Fashion : फेटा - फॅशनचा नवा ट्रेंड !

फेट्यांमुळे स्त्रीयांच्या सौदर्यात अधिकच भर पडताना दिसत आहे.

Fashion : फेटा - फॅशनचा नवा ट्रेंड !
Published: 14 Jul 2017 05:08 PM  Updated: 14 Jul 2017 05:08 PM

बहुतेक जुन्या मराठी चित्रपटात रुबाबदार व्यक्तिरेखा साकारण्यासाठी फेट्यांचा वापर केला जायचा. रांगडा पुरुष, पिळदार शरीरयष्टी, झुपकेदार मिशा आणि कोरीव दाढी असलेला अभिनेता फेट्यामध्ये अधिकच रुबाबदार आणि आकर्षक दिसायचा. 

अगोदर फेटा फक्त पुरुषच परिधान करायचे. आता मात्र चित्र बदलले आहे. फेट्याला आज फॅशनचा एक भाग समजला जात आहे. विशेषत: स्त्रीयाही पुरुषाच्या बरोबरीने फेटा बांधायला लागल्या आहेत. या फेट्यांमुळे त्यांच्या सौदर्यात अधिकच भर पडताना दिसत आहे. लग्नसोहळा, शोभायात्रा आदी प्रसंगीतर स्त्रीयांचा हा वेगळा ढंग हमखास पाहायला मिळतो.

अंगात नऊवारी साडी, पायात कोल्हापुरी चप्पल, कमरेवर कमरपट्टा, डोळ्यांवर रंगीत गॉगल, भाळावर चंद्रकोर आणि डोक्यावर फेटा असेल तर अशा स्त्रीला पाहून आपसुकच तोंडातून वाह..! हा शब्द निघाला नाही तरच नवलं.

पूर्वी विशिष्ट रंगाचेच फेटे पाहायला मिळायचे. आता मात्र वेगवेगळ्या रंगांचे आणि स्टाइलचे फेटे बाजारात सहज उपलब्ध आहेत. 'फेट्याच्या बांधणीनुसार त्यात निरनिराळे प्रकार उपलब्ध आहेत. तरीही पुणेरी किंवा कोल्हापुरी स्टाइलच्या फेट्यांना अधिक मागणी आहे. शिवाय आता बाजाराच आयते फेटेही मिळतात. त्यामुळे बांधायला येत नसेल तरी तुम्ही ऐटदार फेटा नक्कीच घालू शकता.  

फेट्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कपड्यातही आता खूप फरक पाहायला मिळत आहे. आधी केवळ कॉटनच्या कपड्याला स्टार्च करून फेटा बांधला जायचा. मात्र आता साडीच्या फेट्याचा ट्रेंड अधिक आहे. जरीची बॉर्डर असलेल्या किंवा अगदी पारंपरिक काठा-पदराच्या सहावारी किंवा नऊवारी साड्यांचा फेटा अनेक जण बांधतात. त्याचबरोबर 'बांधणी फेटा' हा देखील अत्यंत प्रसिद्ध होतो आहे. लाल, हिरव्या, पिवळ्या किंवा मिश्र रंगसंगतीतला बांधणी फेटा एक भारी लूक नक्कीच देऊ शकतो. कोल्हापुरी स्टाईलच्या फेटेबांधणीत 'लहरिया' फेटा अधिक प्रसिद्ध आहे.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :