...अबब जस्टिन चक्क रेस्टॉरंटमध्ये

​ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड विजेता गायक जस्टिन बीबर चर्चेत राहण्यासाठी नेहमीच काही ना काही पराक्रम करीत असतो. कधी पबमध्ये गोंधळ तर कधी आपल्या नव्या गर्लफ्रेंडवरून तो चर्चेत असतो. यावेळेस तो ब्रिटन दौºयात चक्क एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांची चव चाखताना बघावयास मिळाला. नेहमीच पब किंवा नाइटक्लबमध्ये रात्र घालविणारा जस्टिन चक्क रेस्टॉरंटमध्ये बघावयास मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

...अबब जस्टिन चक्क रेस्टॉरंटमध्ये
Published: 03 Nov 2016 02:22 AM  Updated: 02 Nov 2016 08:52 PM

ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड विजेता गायक जस्टिन बीबर चर्चेत राहण्यासाठी नेहमीच काही ना काही पराक्रम करीत असतो. कधी पबमध्ये गोंधळ तर कधी आपल्या नव्या गर्लफ्रेंडवरून तो चर्चेत असतो. यावेळेस तो ब्रिटन दौºयात चक्क एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांची चव चाखताना बघावयास मिळाला. नेहमीच पब किंवा नाइटक्लबमध्ये रात्र घालविणारा जस्टिन चक्क रेस्टॉरंटमध्ये बघावयास मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार जस्टिन त्याच्या पर्पस वर्ल्ड टूरदरम्यान दोन रात्रींसाठी ब्रिटनच्या एसएसई हायड्रो एरेना येथे होता. ‘द सन’ने दिलेल्या माहितीनुसार जस्टिनने स्थानिक ब्लू लॅगून चिप शॉपमध्ये ‘इर्न ब्रू’ आणि ‘डीप फ्राइड हॅगिस’ या पदार्थांची चव चाखली. 
रेस्टॉरंटचे मालक सिमोन वारेसे यांनी सांगितले की, जस्टिनने आमच्या रेस्टॉरंटमध्ये येऊन स्थानिक पदार्थांची चव चाखल्याने आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो. गेल्या शनिवारी आम्हाला त्याची सेवा करण्याची संधी मिळाली. पुढे बोलताना सिमोन म्हणाले की, जस्टिन जेव्हा आमच्या रेस्टॉरंटमध्ये आला तेव्हा त्याने टोपी घातलेली होती. त्याच्यासोबत दोन बाउंसरही होते. तिघेही चांगलेच जोशमध्ये होते. जेव्हा आम्ही त्यांना मेनू कार्ड दिले तेव्हा त्यांनी पदार्थांविषयी कमेण्ट करीत दोन-तीन पदार्थ आॅर्डर केले. बराच वेळ ते रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते. जस्टिन स्वत: आमच्या रेस्टॉरंटमध्ये आल्याने सर्वच स्टाफ उत्साहित होता. त्यामुळे त्याने स्थानिक खाद्यपदार्थांविषयी केलेल्या वक्तव्यांचे फारसे गांभीर्याने घेतले नाही. 
दरम्यान जस्टिन नाइटक्लब किंवा पबमध्ये न जाता त्याने स्थानिक रेस्टॉरंटमध्ये हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण वर्ल्ड टूरदरम्यान जस्टिन शक्यतो नाइटक्लबमध्ये रात्र व्यतित करीत असतो. तसेच यावरून तो नेहमीच वादातही सापडत असतो. 



पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :