​जस्टीन बीबरवर भारतात होणार भेटवस्तूंची बरसात!

जस्टीन बीबरचा लाईव्ह ऐकण्यासाठी अख्खा भारत आसुसलेला आहे, तेवढेच अनेकजण त्याला भेटवस्तू देण्यासाठीही आसुसलेले आहेत. देशातील कलाकारांपासून ते फॅशन डिझाईनरपर्यंत अनेकजण जस्टीनला खास भेटवस्तू देण्यासाठी उत्सूक आहेत.

​जस्टीन बीबरवर भारतात होणार भेटवस्तूंची बरसात!
Published: 09 May 2017 01:02 PM  Updated: 09 May 2017 01:02 PM

जस्टीन बीबरचा लाईव्ह ऐकण्यासाठी अख्खा भारत आसुसलेला आहे, तेवढेच अनेकजण त्याला भेटवस्तू देण्यासाठीही आसुसलेले आहेत. देशातील कलाकारांपासून ते फॅशन डिझाईनरपर्यंत अनेकजण जस्टीनला खास भेटवस्तू देण्यासाठी उत्सूक आहेत.
जस्टीन बीबर मुंबईत दाखल झाला आहे. उद्या १० मे रोजी मुंबईच्या एका स्टेडियमवर त्याचा लाईव्ह शो होणार आहे. जस्टीनच्या शाही पाहुणाराबद्दलच्या बातम्या तर आपण ऐकता आहातच. राजस्थानवरुन आलेल्या खास आचाºयांच्या हातच्या जेवणापासून ते अगदी सेलिब्रिटींनी आयोजित केलेल्या पार्टीपर्यंत अगदी सगळे काही ठरलेले आहे. याचदरम्यान सरोद वादक अमजद अली खानपासून डिझाईनर रोहित बल, वरूण बहल आणि अनामिका खन्नापर्यंत अशा सगळ्यांकडून जस्टीनवर भेटवस्तूंची बरसात होणार आहे. कुणी जस्टीनला सरोद गिफ्ट करणार आहे,  कुणी त्याच्या आईसाठी खास डिझाईन केलेला ड्रेस भेट म्हणून देणार आहे, तर कुणी जस्टीनला जॅकेट भेट देणार आहे.

ALSO READ : सनी लिओनीने जस्टीन बीबरकडे केली ‘ही’ गोड मागणी!दिग्गज सरोद वादक अमजद अली खान जस्टिनला आॅटोग्राफ असलेली खास  सरोद भेट म्हणून देणार आहेत. तो हे 'सरोद' प्रवासादरम्यानही सोबत नेऊ शकतो.  रोहित बलने जस्टिनसाठी मखमली सूतीचं एक जॅकेट तयार केले आहे.जस्टिनची एकंदर स्टाईल, भारतीय संगीत आणि दोन भिन्न संस्कृतींकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन यांची सांगड घालून हे जॅकेट तयार करण्यात आले आहे. डिझायनर अनामिका खन्नाने जस्टिनच्या आईसाठी म्हणजेच पॅट्रिशिया मॅलेट यांच्यासाठी खास ड्रेस डिझाईन केला आहे.   रिद्धीमा कपूर साहनी जस्टिनच्या आईला प्लॅटिनम, सोनं आणि रुबी यांचं एकत्रिकरण असलेला एक नेकलेस देणार आहे. ज्यामध्ये मारकीज हिरा त्या नेकलेसची शोभा   वाढवणार आहे. अमित अग्रवालने खादी, रागिनी आहुजा बॉम्बर जॅकेट तर प्रसेनजीत दास जस्टीनला हाताने पेंट केलेला डेनिम जॅकेट देणार आहेत. मानव गंगवानी बीला जोडे आणि टोपी भेट करणार आहेत.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :