Guardians of the Galaxy 2 : मुलाच्या सांगण्यावरून विन डिजल म्हणणार ‘आय अ‍ॅम ग्रूट’

​मार्व्हल स्टुडिओच्या ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी’ या हॉलिवूडपटातील जबरदस्त पॉप्युलर असलेले ‘ग्रूट’ हे पात्र तुम्हाला माहीतच असेल. ‘आय अ‍ॅम ग्रूट’ या एकाच डायलॉगमुळे हे पात्र हिट ठरले;

Guardians of the Galaxy 2 :  मुलाच्या सांगण्यावरून विन डिजल म्हणणार ‘आय अ‍ॅम ग्रूट’
Published: 05 Apr 2017 07:18 PM  Updated: 05 Apr 2017 07:18 PM

मार्व्हल स्टुडिओच्या ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी’ या हॉलिवूडपटातील जबरदस्त पॉप्युलर असलेले ‘ग्रूट’ हे पात्र तुम्हाला माहीतच असेल. ‘आय अ‍ॅम ग्रूट’ या एकाच डायलॉगमुळे हे पात्र हिट ठरले; बच्चेकंपनींमध्ये तर या पात्राची आजही कमालीची क्रेझ आहे. याच लोकप्रिय पात्राला ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी’च्या दुसºया भागात अ‍ॅक्शन अभिनेता विन डिझल याने आवाज दिला आहे. मानवसदृश झाड असलेले या पात्राचा मर्यादित शब्दसंग्रह असल्याने त्याच्या तोंडून पडणारे ‘आय अ‍ॅम ग्रूट’ हे शब्द पहिल्या भागात हिट झाले होते. आता दुसºया भागात बेबी ग्रूट दिसणार असल्याने त्याचेही डायलॉग प्रेक्षकांना भावतील यात शंका नाही. या पात्राविषयी अधिक बोलताना विन डिजल म्हणतोय की, मी केविन फिग याला दोन आठवड्यांपूर्वी भेटण्यास गेलो होतो. त्यावेळी मार्व्हलने मला एक संकल्पना पुस्तक पाठविले होते. या पुस्तकात अनेक विचित्र कल्पना आणि पात्र होते. मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला आयरन जायंट या पात्राला आवाज दिला होता. 

मी जेव्हा हे संपूर्ण पुस्तक वाचले तेव्हा ‘गू्रट’ या पात्राच्या प्रेमात पडलो होतो. तेव्हा मी माझ्या तीन वर्षांचा मुलगा विन्सेट याला विचारले की, कुठले पात्र मी साकारायला हवे. तेव्हा त्याने झाडाकडे इशारा केला होता. त्याचवेळी मी ‘ग्रूट’ या पात्राला आवाज देण्याचे ठरविले होते. वास्तविक विनला ‘ग्रूट’ या पात्राविषयी विशेष प्रेम आहे. याविषयी तो म्हणतोय की, ‘ग्रूट’ हे पात्र रहस्यमय असून, मजेशीर आहे. माझ्या मते मार्व्हल युनिव्हर्समध्ये हे एकमेव असे पात्र आहे, जे सगळ्यात वेगळे आहे. 

मार्व्हलनिर्मित ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी २’ हा चित्रपट मागच्या भागाला पुढे नेत आहे. या चित्रपटातील सुपरहिरोंची टीम ब्रह्मांडाच्या आणखी बाहेर जात असते. गार्डियन्सच्या टीमला नवीन परिवाराला एकत्र ठेवण्यासाठी लढा द्यावा लागतो. कारण त्यांना पिटर क्वील्सच्या पालकत्वाबाबत काहीतरी शंका वाटत असते. त्यातच त्यांचे जुने शत्रू पुन्हा एकत्र येत असल्याने त्यांना गार्डियन्सच्या टीमला लढा द्यावाच लागतो. पहिल्या भागाच्या तुलनेत दुसºया भागात अधिक अ‍ॅक्शन असल्याने चित्रपटातील सर्वच पात्र मनोरंजन करणारे आहेत. ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी २’चे लेखन आणि दिग्दर्शन जेम्स गन यांनी केले आहे. तर यामध्ये प्रमुख भूमिकांमध्ये क्रिस प्रॅट, झो सल्डाना, डेव्ह बटिस्टा हे आहेत. विन डिजल याने बेबी ग्रूटला आवाज दिला आहे; ब्रेडली कूपर याने रॉकेट या पात्राला आवाज दिला आहे. तर मायकल रूकर, करेन गिलान, पोम क्लेमेंटिफ, एलिझाबेथ डेबिचकी, क्रिस सुलिवन, सियान गन, टॉमी फ्लानागन, लॉरा हॉडोक यांच्यासह सिलवेस्टर स्टॅलोन यानेही आवाज दिला आहे. कर्ट रसेल आणि केविन फिग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर लुईस डी एपिसोटी, व्हिक्टोरिया अलोंसो, जोनाथन श्वाटर्ज, निकोलस कोरडा आणि स्टेन ली हे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट येत्या पाच मे रोजी रिलीज होणार आहे. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :