असे तयार करा घरगुती क्रीम आणि 7 दिवसांत चेहरा तजेलदार तसंच डागविरहित बनवा !

सौंदर्य प्रसाधनांचा काहीही उपयोग नसतो. यामुळे पैसे वाया जातात ते जातात शिवाय फायदा होण्याऐवजी तुमच्या चेह-याला नुकसान पोहचण्याची शक्यता जास्त असते.

असे तयार करा  घरगुती क्रीम आणि 7 दिवसांत चेहरा तजेलदार तसंच डागविरहित बनवा !
Published: 24 Nov 2017 05:00 PM  Updated: 24 Nov 2017 05:00 PM

चेहरा गोरा, तजेलदार आणि डागविरहित असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी वाट्टेल ते करण्याचीही अनेकांची तयारी असते. अनेक उपाय प्रत्येकजण आजमावत असतो. यासाठी बाजारात विविध सौंदर्यप्रसाधनंही उपलब्ध आहेत. विविध उत्पादनांच्या जाहिरातींमधून चेहरा गोरा, तजेलदार आणि डागविरहित करण्याचे दावे केले जातात. विशेषतः सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या चेह-यासारखा आकर्षक चेहरा होईल असं या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमधून दावा करत असतात. मात्र या सौंदर्य प्रसाधनांचा काहीही उपयोग नसतो. यामुळे पैसे वाया जातात ते जातात शिवाय फायदा होण्याऐवजी तुमच्या चेह-याला नुकसान पोहचण्याची शक्यता जास्त असते. त्याऐवजी घरगुती उपाय केले तर त्याचा अधिक फायदा तुम्हाला होऊ शकतो. मात्र त्यासाठी काही जण दिवसभर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करुन घेतात. लिंबू, दही, पपईने चेहर-याची मालिश करण्याचा पर्यायही अनेकजण स्वीकारतात किंवा फेस पॅक लावतात. मात्र त्याहून आणखी एक उपाय आहे ज्यामुळे तुमचा चेहरा अधिक तजेलदार आणि आकर्षित होईल. कितीही जुने चेह-यावरील डाग असतील ते त्या पद्धतीमुळे दूर होणं शक्य आहे. त्यासाठी तुमच्याकडे ऍलोव्हेरा, बीटचा रस, ऑलिव्ह ऑईल, हळद, लिंबू, मध आणि गुलाब पाणी असणं आवश्यक आहे. सुरुवातीला एका भांड्यात एक चमचा ऍलोव्हेरा आणि एक चमचा बिटाचा रस यांचं मिश्रण करा. त्यानंतर त्यात अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. ऑलिव्ह ऑईलमुळे चेहरा उजळतो आणि डागही कमी होतात. दोन चिमुट हळद मिक्स करा हळद ऍन्टिसेप्टिकचे काम करते. हळद चेह-यावरील मुरुमं आणि फोडी दूर करते. आता यामध्ये दोन-तीन थेंब लिंबू रस टाका. लिंबामध्ये विटामिन-सी असते जे त्वचेसाठी आवश्यक असते. लिंबू चेह-यावरील डार्क स्पॉट फिक्के करते. सगळ्यात शेवटी तीन-चार थेंब मध यांत मिक्स करा. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करुन क्रीम तयार करा. ही क्रीम लावल्याआधी चेहरा गुलाब पाण्याने चांगला धुवून कापसाने स्वच्छ करुन घ्यावा. यानंतर तयार केलेली क्रीम हलक्या हाताने चेह-यावर लावा. 2 मिनिटे मिनिटे मालिश करा. क्रीम लावल्यानंतर रात्रभर ती तशीच राहू द्या. सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.सतत सात दिवस ही प्रक्रिया केल्यानंतर चेह-यावर डाग कमी झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. तसंच चेह-यावरील सुरकुत्याही कमी झाल्याचं पाहायला मिळेल. या घरगुती क्रीममुळे तुमचा चेहरा तजेलदार, सुंदर, डागविरहित होईल.  


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :