Interesting : ​‘या’ महिलेचे वय सांगा पाहू, अंदाज चुकीचा ठरेल !

विशेष म्हणजे तिच्या वयाचा अंदाज सांगताना बहुतांश लोक चुकत आहेत. अन तिचे वय समजल्यावर विचारात पडत आहेत.

Interesting : ​‘या’ महिलेचे वय सांगा पाहू, अंदाज चुकीचा ठरेल !
Published: 22 Jun 2017 03:47 PM  Updated: 22 Jun 2017 03:47 PM

सोशल मीडियावर एका महिलेचे फोटो खूपच व्हायरल होत असून तिचे फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसत आहे. विशेष म्हणजे तिच्या वयाचा अंदाज सांगताना बहुतांश लोक चुकत आहेत. तैवान मध्ये राहणारी ल्यूर हू हे त्या महिलेचे नाव असून तिचे वय समजल्यावर लोक विचारात पडत आहेत. 
ल्यूरला प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर ती विद्यार्थीनीसारखीच वाटते. मात्र ल्यूर ही व्यवसायाने डिझायनर असून दिसायला अत्यंत सुंदर आणि तरुण आहे. मात्र ती स्टुडंट नसून तिचे वय ४१ वर्ष आहे. तिच्या फिटनेसचे रहस्य म्हणजे ती खूप पाणी पिते आणि भाज्या खाते.

Image result for Taiwanese Designer Lure Hsu

ल्यूरची लहान बहीण शेरोन हू ही ३५ वर्षाची असून ती अ‍ॅक्ट्रेस आहे. २०१५ मध्ये एका कार्यक्रमात ल्यूर तिच्याबरोबर गेली असताना त्यावेळी लोकांनी तिला पहिल्यांदा पाहिले. त्याचवर्षी आॅगस्टमध्ये शेरोनने सोशल साइट फेसबूकवर ल्यूरच्या ४० व्या बर्थडेचे फोटो शेयर केले. ल्यूरच्या वयाबाबत समजल्यानंतर तिच्या फॅन्सना धक्काच बसला. कारण चेहऱ्यावर सुरकुत्या नसल्याने ती तरुण मुलगीच दिसते.

Image result for Taiwanese Designer Lure Hsu

सोशल साइटवर लाखो फॉलोअर्स 
सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येत लोक तिला फॉलो करत आहेत. इन्स्टाग्रामवर सुमारे अडीच लाख लोक तिला फॉलो करतात. तर फेसबूकवर सुमारे साडे तीन लाख लाइक आहेत. नुकतीच ती पुन्हा एकदा तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. चर्चेत आल्यानंतर ल्यूरही तिच्या बहिणीसारखी स्टार बनली आहे. 

Image result for Taiwanese Designer Lure Hsu


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :