Beauty : पी हळद हो गोरी !

हळदमध्ये अ‍ॅँटी बॅक्टेरियल आणि अ‍ॅँटीबायोटिक गुण आहेत. शिवाय यात उपलब्ध अ‍ॅँटीआॅक्सिडेंट्समुळे रिंकल्सपासून बचाव होतो. काही तज्ज्ञ ब्युटी एक्सपर्ट यांच्या अभ्यासानुसार हळद ही एक परिपूर्ण व्हाइटनिंग थेरपी आहे.

Beauty : पी हळद हो गोरी !
Published: 27 Jan 2017 05:16 PM  Updated: 27 Jan 2017 05:18 PM

-Ravindra More
हळदमध्ये अ‍ॅँटी बॅक्टेरियल आणि अ‍ॅँटीबायोटिक गुण आहेत. शिवाय यात उपलब्ध अ‍ॅँटीआॅक्सिडेंट्समुळे रिंकल्सपासून बचाव होतो. काही तज्ज्ञ ब्युटी एक्सपर्ट यांच्या अभ्यासानुसार हळद ही एक परिपूर्ण व्हाइटनिंग थेरपी आहे. स्कीनवर अप्लाय करण्यासाठी मार्केटमध्ये मिळणाऱ्या हळद पावडर व्यतिरिक्त घरातील हळदीचे तुकड्यांना पाण्यात घासून पेस्ट बनविल्यास त्याचा जास्त फायदा होतो. आजच्या सदरात हळदीचे ब्युटी आणि आरोग्यवर्धक काय फायदे आहेत हे जाणून घेऊया.


-हळदीचे १० ब्युटी फायदे 
* हळदीमध्ये बेसन, लिंबूचा रस आणि दही मिक्स करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास रंग गोरा होतो.
* हळदीमध्ये मध आणि आॅलिव्ह आॅइल मिक्स करून लावल्याने स्कीनचा ड्रायनेस कमी होईल आणि ग्लो वाढेल.
* आॅलिव्ह आॅइलमध्ये एक चुटकी हळद मिक्स करून चेहऱ्यावर मालिश केल्याने रिंकल्सपासून बचाव होतो.
* बटाट्याच्या रसात हळद मिक्स करुन डोळ्यांखालील डार्क सर्कलला लावा. त्याला कोरडा झाल्यांनतर धुवा. याने डार्क सर्कल दूर होण्यास मदत होते. 
* पीठाच्या कोंड्यात चुटकीभर हळद टाकून त्यात कच्चे दूध मिक्स करा. हा लेप हाताच्या कोपऱ्याला लावल्यास तेथील काळेपणा दूर होतो. 
* मलईमध्ये हळद मिक्स करुन चेहऱ्यावर लावा, याने चेहऱ्यावर ग्लो तर येतो शिवाय चकाकीदेखील येते. 
* बेसनमध्ये दही आणि हळद मिक्स करून हातापायांना लावल्यास रंग उजाळण्यास मदत होते.
* मधात गुलाबजल आणि हळद मिक्स करुन मानेवर लावल्यास काळेपणा दूर होतो. 
* टमाट्याच्या रसात गुलाबजल आणि हळद मिक्स करून लावल्यास त्वचा ग्लो होण्यास मदत होते. 
* हळदमध्ये चंदनपावडर आणि दही मिक्स करुन लावल्यास चेहऱ्यावरील डाग दूर होतात.

-Also read : मेंदूची क्षमता वाढण्यासाठी हळद उपयुक्त !
                   : आतड्याच्या कॅन्सरसाठी हळद अत्यंत लाभदायक !

 -हळदीचे आरोग्यवर्धक फायदे
* हळदीमध्ये लोेह असल्याने याच्या सेवनाने अ‍ॅनिमियापासून (रक्ताची कमतरता) मुक्तता मिळते.
* यातील करक्यूमिनमुळे फॅटी टिशू बनण्यास आळा बसतो त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 
* हळदमध्ये मध मिक्स करून पिल्याने अस्थमापासून आराम मिळतो.
* यात मध आणि आवळ्याचा रस मिक्स करून पिल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. 
* हळदीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी होते त्यामुळे ह्रदयाच्या समस्या दूर होतात.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :