shocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप! चाहत्यांना धक्का!!

लोकप्रीय अमेरिकन अभिनेता आणि रेसलर जॉन सीना आपल्या फाईट्सशिवाय रोमान्ससाठीही चर्चेत असतो. २०१२ मध्ये अशाच एका फाईट्सदरम्यान जॉनने निकी बेला हिला रिंगमध्येच प्रपोज केले होते.

shocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप! चाहत्यांना धक्का!!
Published: 16 Apr 2018 02:25 PM  Updated: 16 Apr 2018 02:25 PM

लोकप्रीय अमेरिकन अभिनेता आणि रेसलर जॉन सीना  आपल्या फाईट्सशिवाय रोमान्ससाठीही चर्चेत असतो. २०१२ मध्ये अशाच एका फाईट्सदरम्यान जॉनने  निकी बेला हिला रिंगमध्येच प्रपोज केले होते. निकी बेला ही सुद्धा डब्ल्यूडब्ल्यूईची रेसलर आहे. यानंतर डब्ल्यूडब्ल्यूईच्या या लोकप्रीय जोडीचा रोमान्स चांगला फुलला होता. गेल्या सहा वर्षांत तर  पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ४० वर्षांचा जॉन आणि ३४ वर्षांच्या निकीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांचा साखरपुडा झाला होता आणि आजपासून उण्यापु-या तीन आठवड्यांनी म्हणजे येत्या ५ मे रोजी हे लोकप्रीय कपल लग्नबंधनात अडकणार होते. लग्नबंधनात अडकणार होते, असे यासाठी की,आता हे लग्न मोडले आहे.होय, जॉन आणि निकी यांचे लग्नाच्या ऐन तीन आठवड्यांपूर्वी ब्रेकअप झालेय. खुद्द जॉन आणि निकी या दोघांनी सोशल मीडियावरून ब्रेकअपची बातमी जाहीर केली. चाहत्यांना ब्रेकअपची बातमी देताना निकी भावूक झालेली दिसली. ‘हा निर्णय अतिशय कठीण होता. बे्रकअपनंतरही आमच्यातील प्रेम आणि एकमेकांप्रतिचा आदर टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्ही एकत्र अनेक आनंदी क्षण घालवले आहेत,’असे निकीने लिहिले आहे.
निश्चितपणे लग्नाच्या काही आठवड्यांपूर्वी जॉन व निकीच्या अचानक झालेल्या बे्रकअपच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अलीकडे एका मुलाखतीत जॉन निकीसोबतच्या प्रेमसंबंधांवर बोलला होता. पाच वर्षे एकत्र घालवल्यानंतर असे वाटतेयं की, प्रेम करणे सोपे नाही. सगळ्यांच्या नात्यात असतात तशा काही अडचणी, मतभेद आमच्यातही आहेत. अनेकदा मी दु:खी होतो. पण नंतर मला मी तिच्याशिवाय जगू शकणार नाही, याची जाणीव होते,असे जॉन म्हणाला होता.

RELATED ARTICLES


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :