Beauty Tips ​: मस्काराच्या विविध रंगांनी बना स्टायलिश !

सेलिब्रिटी आपल्याला नेहमी प्रत्येक पार्टीत किंवा प्रोग्रॅममध्ये आकर्षक व पहिल्यापेक्षा वेगळी भासते. विशेष म्हणजे त्या मस्कारादेखील वारंवार एकाच रंगाचा वापर करीत नाहीत.

Beauty Tips ​: मस्काराच्या विविध रंगांनी बना स्टायलिश !
Published: 29 Jun 2017 06:44 PM  Updated: 29 Jun 2017 06:44 PM

-Ravindra More
सेलिब्रिटी आपल्याला नेहमी प्रत्येक पार्टीत किंवा प्रोग्रॅममध्ये आकर्षक व पहिल्यापेक्षा वेगळी भासते. कारण ते नेहमी आपला आउटफिट रिपीट होऊ देत नाहीत. विशेष म्हणजे त्या मस्कारादेखील वारंवार एकाच रंगाचा वापर करीत नाहीत. यानुसारच आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगाचा मस्कारा उपलब्ध झाला असून आपणासही नवा लूक हवा असल्यास विविध रंगाचा मस्कारा ट्राय करायला हरकत नाही. 
कोणतीही सेलिब्रिटी पार्टीसाठी आपल्या आउटफिट्सवर जास्त लक्ष देत असते. त्या आपले कपडे कोणत्याच पार्टीत रिपीट होऊ देत नाही. शिवाय कपडेच नव्हे तर प्रत्येकवेळी आपला मेकअप लूूकही वेगळा शो करीत असतात. त्यासाठी त्या वेगवेगळ्या आय मेकअप किंवा लिप कलरचाच वापर करीत नाही तर स्वत:ला वेगळे दाखविण्यासाठी विविध रंगाचा मस्कारादेखील वापर करीत असतात. जाणून घेऊया की, कोणकोणत्या रंगाचा मस्कारा उपलब्ध आहे आणि त्यात आपला लूक कसा दिसेल. 

Related image

* गुलाबी 
या रंगाची लिपस्टिक आणि नेलपेंट आपण वापरलाच असेल, आता मात्र या रंगाचा मस्कारा वापरण्याची वेळ आलीआहे.नाइट पार्टीसाठी जर आपण याचा वापर केला तर नक्कीच आकर्षक दिसाल, शिवाय दिवसाच्या पार्टीतही याचा वापर आपण फक्त एक कोट लावून करू शकता.

Image result for blue color mascara

* निळा
दिवसाच्या कोणत्याही पार्टीत जर जायायचे असेल तर निळ्या रंगाचा मस्कारा वापरावा. यामुळे एक आकर्षक लूक प्राप्त होईल. त्यासाठी अगोदर वरच्या लॅशलाइनवर पातळ आय लायर लावावी आणि त्यानंतर या रंगाचा मस्कारा लावावा. जर आपणास जास्त बोल्ड लूक हवा नसेल तर याला फक्त वरच्या पापण्यांना लावावे. * हिरवा
दिवसाच्या पार्टीसाठी या रंगाचा मस्कारा परफे क्ट आहे. यासोबत असा लाइनर वापरा ज्याची शेड आपल्या पापण्यांपेक्षा थोडी डार्क आहे. यामुळे नक्कीच आपल्या डोळ्यांचे सौंदर्य वाढण्यास मदत होईल.  

Image result for firoja color mascara

* फिरोजा 
जर आपल्या डोळ्यांचा रंग ब्राउन किंवा ब्लू आहे, तर फिरोजा रंगाचा मस्कारा आपल्यासाठी परफेक्ट असेल. स्टेटमेंट लूकसाठी याला ब्लॅक किंवा याच रंगाच्या आयलाइनरसोबत पेयर करावे. 

Image result for bronze color mascara

* ब्रॉन्ज
आपल्या डल डोळ्यांना आकर्षकपणा आणि ब्राइटनेस हवा असल्यास या रंगाचा मस्कारा वापरु शकता. रात्रीच्या पार्टीसाठी हा परफेक्ट पर्याय आहे. फक्त यासोबत आपला उर्वरित मेकअप थोडा न्यूट्रल ठेवावा. हा मस्कारा प्रत्येक आयलाइनरवर आकर्षक वाटेल.


   


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :