प्रियांका चोप्राला तोडायचा आहे ड्वेन जॉन्सन आणि झॅक अ‍ॅफ्रॉनचा ‘दोस्ताना’

उन्हाळ्याच्या गरमीमध्ये मियामीच्या किनाऱ्यावर सुपरसेक्सी प्रियांकाच्या अदा पाहण्यासाठी चाहते आतूर झालेले आहे. ‘सुपर बॉऊल’च्या मध्यांतरामध्ये दाखवण्यासाठी ‘बेवॉच’चे स्पेशल ट्रेलर तयार केले असून प्रियांकाने त्याची एक झलक तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली.

प्रियांका चोप्राला तोडायचा आहे ड्वेन जॉन्सन आणि झॅक अ‍ॅफ्रॉनचा ‘दोस्ताना’
Published: 06 Feb 2017 12:43 PM  Updated: 06 Feb 2017 12:43 PM

आजकाल प्रियांका चोप्रा म्हटले की लगेच ‘बेवॉच’चा उल्लेख येतो. उन्हाळ्याच्या गरमीमध्ये मियामीच्या किनाऱ्यावर सुपरसेक्सी प्रियांकाच्या अदा पाहण्यासाठी चाहते आतूर झालेले आहेत. चित्रपट प्रदर्शित व्हायला अजून जरी काही महिने जायचे असले तरी चाहत्यांच्या उत्सुकतेला आणखी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी एक नवे ट्रेलर लाँच केले आहे.

अमेरिकेतील सर्वात मोठा इव्हेंट ‘सुपर बॉऊल’च्या मध्यांतरामध्ये दाखवण्यासाठी ‘बेवॉच’चे स्पेशल ट्रेलर तयार केले असून प्रियांकाने त्याची एक झलक तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली. टीझरमध्ये ड्वेन जॉन्सन (द रॉक) आणि झॅक अफ्रॉननचा दोस्ताना किंवा ‘ब्रोमान्स’ पाहायला मिळतो.
 

 

A video posted by Priyanka Chopra (@priyankachopra) on


‘तुम्ही जेव्हा सुपर बॉऊलमध्ये मॅच पाहत असता, तेव्हा ते किनाऱ्यावर लक्ष ठेवून असतात’ अशा सूचनेने टीझरची सुरूवात होते. मग झॅक आणि द रॉकच्या कामातील गंमती-जंमती दाखवण्यात येतात. प्रियांका या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत असून ती या दोघांचा दोस्ताना तोडण्याचे प्रयत्न करतेय.
 
 

A video posted by therock (@therock) on


या टीझरमध्ये शेवटी झॅक त्याची पँट फाडून फेकून देतो तेव्हा त्याने अमेरिकेतचा झेंडा असलेली अंडरवेअर घातलेली दिसते. द रॉक त्याला विचारतो की, हे तु काय घातले आहे? झॅक म्हणतो, ‘स्वातंत्र्य’. ड्वेन जॉन्सनने शेअर केलेल्या एका मजेशीर व्हिडिओमध्ये तो आणि नॅशनल फूटबॉल लीग खेळाडू रॉब ग्रॉन्कोवस्की ‘बेवॉच’चे आयकॉन ‘स्लोमोशन रन’ करताना दिसतात. 
 
 

A video posted by therock (@therock) on


ड्वेन ग्रॉन्कोवस्कीला सांगतो की, सुपर बॉऊल आणि तुझी लोकप्रियता जरी खूप असली तरी ‘बेवॉच’ स्लो मोशन रनसुद्धा तितकेच प्रसिद्ध आहे. त्यावर ग्रॉनको म्हणतो की, कदाचित आमच्यापेक्षा जास्त असेल. ‘हा तर तुझ्या मनाचा मोठेपणा आहे’, असे रॉक म्हणतो.

ALSO READ: ​‘या’ चित्रपटात प्रियांका चोप्रा साकारणार वेश्या!


दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया नच बलियेचे विजेते ठरतील का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :