी होईल आणि आपणास परफेक्ट फिगर मिळेल.

Health : ​परफेक्ट फिगरसाठी ‘हे’ आहेत ५ घरगुती उपाय !
Published: 01 Jul 2017 04:34 PM  Updated: 01 Jul 2017 04:34 PM

बॉलिवूड असो की, हॉलिवूड येथील सेलिब्रिटींची फिगर ही परफेक्ट असते. त्यासाठी त्या व्यायामाबरोबरच डायटकडे आवर्जून लक्ष देतात. आपली फिगरही सेलिब्रिटींसारखी हवी असे आज प्रत्येक तरुणी किंवा महिलेस वाटते. मात्र वाढत्या वजनाने आपला लूक तर खराब दिसतो शिवाय मनाप्रमाणे आपण आवडता ड्रेसही परिधान करू शकत नाही. ही समस्या आपणासही भेडसावत असेल तर काही घरगुती उपाय आहेत जे फॉलो केल्यास नैसर्गिक रित्या आपले वजन कमी होईल आणि आपणास परफेक्ट फिगर मिळेल.  

* एक ग्लास पाण्यात अद्रक आणि लिंबूच्या स्लाइस टाकून काही वेळासाठी मंद आचेवर गरम करा. त्यानंतर पाण्याला गाळून प्या. पाणी पिताना ते कोमटच हवे. असे केल्याने लठ्ठपणासोबतच ओवरइटिंगची समस्यादेखील कमी होते. 

* वजन कमी करण्यासाठी आणि परफेक्ट फिगरसाठी ग्रीन टीदेखील मदत करते. यासाठी नियमित ग्रीन टीचे सेवन करू शकता. 

* आहारात जास्त मिठाचा वापर करु नका. यामुळे वजन वाढते. 

* परफेक्ट फिगरसाठी आहारात तांदूळ आणि बटाट्याचा समावेश नको. जर तांदूळ खाण्याची इच्छाच असेल तर तांदूळला कुकर ऐवजी परसट भांड्यात शिजवा आणि अतिरिक्त पाणी काढून फेकून द्या.  

* वजन नियंत्रणात राहावे आणि फिगर परफेक्ट असावी यासाठी कोशिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात पत्ताकोबी कापून मिक्स करा. त्यानंतर कोशिंबीराचे सेवन करा. यामुळे आपले शरीर स्लिम होण्यास मदत होते. पत्ताकोबी सहज पचते, सोबतच बºयाच वेळापर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे जेवण कमी जाते आणि वजन नियंत्रणात राहते.    


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :