मुंबईत येणाऱ्या जस्टिन बीबरची डिमांड लिस्ट झाली व्हायरल; वाचाल तर व्हाल अवाक्!!

आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बीबर येत्या १० मे रोजी लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टसाठी मुंबई येथे येत आहे. जस्टिन पहिल्यांदाच भारतात येत असल्याने त्याच्या भारतीय फॅन्समध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.

मुंबईत येणाऱ्या जस्टिन बीबरची डिमांड लिस्ट झाली व्हायरल; वाचाल तर व्हाल अवाक्!!
Published: 04 May 2017 04:25 PM  Updated: 04 May 2017 04:27 PM

आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बीबर येत्या १० मे रोजी लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टसाठी मुंबई येथे येत आहे. जस्टिन पहिल्यांदाच भारतात येत असल्याने त्याच्या भारतीय फॅन्समध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. परंतु भारतात येण्यासाठी बीबरने ठेवलेल्या डिमांड या धक्कादायक असून, सध्या त्याची ही डिमांड लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही लिस्ट आयोजक व्हाइट फॉक्स इंडिया कंपनीच्या नावे असून, अर्जुन एस. रवि या नावाच्या व्यक्तीने ती ट्विटरवर शेअर केली आहे. 

जस्टिन बीबरची डिमांड लिस्ट...
- सिक्युरिटीच्या मुद्द्यानुसार एक नव्हे तर दोन फाइव्ह स्टार हॉटेल बुक केले जाणार आहेत. हॉटेलमध्ये जवळपास १३ रूम्स बुक केल्या जाणार आहेत. 
- ड्रेसिंग रूमचे सर्व पडदे पांढºया रंगाचे असायला हवेत. शिवाय रूममध्ये काचेचा दरवाजा असलेला फ्रीज असायला हवा. 
- बीबरच्या रूममध्ये पाण्याच्या २४ बॉटल्स, चार एनर्जी ड्रिंक, सहा विटॅमिन वॉटरच्या बॉटल, सहा क्रीम सोडा आणि चार नॅचरल ज्यूस अशी व्यवस्था असायला हवी.  
- जेवणाच्या साहित्यामध्ये रॅन्च सॉस, डाइस्ड फ्रुट, नारळ पाणी, बादाम शेक, प्रोटीन पाऊडर, आॅरगॅनिक मध, केळी, हर्बल टी, बी नसलेली द्राक्ष आदी पदार्थ असावेत. 
- रूममध्ये इन्स्ट्रुमेंट्स लावण्यासाठी आठ पॉवर आउटलेट्स आणि १२ रूमाल. संपूर्ण टीमसाठी व्हाइट क्रू नेक टीशर्ट आणि लो-राइस व्हाइट सॉक्स असावेत. 
- याव्यतिरिक्त बीबरने स्पष्टपणे सांगितल्यानुसार त्याच्या रूमजवळ लिलीची फुले नसावीत. 

- याव्यतिरिक्त बीबरच्या संपूर्ण टीमला हॉटेलपर्यंत जाण्यासाठी १० लक्झरी सिडान कार आणि दोन व्हॉल्व्हो बस बुक करण्यास सांगितले आहे. टीमच्या संरक्षणासाठी महाराष्टÑ पोलिसांकडून झेड प्लस सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे. 
- बीबरची कॉन्सर्ट डी. वाय. पाटील स्टेडियम येथे आयोजित केली आहे. तत्पूर्वी तो रॉल्स रॉयज कारने हॉटेलला जाणार आहे. तेथून तो हेलिकॉप्टरने थेट स्टेडियमला उतरणार आहे. 
- या कॅनेडियन गायकाच्या डिमांड लक्षात घेऊन आयोजकांना त्याच्यासाठी एक प्रायव्हेट जेट बुक करावे लागणार आहे. 
- कारण बीबर त्याच्या टीमसोबत तब्बल १० कंटेनर एवढे साहित्य घेऊन येणार आहे. यामध्ये टेबल टेनिसचे टेबल, प्ले स्टेशन, सोफा सेट, वॉशिंग मशीन, रेफ्रीजरेटर, वॉर्डरोब कपबर्ड आणि मसाज टेबल यांचा समावेश आहे. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :