डागरहित उजळ त्वचेसाठी हळद उपयुक्त!

हळदीत आढळणा-या अ‍ॅन्टिसेप्टिक गुणांमुळे त्वचेच्या सौंदर्यात मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने हळदीचा वापर उपयुक्त ठरतो.

डागरहित उजळ त्वचेसाठी हळद उपयुक्त!
Published: 27 Mar 2018 05:05 PM  Updated: 27 Mar 2018 05:05 PM

हळद जेवढे आरोग्यदायी तेवढेच सौंदर्यवर्धकही आहे.हळदीत आढळणा-या अ‍ॅन्टिसेप्टिक गुणांमुळे त्वचेच्या सौंदर्यात मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने हळदीचा वापर उपयुक्त ठरतो. जाणून घेऊया डागरहित उजळ त्वचेसाठी हळदीचे गुणकारी फेस पॅकची उपयुक्तता... 

* हळद आणि दही 
एक चमचा हळद पावडर, एक चमचा दह्यासोबत मिक्स करा आणि ही पेस्ट चेहºयावर लावा. पंधरा मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून एकदा तरी हे पॅक वापरा. डाग नक्की साफ होतील.

* हळद आणि काकडीचा रस 
हळद आणि काकडीने त्वचा उजळेल. यासाठी एक चमचा हळदीत दोन चमचे काकडीचा रस मिसळा आणि चेहºयावरील डागांवर लावा. पेस्ट वाळल्यावर चेहरा धुऊन टाका. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.  

* हळद आणि लिंबाचा रस 
ताज्या लिंबाच्या रसात चिमूटभर हळद मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा. ही चेहºयावर लावून पंधरा मिनिट राहून द्या. नंतर चेहरा धुऊन पुसून घ्या आणि मॉइस्चराइजर लावा.

* हळद आणि चंदन पावडर
एक चमचा चंदन पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि जरासं मध मिसळा. चेहºयावर २० मिनटांसाठी लावून ठेवा आणि मग पाण्याने धुऊन टाका. 

* हळद, दूध आणि मध
दोन चमचे दूध आणि एक चमचा मधासोबत एक चमचा हळद मिसळा. ही पेस्ट चेह-यावर लावा आणि पंधरा मिनिटानंतर चेहरा धुऊन टाका. याने हळू-हळू चेहºयाचे सर्व डाग दूर होतील.  


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :