मृत्यूनंतरही हा सेलिब्रिटी कमावतो दरवर्षी कोट्यवधी रुपये !

केवळ २०१२ या वर्षाचा अपवाद वगळता मृत सेलिब्रिटींच्या कमाईच्या यादीत तो सर्वोच्च स्थानावर आहे. या टॉप टेन यादीत अलबर्ट आइन्स्टाईन यांचं नावही आहे. ते अजूनही दरवर्षी 6 कोटी रुपयांची कमाई करतात. 62 वर्षांपूर्वी अलबर्ट आईन्स्टाईन यांचं निधन झालंय. मात्र विज्ञानाच्या अनेक सिद्धांताचे परवाने आइन्स्टाईन यांच्या नावावर आहेत.

मृत्यूनंतरही हा सेलिब्रिटी कमावतो दरवर्षी कोट्यवधी रुपये !
Published: 07 Nov 2017 11:25 AM  Updated: 07 Nov 2017 11:25 AM



सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. सेलिब्रिटींची लोकप्रियता त्यांच्या मृत्यूनंतरही कमी होत नाही. अशीच काहीशी बाब समोर आली आहे. मृत्यूनंतरही दरमहा कोट्यवधी कमावणा-या सेलिब्रिटींची यादीच समोर आली आहे. यांत बड्या बड्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. फोर्ब्सनं ही यादी जाहिर केली आहे. या यादीत पॉप स्टार मायकेल जॅक्सन अव्वल स्थानावर आहे. किंग ऑफ पॉप नावाने प्रसिद्ध असलेल्या मायकेलची लोकप्रियता त्याच्या मृत्यूनंतरही घटलेली नाही. 2009 साली ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मायकेलचा मृत्यू झाल्यानंतरही तो कोट्यवधीची कमाई करतो आहे. मायकेल दरवर्षी 48 कोटी रुपये कमावत आहे. आजही, त्याच्या संगीत कंपनीत त्याची भागीदारी आहे आणि त्याच्या संगीताची रॉयल्टी वेगळी आहे. या कमाईत सोनी/एटीव्ही म्युझिक पब्लिशिंग कॅटलॉगमध्ये मायकल जॅक्सनच्या नावे शेअर विकून होणा-या उत्पन्नाचाही समावेश आहे.गेल्या वर्षाच्या अखेरीस मायकेलची कमाई साडेचारशे कोटी इतकी होती. केवळ २०१२ या वर्षाचा अपवाद वगळता मृत सेलिब्रिटींच्या कमाईच्या यादीत तो सर्वोच्च स्थानावर आहे. या टॉप टेन यादीत अलबर्ट आइन्स्टाईन यांचं नावही आहे. ते अजूनही दरवर्षी 6 कोटी रुपयांची कमाई करतात. 62 वर्षांपूर्वी अलबर्ट आईन्स्टाईन यांचं निधन झालंय. मात्र विज्ञानाच्या अनेक सिद्धांताचे परवाने आइन्स्टाईन यांच्या नावावर आहेत. त्याची रॉयल्टी त्यांना आजही मिळते. मायकेल जॅक्सन, आईन्स्टाईन यांच्याशिवाय फोर्ब्सच्या या टॉप टेन यादीत बॉब मार्ले, जॉन लेनन, आर्नोल्ड पामर, आणि चार्ल्स शुल्ज यांचाही समावेश आहे.दुस-या स्थानावर कार्टूनिस्ट चार्ल्स एम. शुल्ज हा आहे. मात्र चार्ल्स आणि मायकलच्या कमाईत खूप अंतर आहे.मात्र मायकलची वर्षभरातील कमाईचा आकडा पाहता आजही मायकेल जॅक्सनची जादू कमी झालेली नाहीय हेच यावरून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :