FASHION : ​‘नाइटविअर’ हवाय, मग स्टायलिश का नको?

नाइटविअरला ‘स्टायलिश’ लुक मिळत असून आज हा प्रकार कमालीच्या विविध अवतरांमध्ये दिसत आहे.

FASHION : ​‘नाइटविअर’ हवाय, मग स्टायलिश का नको?
Published: 23 Mar 2017 04:46 PM  Updated: 23 Mar 2017 04:46 PM

प्रसंग आणि आवश्यकतेनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्रप्रकार परिधान करीत असतो. त्यातीलच एक म्हणजे ‘नाइटविअर’ होय. हल्ली सर्व कपड्यांप्रकारेच नाइटविअरला ‘स्टायलिश’ लुक मिळत असून आज हा प्रकार कमालीच्या विविध अवतरांमध्ये दिसत आहे.  
तसाच नाइटविअर म्हणजेच गाऊन वापरण्याची सुरुवात केवळ सोय आणि आवश्यकता म्हणून झाली असावी. दिवसभर कपड्याचे ओझे वागवून वैतागलेल्या जीवाला आणि शरीराला आराम मिळावा म्हणून हलका, सुटसुटीत असा झोपताना वापरायचा पोशाख म्हणजेच नाइटविअर होय. या नाइटविअरने आता स्टायलिशपणाची जागा घेतली असून त्याची अनेक रूपे दिसू लागली आहेत. त्यात  शमीस, नाइट ड्रेस कप्तान, गाऊन, मॅक्सी, रॅप सेट, टॉप-शॉर्टस सेट, बेबी डॉल अशी आढळून येत आहेत. शमीस हा साधारणत: सिंगल पीस असतो व लांबीला गुडघ्यांच्या थोडासा वर असतो. यातही आता टू-पीस किंवा रॅप असा आणखी एक प्रकार आला आहे.
सध्या सेट म्हणजेच टी शर्ट-स्लीव्हलेस व पँट थ्री-फोर्थ असा ट्रेंड आहे. टीनएजर्ससाठी टॉप-शॉर्ट सेट विशेष करून आवडीचा होताना दिसतोय.
रंग संगतीबद्दलही आजकाल प्रत्येकजण 'चुझी' होताना दिसत आहे. नाइटविअरही त्याला अपवाद नाही. पांढरा, क्रीम, लायलॅक, पिंक, रेड, ब्लॅक हे झाले क्लासिक्स तर नवीन रंगांमध्ये प्लम, परपल, हॉट पिंक, अ‍ॅक्वा म्हणजेच हॉट ब्ल्यू. पांढरा, गुलाबी, यलो, ब्राउन, टरक्वॉइज या रंगांना पसंती आहे.
इतकेच नव्हे तर त्याची डिझाइन, वापरलेले मटेरिअल या गोष्टींकडे ही विशेषत्वाने लक्ष दिले जाते. ब्रायडल आणि डिझायनर नाइटविअरला सुद्धा खूप मागणी आहे यातही पॅटर्नस्बद्दल बोलायचे झाले, तर पायघोळ, हॉल्टर नेक, योक पिस, शेपली म्हणजेच जास्त घेर नसलेला, फुल, थ्री-फोर्थ हे आहेतच.
शिवाय प्रिंटबद्दल काय विचारायचे. प्लेन, टेक्सचर्ड, एम्ब्रॉयडरी, लाइट आणि ब्राइट प्रिंटेड, अ‍ॅबस्ट्रॅक्ट प्रिंटेड हे आहेचत, पण क्लासिक म्हणावे असे हलकेफुलके फ्लोरल व पोल्का डॉट्स आपले वर्चस्व टिकवून आहे.
नाइटविअर म्हणजे दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घय बनलेला आहे. त्यामुळे त्याची 'डिमांड' रंग लाई है. तो स्टायल स्टेटमेंट ठरत आहे. यातून आपण आपली निवड करावी व स्टाइल-स्टेटमेंट ठरवावे.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :