काय सांगता! जस्टीन बीबर करणार मुंबईत परफॉर्म?

‘बेबी’ स्टार जस्टीन बीबर लवकरच भारतात येऊन लाईव्ह शो करू शकतो, अशी चर्चा मनोरंजन वर्तुळात सुरू आहे. येथून पुढे मोठमोठ विदेशी सेलिब्रेटींना देशात आणण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी वाचा...

काय सांगता! जस्टीन बीबर करणार मुंबईत परफॉर्म?
Published: 07 Jan 2017 09:34 PM  Updated: 07 Jan 2017 04:04 PM

संगीतप्रेमींसाठी आमच्याकडे एक खुश खबर आहे. सिंगिंग सेन्सेशन जस्टीन बीबर लवकरच भारतात येऊन परफॉर्म करणार आहे. संपूर्ण जगाला वेड लावलेल्या या पॉप स्टारचा लाईव्ह शो मुंबईत आयोजित करण्याची जोरदार तयारी सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे सर्व काही जमून आले तर येत्या मे महिन्यात जस्टीन बीबर आपल्याला स्टेजवर लाईव्ह गाताना दिसणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी मुंबईत ‘कोल्डप्ले’ या आंतरराष्ट्रीय बँडचा लाईव्ह शो यशस्वीरीत्या आयोजित केल्यानंतर प्रेक्षकांचा मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता त्याहून मोठा शो आॅर्गनाईझ करण्याचे प्रयत्न केले जात असल्याची इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे. तूर्तास याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी जस्टीन बीबरच्या शोची शक्यता वाढली आहे.

‘कोल्डप्ले’च्या शोमुळे आंतरराष्ट्रीय स्टार्समध्येसुद्धा भारतातबाबत आकर्षण आणि विश्वास वाढला आहे. एक नवी बाजारपेठ अािण फॅनबेस येथे मिळू शकतो असे त्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे अनेक प्रसिद्ध विदेशी कलाकार भारतात अधिकाधिक लाईव्ह शो करण्यास उत्सुक आहे.

१९९५ साली ‘किंग आॅफ पॉप’ मायकल जॅक्सनचा भव्यदिव्य शो आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून मुंबईचे नाव आंतरराष्ट्रीय पटलावर मोठ्या अक्षरांत उमटले गेले. जस्टीन बीबरचे भारतात असंख्य चाहते आहेत. खासकरून तरुण मुल-मुलींमध्ये त्याची खूप क्रेझ आहे. त्यामुळे त्याला लाईव्ह पाहण्यासाठी लोकांची गर्दी उफाळून येईल असे म्हटले तर वावगे ठरू नये.

Justin
सिंगिंग सेन्सेशन : जस्टीन बीबर

नुकतेच बीबरने ‘अमेरिक न म्युझिक अवॉर्ड्स’मध्ये सर्वाधिक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. यामध्ये ‘व्हिडिओ आॅफ द इयर’ (सॉरी), ‘फेव्हरेट मेल आर्टिस्ट पॉप/रॉक’ आणि ‘फेव्हरेट अल्बम पॉप/रॉक’ या कॅटेगरीज्मध्ये त्याने बाजी मारली. ‘बेबी’ गाण्यामुळे प्रकाश झोतात आलेल्या जस्टीनने वयाच्या केवळ २२ व्या वर्षी ड्रेक, द विकेंड, एडेल यासारख्या दिग्गज कलावंतांना मागे टाकले.

जस्टीन त्याच्या खासगी जीवनातील अफेयर्समुळेदेखील नेहमीच चर्चेत असतो. तसेच तो विलासी व सुखवस्तू जीवनशैलीसाठी तो ओळखला जातो. गेल्या वर्षी त्याने दिलखुलास पार्टी करण्यासाठी लंडनमध्ये एक आलिशान घर किरायाने घेतले आहे. लंडन स्थित २४ हजार चौ. फुट क्षेत्रफळावर पसरलेल्या या घराचा किराया दरमाह १.०८ लाख पाऊंड (८८.६१ लाख रुपये) एवढा आहे.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :