जस्टिन बीबरने लावला चुना; फॅन्सच्या भावना!!

​गेल्या बुधवारी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयोजित केलेल्या इंटरनॅशनल पॉप गायक जस्टिन बीबर याच्या लाइव्ह कॉन्सर्टसाठी ५० हजारांपेक्षा अधिक बिलिबर्सनी उपस्थिती लावली होती.

जस्टिन बीबरने लावला चुना; फॅन्सच्या भावना!!
Published: 12 May 2017 10:53 PM  Updated: 12 May 2017 10:55 PM

गेल्या बुधवारी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयोजित केलेल्या इंटरनॅशनल पॉप गायक जस्टिन बीबर याच्या लाइव्ह कॉन्सर्टसाठी ५० हजारांपेक्षा अधिक बिलिबर्सनी उपस्थिती लावली होती. संपूर्ण स्टेडियममध्ये एकच नाव होते ते म्हणजे जस्टिन-जस्टिन. त्याचे फॅन्स म्युझिकच्या तालावर अक्षरश: नाचत होते. काहींनी तर तब्बल ७६ हजार रुपयांची तिकिटे काढली होती; मात्र जस्टिनने केवळ लिप सिंक करीत परफॉर्मन्स केल्याने उपस्थितांची घोर निराशा झाली आहे. त्याचबरोबर बीबरने चुना लावल्याच्या भावनाही फॅन्सकडून व्यक्त केल्या जात आहे. 

जस्टिनच्या या कारनाम्यामुळे केवळ त्याचे फॅन्स नव्हे तर बॉलिवूड सेलेब्सही हैराण आहेत. अभिनेत्री सोनाली बेद्रे हिने तर जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत बीबरच्या या शोचे वाभाडे काढले. आपल्या मुलासोबत कॉन्सर्टसाठी पोहोचलेल्या सोनालीने कॉन्सर्ट संपल्यानंतर जस्टिनचा परफॉर्मन्स बघणे म्हणजे वेस्ट आॅफ टाइम असल्याचे म्हटले होते. शिवाय त्याने बरेचसे गाणे गायिले नसून, केवळ लिप सिंक केल्याकडेही एकप्रकारे इशारा केला होता. केवळ सोनालीच नव्हे तर अनुराग बसू हेही जस्टिनच्या परफॉर्मन्सने फारसे प्रभावित झाले नव्हते. आपल्या मुलीसोबत कॉन्सर्ट बघण्यासाठी गेलेल्या अनुराग यांनी जस्टिनला कोल्ड वॉटर गायक असे म्हटले. अनुरागने मीडियाशी बोलताना म्हटले होते की, जर जस्टिनने सर्व गाणी लाइव्ह गायिली असती तर मला आनंद झाला असता. त्याने फक्त चारच गाणी लाइव्ह गायिली. ज्यापद्धतीने जगभरात जस्टिनचे नाव आहे, त्यावरून त्याने लाइव्ह परफॉर्मन्स करणे अपेक्षित होते. जस्टिनचा हा शो घोर निराशा करणारा ठरला.’या कॉन्सर्ट उपस्थित असलेल्या एका फॅन्सने म्हटले की, मी कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्येही सहभागी झालो होतो. मला असे वाटते की, जस्टिनच्या कॉन्सर्टच्या तुलनेत कोल्डप्ले कॉन्सर्ट अधिक चांगली झाली होती. जस्टिनच्या परफॉर्मन्समध्ये ऊर्जा कमी होती. त्यापेक्षाही वाईट म्हणजे त्याने बºयाचशा गाण्यांमध्ये फक्त ओठ हलविले. पुण्यातून मुंबई आलेल्या अन् तब्बल ३६ हजार रुपयांचे प्रत्येकी तिकीट घेतलेल्या एका दाम्पत्याने तर जस्टिनने चुना लावल्याचे उघडपणे सांगितले. या दाम्पत्याने म्हटले की, बीबरच्या या कॉन्सर्टमुळे बीबरविषयीचा उत्साहच कमी झाला. कारण हे स्पष्टपणे दिसत होते की, बीबर गात नव्हताच. असो, फॅन्सच्या या आरोपाला जस्टिन उत्तर देणार की, यावर पाणी फेरणार हे बघणे मजेशीर असेल. पण पहिल्यांदाच भारतात आलेल्या जस्टिनने अशाप्रकारे हजारो फॅन्सची निराशा करणे हे न पटणारे आहे, हेही तेवढेच खरे म्हणावे लागेल. 


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :