​Beauty : सौंदर्यासाठी काळानुसार ‘या’ अभिनेत्रींनी बदलली आयब्रोज स्टाइल !

जसा काळ बदलत आहे त्यानुसार अभिनेत्री आपल्या लूकमध्ये बदल घडवत असतात. त्यासाठी त्या सर्जरी, मेकअपबरोबरच आयब्रोज स्टाइलमध्ये बदल असे नवनवीन प्रयोग आणि उपाय करत असतात.

​Beauty : सौंदर्यासाठी काळानुसार ‘या’ अभिनेत्रींनी बदलली आयब्रोज स्टाइल !
Published: 27 Jun 2017 02:29 PM  Updated: 27 Jun 2017 02:29 PM

जसा काळ बदलत आहे त्यानुसार अभिनेत्री आपल्या लूकमध्ये बदल घडवत असतात. त्यासाठी त्या सर्जरी, मेकअपबरोबरच आयब्रोज स्टाइलमध्ये बदल असे नवनवीन प्रयोग आणि उपाय करत असतात. 
त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे काजोल होय. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत काजोलने आपल्या आयब्रो स्टाइलविषयी खुलासा केला आहे. ती म्हणाली होती, ‘जुळलेल्या आणि दाट आयब्रोजसोबत स्क्रिनवर झळकण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते. माझा मित्र मिकीने माझ्या निर्णयावर विश्वास दाखवला आणि म्हटले, की अशा आयब्रोजमुळे तू इतर अभिनेत्रींपेक्षा स्क्रिनवर वेगळी दिसशील आणि लोकांना पसंतसुद्धा पडशील.’ मित्राचा सल्ला ऐकल्यानंतर काजोलने वयाच्या १७ व्या वर्षी 'बेखुदी' (१९९२) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. विशेष म्हणजे दाट आणि जुळलेल्या आयब्रोजमुळे काजोलला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळा लूक मिळाला, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

काजोल सुपरहिट ठरलेल्या 'बाजीगर' या सिनेमात जाड आयब्रोजमध्ये दिसली होती. काही वर्षांनंतर काजोलने आयब्रोज थोड्या बारीक केल्या आणि जुळलेल्या तिच्या आयब्रोजला वेगळा शेप मिळला.

या अभिनेत्रींनीही बदलली आपली आयब्रोज स्टाइल 

Image result for karishma kapoor before and now

पुर्वी करिश्मा कपूरच्याही आयब्रोज जाड होत्या. मात्र काळानुसार तिनेही स्वत:च्या लूकमध्ये बदल करण्यासाठी आयब्रोज स्टाइल बदलली. आता ती बारीक आयब्रोज ठेवते.  

Related image

आलिया भटनेही आपली आयब्रोज स्टाइलमध्ये बदल केला आहे. ती अगोदर जाड आणि आता बारीक आयब्रोज ठेवते.

Image result for anushka sharma eyebrow makeover

अनुष्का शर्माच्या आयब्रोजमध्येही बदल झालेला बघायला मिळतो. पूर्वी तिच्या आयब्रोज बारीक होत्या. मात्र आता त्या जाड दिसतात.  

Image result for deepika padukone eyebrow makeover

करिअरच्या सुरुवातीच्या काळात दीपिका पदुकोण बारीक आयब्रोज ठेवायची. मात्र आता तिच्या आयब्रोज दाट आहेत.

Image result for kangana ranaut eyebrow makeover

कंगना रनोट पुर्वी बारीक आणि आता जाड आयब्रोज ठेवते. 

Image result for kareena kapoor eyebrow makeover

काळानुसार करीना कपूरनेही तिच्या आयब्रोजचा शेप बदलला आहे.

Image result for karishma kapoor before and now

प्रियांका चोप्रानेसुद्धा तिच्या आयब्रोजच्या शेपमध्ये बदल केला आहे. पुर्वी तिच्या आयब्रोज बारीक असायच्या.  


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :