Beauty : ​सौंदर्य खुलविण्यासाठी उर्वशी रौतेला वापरते ‘ही’ वेदनादायी थेरेपी !

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत त्या आपले सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी असे काही उपाय करतात, याची आपण कल्पनाही करु शकणार नाहीत.

Beauty : ​सौंदर्य खुलविण्यासाठी उर्वशी रौतेला वापरते ‘ही’ वेदनादायी थेरेपी !
Published: 27 Jun 2017 12:45 PM  Updated: 27 Jun 2017 12:47 PM

अभिनेत्रीचे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येते ते त्यांचे सौंदर्य. अभिनेत्रींच्या सौंदर्याची नेहमी चर्चा होत राहते. विशेष म्हणजे त्या देखील आपले सौंदर्य टिकविण्यासाठी तेवढे प्रयत्न करतात. बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत त्या आपले सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी असे काही उपाय करतात, याची आपण कल्पनाही करु शकणार नाहीत. 

त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला होय. उर्वशीने आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी जी पद्धत निवडलेली आहे ती म्हणजे कपिंग थेरेपी होय.  ही एक चायनीज रिलॅक्सेशन थेरपी आहे. असे म्हटले जाते की, ही थेरेपी अतिशय वेदनादायी आहे. 
उर्वशी रौतेला हिने नुकतीच आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी कपिंग थेरेपीची ट्रिटमेंट घेतली आहे. ही एक चायनीज रिलॅक्सेशन थेरेपी असून तेथील बहुतांश सेलेब्रिटी याच थेरेपीचा वापर करतात. ही थेरेपी अतिशय वेदना असून या ट्रिटमेंटच्या माध्यमातून शरीराच्या आतील घाण बाहेर काढली जाते आणि स्किन टिश्यूला आॅक्सिजनच्या मदतीने खोलवर आराम दिला जातो. ही एक वेदनादायी थेरपी आहे. यामध्ये अ‍ॅक्यूपंचर स्पेशलिस्ट कॉटनचे गोळे दारुत भिजवले जातात. त्यानंतर हे गोळे काचेच्या छोट्या ग्लास किंवा कपात ठेऊन त्याला आग लावली जाते आणि नंतर ती आग विझवून गरम कप किंवा ग्लास शरीरावर ठेवले जाते. ही थेरपी यापूर्वी वीजे वानीने करुन घेतली आहे. 

या अभिनेत्रींनी सौंदर्य खुलविण्यासाठी वापरली ही पद्धत !विक्टोरिया बेकहम
फॅशन डिजाइनर विक्टोरिया बेकहम फेशियल बर्ड पू (चिमणीचे मल) ने करते. यामुळे चेहरा ग्लो करतो, असे तिचे म्हणणे आहे. 

Related image

किम कर्दाशिअन
किम कर्दाशिअनच्या सौंदर्यानेही सर्वजण परिचित आहेत. किम आपले सौंदर्य अबादित ठेवण्यासाठी ‘फ्लेटलेट रिच प्लाजमा थेरेपी’चा वापर करते. या पद्धतीत पेशेंटचे रक्त काढून पुन्हा त्वचेमध्ये इंजेक्ट केले जाते. ही थेरेपी सेलेब्समध्ये खूप प्रसिध्द असून बहुतेक सेलेब्स ही थेरेपीचा वापर करतात. 

Related image

लेडी गागा 
लेडी गागा नेहमी आपल्या आऊटफिट्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. लेडी गागाचा ड्रेस अशाप्रकारे तिचे मेकअप सिक्रेट्ससुध्दा विचित्र आहे. डेली मेलच्या रिपोर्ट्सनुसार, लेडी गागा आपला ओव्हर आय मेकअप काढण्यासाठी सेलो टेपचा वापर करते. 

Image result for ग्वेनेथ पाल्ट्रो

ग्वेनेथ पाल्ट्रो
हॉलिवूड अभिनेत्री ग्वेनेथ पॅल्ट्रो सुरकत्यांपासून वाचण्यासाठी एक आश्चर्यकारक थेरेपी घेते. ती सांपाच्या विषापासून तयार झालेल्या क्रिमचा वापर करते. चेह-यावर अशाप्रकारच्या क्रिमचा वापर करणारी ग्वेनेथ पहिली अभिनेत्री आहे. यापूर्वी केइरा नायटली आणि जेसिका सिम्पसनसुध्दा ओठांसाठी सापाच्या विषाचे वेदनादायी ट्रिटमेंट घेत होत्या. या विषाने ओठ सुजतात आणि त्यांचा आकार वाढतो.

Image result for जेनिफर लोपेज

जेनिफर लोपेज
गायिका जेनिफर लोपेज आपल्या चेह-याचा ग्लो वाढवण्यासाठी अतिशय विचित्र ट्रिटमेंट घेते. स्किन ग्लो करावी यासाठी ती ह्युमन प्लेसेन्टा (नाळ) फेशियल करते.  

Related image

केटी होम्स
केटी होम्स आपल्या त्वचेचा प्रसन्न आणि सुदंर ठेवण्यासाठी प्लेसेन्टा क्रिमचा वापर करते. प्लेसेन्टा (नाळ) प्रेग्नेंसीदरम्यान बाळाच्या पोटाशी जुळलेले असते.

Also Read : ​Beauty Tips : ​सुंदर त्वचेसाठी श्रुती हासन वापरते ‘हा’ मास्क !
                    Beauty Tips : ​प्रियांका चोप्राने ‘या’ घरगुती उपायांनी मिळविली सुंदर त्वचा !


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :