Beauty & Fitness : ​सौंदर्य आणि सुदृढ आरोग्यासाठी हे आहेत खास घरगुती उपाय !

आपणासही आपले सौंदर्य वाढवून सुदृढ आरोग्य टिकवून ठेवायचे असेल तर आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत, ज्या फॉलो केल्यास आपणास नक्की फायदा होईल.

Beauty & Fitness : ​सौंदर्य आणि सुदृढ आरोग्यासाठी हे आहेत खास घरगुती उपाय !
Published: 17 Aug 2017 06:18 PM  Updated: 17 Aug 2017 06:18 PM

प्रत्येक सेलिब्रिटी आपले सौंदर्य आणि सुदृढ आरोग्य  टिकविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. विशेष म्हणजे ते बाजारातील केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळून घरगुती उपायांवर अधिक भर देत असल्याचे निदर्शनास आले आहे. आपणासही आपले सौंदर्य वाढवून सुदृढ आरोग्य टिकवून ठेवायचे असेल तर आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत, ज्या फॉलो केल्यास आपणास नक्की फायदा होईल.    

* आपल्या चेहऱ्याला ताज्या टोमॅटोने रसाने मसाज करा आणि एक-दोन तासांनंतर चेहरा धुवून घ्यावा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स तर दूर होतील शिवाय चेहऱ्यावर तेज येण्यासही मदत होईल. 

* त्वचा चमकदार आणि सुंदर बनण्यासाठी रोज सकाळी सफरचंदचा एक पेला रस प्या.

*  नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यासाठी दररोज गरम पाणी, निंबू व मध एकत्र करुन सेवन केल्यास फायदा होईल. 

*कोरफडचा गर चेहऱ्याला लावून रोज मसाज केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतील.

* नारळाचे तेल व लिंबाचा रस ह्याने १० ते १५ दिवस केसाची मालिश केल्यास केसातील कोंढ्याची समस्या सुटण्यास मदत होईल. तसेच कडूनिंबाचे २० ते ३० पाने टाकून पाणी उकळून घ्यावे आणि त्या पाण्याने केस धुतल्यास केसातील कोंढा काही दिवसात नाहीसा होता. 

* पावसाच्या पाण्याने केस धुतल्यास केस चमकदार होतात.

* जेवणानंतर भरपोट पाणी पिल्यास त्वचेवरील पिंपल्स (तारुण्यपिटिका) दूर होण्यास मदत होते. 

* कडूनिंबाच्या रोज १ ते २ छोट्या गोळ्या बनवून खाल्ल्या तर चेहरा, तब्येत आणि इतर अनेक गोष्टी सुधारण्यास मदत होते. 

* पुदिन्याने चेहऱ्याची मसाज करून तो लेप रात्र भर चेहºयास लावून ठेवावा. यामुळे चेहरा ताजातवाना व चेहºयावरील सौंदर्य खुलेल.

* त्वचेला एरंडेल तेलाने मालिश केल्यास त्वचा लवचिक राहते.

* सकाळी उठल्याबरोबर १ ते २ ग्लास पाणी पिल्यास प्रातविधी साफ होते व त्वचा ताजीतवानी राहते.  
* चेहरा गोरा करण्यासाठी रोज झोपताना गायीच्या शुद्ध तुपाने मालिश करा. शिवाय रोज ५ मिनिट कपालभाती, प्राणायाम केल्यास त्वचेवरील तेज अबाधित राहते.

* शरीर आणि त्वचेच्या आरोग्यासाठी रोज सूर्यनमस्कार रोज करावेत.

* शुद्ध बदाम तेल किंवा शुद्ध नारळ तेल आठवड्यातून दोनदा मसाज करा, आयुर्वेदिक नियमानुसार शरीरात रक्त प्रवाह वाढते आणि आधी नसलेली त्वचेवरील चमक परत आणते.

* आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस उपवास ठेवा आणि त्या दिवशी फक्त फळे व दुध घ्या शरीरातील अनोपयोगी तयार होणारे विषारी द्रव्य निघून जातात.

* चेहऱ्यावर शुद्ध मध बरोबर लिंबाचा रस लावावा, हे घरगुती उपाय मुरुमांपासून फार लवकर उपचाराकरिता उपयुक्त आहे.

* रोज तीन ते चार खजूर खाल्ल्यास त्वचा चांगली राहते. 

वरील घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार केल्यास आपले सौंदर्य आणि आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. 

Aslo Read : ​BEAUTY : घरगुती उपायांनी क्लिनअप करून दिसा सुंदर !
                   : ​Fitness : ​'फिट अ‍ॅण्ड फाइन' राहायचे असेल तर हे नक्की वाचा !


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :