Oscars 2018 : आॅस्कर सोहळ्यापूर्वीच हार्वी विनस्टीनची ‘ती’ असूरी प्रतिकृती चर्चेत!

सध्या आॅस्कर सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, तत्पूर्वीच हॉलिवूड निर्माता हार्वी विनस्टीन याच्या कास्टिंग काऊचची चर्चा रंगताना दिसून येत आहे.

Oscars 2018 : आॅस्कर सोहळ्यापूर्वीच हार्वी विनस्टीनची ‘ती’ असूरी प्रतिकृती चर्चेत!
Published: 03 Mar 2018 01:44 PM  Updated: 03 Mar 2018 03:02 PM

गेल्या काही महिन्यांपासून निर्माता हार्वी विनस्टीन याच्या कारनाम्यांची संबंध जगभरात चर्चा रंगत आहे. हॉलिवूडमधील कितीतरी नामांकित अभिनेत्रींनी हार्वीविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने एकच खळबळ उडाली. आता याचा प्रभाव आगामी ९०व्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्यावरही पडताना दिसत आहे. होय, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आॅस्कर पुरस्काराच्या पूर्वतयारीचे वारे सध्या हॉलिवूडमध्ये वाहत आहेत. अतिशय मानाच्या समजल्या जाणाºया हा सोहळा सर्वच अंगांनी महत्त्वपूर्ण समजला जातो. त्यातच सोहळ्यातील सेलिब्रिटींचा जलवा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. यासर्व गोष्टी यंदाही बघावयास मिळणार आहे, मात्र त्याचबरोबर हार्वी विनस्टीनच्या कारनाम्यांचीही चर्चा या सोहळ्यात रंगणार आहे. 

हॉलिवूडमधील डझनभरांपेक्षा अधिक आघाडीच्या अभिनेत्रींनी हार्वीविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या आरोपामुळे हॉलिवूडबरोबरच जगभरात एकच खळबळ उडाली होती. त्याचबरोबर #MeToo आणि #TimesUp या हॅशटॅग अंतर्गत जगभरात मोहीमही राबविली गेली. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या हॅशटॅग अंतर्गत त्यांच्याशी घडलेल्या लैंगिक शोषणाबद्दल आपबिती सांगितली. अजूनही हा ट्रेंड सुरू असल्याने हॉलिवूड बोलेवर्ड येथे रस्त्याच्या कडेला Elvis Presley एल्विस प्रेसलीच्या पुतळ्याजवळच एक काऊच उभारण्यात आला आहे. सोनेरी रंगाच्या या काऊचवर हार्वीची प्रतिकृतीही बसवण्यात आली असून, त्याला ‘कास्टिंग काऊच’ असे नाव देण्यात आले आहे. बाथरोब घातलेला आणि त्या काऊचवर हात पसरून बसलेला हार्वी पाहता, त्याची असुरी वृत्तीच जणू त्या प्रतिकृतीतून झळकतेय. यावरून यंदाच्या आॅस्करमध्ये हार्वीचे कारनामे जोरदार चर्चिले जातील यात शंका नाही. कारण मुख्य सोहळा सुरू होण्याआधीच लॉस एंजेलिसच्या प्लॅस्टिक जिजस आणि जोशुआ ‘जिंजर’ मुन्रो या स्ट्रीट आर्स्टिस्टनी एकत्र येत त्यांच्या कलेचा अप्रतिम नमुना सादर केला आहे. 

वास्तविक हॉलिवूडमध्ये ही पूर्वीपासूनच परंपरा असून, अनुचित आणि चुकीच्या गोष्टींवर अशा हटके पद्धतीने प्रकाशझोत टाकला जातो. पण, याच कलाविश्वाची अंधारात असलेली बाजू तितकीच विदारक आहे, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होत असल्याचे प्लॅस्टिक जिजसने ही कलाकृती साकारण्याविषयीच्या उद्देशाबद्दल एएफपी या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना स्पष्ट केले. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या हार्वीच्या ‘कास्टिंग काऊच’बद्दल चर्चा रंगत असून, अनेकांकडून त्याचा निषेध केला जात असल्याचे दिसून येत आहे. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :