​Fashion : डिलिव्हरीनंतर कामावर जाताना कशी घ्याल काळजी !

मध्यमवर्गीय महिलांनी डिलिव्हरीनंतर कामावर जाताना काय काळजी घ्यावी, याबाबत बऱ्यापैकी माहिती नसते. जाणून घ्या कशी घ्याल काळजी !

​Fashion : डिलिव्हरीनंतर कामावर जाताना कशी घ्याल काळजी !
Published: 06 Jul 2017 05:44 PM  Updated: 06 Jul 2017 05:45 PM

प्रेग्नंसीदरम्यान करिनाचे वजन खूप वाढले होते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून करिना घाम गाळत होती. वर्कआऊट आणि कडक डाएट फॉलो केल्यानंतर या काळात करिनाने आपले २० किलो वजन कमी केले. शिवाय ती कडक डाएटवरदेखील होती. त्यानंतर करिना आपल्या परफेक्ट शेपमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे करिना कामावर पतरली आहे.

सेलिब्रिटी तर त्यांची विशेष काळजी घेतात. मात्र मध्यमवर्गीय महिलांनी डिलिव्हरीनंतर कामावर जाताना काय काळजी घ्यावी, याबाबत बऱ्यापैकी माहिती नसते. आज आम्ही आपणास डिलिव्हरीनंतर कामावर जाताना काय काळजी घ्यावी याबाबत माहिती देत आहोत. 

* डिलिव्हरीनंतर स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल येतात. डिलिव्हरीनंतर शरीराचा बिघडलेला आकार पूर्ववत करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. परंतु शरीर पूर्वीप्रमाणे सडपातळ होईपर्यंत आॅफिसमधून तुम्हाला सुट्या मिळत नाहीत.

* गर्भावस्थेत वाढलेले फॅट कव्हर करण्यासाठी गडद रंगाचे कपडे उत्तम ठरतील. या कपड्यांमुळे तुम्ही अधिक स्लिम दिसता. सॅटिन व सिल्कच्या कापडाचे शर्ट व टॉप ए-लाईन स्कर्ट किंवा ट्राऊझर्सवर पेअर करून घालू शकता. 

* मॅटर्निटी सुट्या संपल्यानंतर आॅफिसला जाताना एलिगंट दिसण्याचा ताण थोडा जास्त वाढतो. खालील काही टिप्स वापरून तुम्ही वेस्टर्न किंवा ट्रेडिशनल अशा कोणत्याही कपड्यांमध्ये परफेक्ट दिसू शकता. 

* एम्पायर कट कुर्ते तुमच्यासाठी बेस्ट ठरतील. याशिवाय साधे अनारकली व फ्लफी स्कर्टदेखील वेस्टर्नवेअरमध्ये समविष्ट करता येतात. सैल कुर्ते चुडीदार किंवा लेगिंगसोबत घालून तुम्ही आपली फिगर कव्हर करण्यासोबतच कम्फर्टेबलही राहता. शक्यतो पटियाला, सलवार व शॉर्ट कुर्ती घालणे टाळा. तुम्ही साडी नेसूनही आपले बेली फॅट कव्हर करू शकता. 

* डिलिव्हरीनंतर आपल्या शरीराचा आकार पूर्ववत होईपर्यंत स्ट्राईप वापरणे शक्यतो टाळा. 

* स्टायलिश दिसण्यासाठी टॉप टक इन करा व त्यावर मॅचिंग अ‍ॅक्सेसरी घालायला विसरू नका. शिवाय सैल असलेले टॉप्स वापरु शकता, यामुळे  तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल.

* आपण स्तनपान करीत असाल तर अंतर्वस्त्र घालताना विशेष लक्ष द्या. ब्रेस्ट पॅड घातल्याने ब्रेस्टच्या सभोवतालचा भाग ओला होणार नाही. गर्भावस्थेनंतर स्तनांचा आकार वाढून ते सैल होतात. यासाठी योग्य आकाराची ब्रा घालणे आवश्यक आहे. 

Also Read : ​Health : ​गरोदरपणात अवश्य करावित ही ‘५’ योगासने !
                   : ​Good News : तैमूरची मम्मी करिना कपूर कामावर पतरली!


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :