हेअरस्टाईलिस्टने ठोकला ग्वेन स्टेफनीवर १७० कोटींचा दावा!

‘द व्हॉईस’ जज आणि सिंगर ग्वेन स्टेफनीने ‘स्पार्क द फायर’ हे गाणे रिचर्ड मॉरिल या तिच्या पूर्वी हेअरस्टाईलिस्टच्या ‘व्हूज् गॉट माय लायटर’ या गाण्यांवरून कॉपी करण्यात आले आहे, असा कोर्टात दाव करण्यात आला. त्याबदल्यात मॉरिलने १७० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

हेअरस्टाईलिस्टने ठोकला ग्वेन स्टेफनीवर १७० कोटींचा दावा!
Published: 16 Jan 2017 12:14 AM  Updated: 15 Jan 2017 06:44 PM

सुपरस्टार सिंगर ग्वेन स्टेफनीवर तिच्या पूर्व हेअरस्टायलिस्ट रिचर्ड मॉरिलने सुमारे १७० कोटी रुपयांचा (२५ मिलियन डॉलर्स) दावा ठोकला आहे. आता स्टायलिस्ट तिच्यावर एवढा मोठा दावा का करेल असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचे उत्तरही आमच्याकडे आहे.

त्याचे झाले असे की, ग्वेनने बनवलेले ‘स्पार्क द फायर’ हे गाणे चोरीचे असून माझ्या ‘व्हूज् गॉट माय लायटर’ या मूळ गाण्यापासून ते कॉपी करून तयार केल्याचा आरोप रिचर्ड केला आहे. फॅरेल विल्यम्ससोबत मिळनू ग्वेनने २०१४ साली ‘स्पार्क द फायर’ हे गाणे रिलीज केले होते.

रिचर्डच्या मते, दोन्ही गाण्यांमध्ये खूपच साम्य असून त्याची चाल, गीत आणि कोरस एकमेकांशी मिळतेजुळते आहे. परंतु तिने माझे नाव श्रेयावलीमध्ये दिले नाही आणि मला रॉयल्टीसुद्धा दिली नसल्यामुळे मी तिच्यावर २५ मिलियन डॉलर्सचा दावा करत आहे. यात फॅरेल आणि इंटरस्कोप रेकॉर्ड्ससुद्धा दोषी आहेत.

Pharell with Gwen
स्पार्क द फायर : फॅरेल विल्यम्स आणि ग्वेन स्टेफनी

कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, १९९६ साली त्याने ‘व्हूज् गॉट माय लायटर’ हे गाणे बनवले होते. एके दिवशी जेव्हा ग्वेन त्याच्याकडे केसांना रंगवण्यासाठी आली होती तेव्हा ते गाणे म्युझिक सिस्टिमवर सुरू होते. ते तिला खूप आवडले. तिने गाण्याची एक सीडीसुद्धा सोबत नेली. २०१४ साली एका मित्राने त्याला ‘स्पार्क द फायर’ हे गाणे ऐकवले तेव्हा त्याला तर आश्चर्यच वाटले.

फॅ रेल आणि ग्वेनचे हे गाणे अनेक ब्रँड्सच्या जाहिराती, चित्रपट, न्यू इयर स्पेशल आणि पुरस्कार सोहळ्यांत वापरले गेले. त्यातून त्यांना सुमारे १७० कोटी रुपयांची कमाई झाली. दोन्ही गाण्यांचे ऱ्हीदम, मेलडी आणि कोरसमधील पार्श्वसंगीत एकसारखेच आहे. ते गायलेदेखील एकाच पट्टीत आहेत. तिने अशाप्रकारे थेट नक्कल करून कॉपीराईट अ‍ॅक्टचा भंग केल्याचा आरोप मॉरिलने केला आहे.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :