बेवॉच हॉटनेस : पाहा ड्वेन जॉन्सन आणि झॅक अ‍ॅफ्रॉनचा हा सेक्सी अंदाज

आगामी ‘बेवॉच’ सिनेमातील ड्वेन जॉन्सन (द रॉक) आणि झॅक अ‍ॅफ्रॉनचे लूक पिक्स बाहेर आले आहेत. बॉलीवूडची देसी गर्ल खलनायिका असणारा हा चित्रपट येत्या २६ मे रोजी रिलीज होणार आहे.

बेवॉच हॉटनेस : पाहा ड्वेन जॉन्सन आणि झॅक अ‍ॅफ्रॉनचा हा सेक्सी अंदाज
Published: 24 Dec 2016 08:35 PM  Updated: 24 Dec 2016 03:05 PM

ऐंशीच्या दशकात धुमाकुळ घातलेल्या ‘बेवॉच’ या टीव्ही मालिकेचा रिमेक चित्रपट सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे. ड्वेन जॉन्सन (द रॉक), झॅक अ‍ॅफ्रॉन, अ‍ॅक्झांन्ड्रा डॅडॅरिओ आणि आपली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा स्टारर या चित्रपटाचे नुकतेच ट्रेलर रिलीज करण्यात आले.

त्यानंतर आता सिनेमाचे प्रमुख अभिनेत्यांचा लूकसुद्धा लाँच करण्यात आला आहे. रॉक आणि झॅक अ‍ॅफ्रॉनचा हा फोटो इंटरनेटवर खूप गाजत आहे. समुद्रातून बाहेर पडताना शर्टलेस ड्वेन आणि पीळदार शरीरयष्टीचा झॅक एकदम सेक्सी दिसत आहेत.

फ्लोरिडामध्ये शूटींग सुरू झाल्यापासून मीडियाने त्यांचे फोटो घेण्यासाठी सेटबाहेर ठाण मांडलेले होते. अखेर अधिकृत फोटो आता रिलीज करण्यात आला आहे. दिग्दर्शक सेठ गॉर्डन म्हणतो की, ‘समुद्रकिनाऱ्यावर शूटींग करताना मीडिया आणि फोटोग्राफर्सने आम्हाला हैराण करून सोडले होते.’

                                          

‘बेवॉच’ टीव्ही मालिकेत डेव्हिड हॅसेलहॉफ आणि पॅमेला अँडरसन यांनी भूमिका केल्या होत्या. चित्रपटात ते पाहुणे कलाकारांच्या रुपात दिसणार आहेत. मालिके तील अनेक आयकॉनिक गोष्टी सिनेमात समाविष्ट करण्यात आल्या असल्याची माहिती गॉर्डनने दिली.


पब्लिसिटीसाठी इशा गुप्ता करतेय का बोल्ड फोटोशूट?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :