'सुलतान' : फुल आॅन सलमान

'सुलतान' : फुल आॅन सलमान विषयी आणखी काही

cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

'सुलतान' : फुल आॅन सलमान

जान्हवी सामंत 

नेहमीप्रमाणे सलमान त्याच्या चाहत्यांसाठी सिनेमाच्या रुपात 'ईदी' घेवून आलाय. अर्थात रूपेरी  पडद्यावर 'सुलतान' दाखल झालाय... मोठ्या जल्लोषात रूपेरी पडद्यावर रंगतोय एक कुस्तीचा आखाडा..., संपूर्ण सिनेमाचा भार हा सलमाननं उचलाय. त्यामुळे  सलमान म्हणजे सिनेमासाठी कॅप्टन आॅफ द शिप आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.  

कुस्तीपटू असलेल्या आरफा( अनुष्का शर्मा) नावाच्या मुलीच्या प्रेमात सुलतान (सलमान खान)  पडतो. सलमान हा साधा  डीश टीव्ही आॅपरेटर असतो आणि एका साधारण माणसाबरोबर आरफाला तिचं भावी आयुष्य घालवायचे नसते. आॅलम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धा जिंकलेल्या कुस्तीपटूसोबत लग्न करण्याचं तिचं स्वप्न असतं. तिच्या प्रेमापोटी सुलतान कुस्तीपटू बनण्याचा निर्णय घेतो. सहजपणे तो राज्य पातळीवर कुस्तीच्या स्पर्धा जिंकून बक्षिसंही मिळवतो. त्याच्या या कुस्तीच्या यशामुळे आरफा सुलतानच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्नही करते.  

सलमानने साकारलेला हरियानवी सुलतान भाव खावून जातो, मात्र अनुष्कानं साकारलेली पंजाबी कुडी सलमान समोर फिकी पडते, याआधीही अनेक सिनेमात तिने पंजाबी कुडी साकारलीय त्यामुळे तिच्या भूमिकेत असं फारसं नाविन्य जाणवत नाही. अब्बास जाफरच्या दिग्दर्शनामुळे ही फिल्म  एका ईसीजी (ELECTRONIC CARDIOGRAM  ) प्रमाणे वाटते.  मध्येच सिनेमाला गती येते तर कधी त्याचा वेग मंदावतो, तर सिनेमा कधी रटाळ तर कधी इंटरेस्टींग वाटतो. उगाच काही गोष्टी सिनेमात ओढून ताणून टाकलेल्या वाटतात, जे आरामात टाळता आलं असतं.  पूर्वी 90च्या दशकातल्या मिथुन चक्रवर्तीच्या सिनेमामध्ये असा मेलोड्रामा बघायला मिळायचा. उगाच ओढून ताणून काही गोष्टी टाकल्या जायच्या. त्याचप्रकारे काहीसं सुलतानबद्दल झालंय असं आवर्जुन म्हणावं लागेल. या सिनेमाची 30 मिनिटाची  लांबी कमी करता आली असती असं सिनेमा पाहतांना सतत वाटत राहतं. 

सिनेमाचा गावरान बाज मनाला भिडतो. सिनेमाची दोन भागात मांडणी करण्यात आलीय. पहिल्या भागात सलमान 20 वर्षाच्या युवकाची भूमिका साकारतो.  विशेष म्हणजे सिनेमात ब-याच वेळा सलमान शर्टलेस दिसतो. त्यामुळे त्याच्या अंदाजावर शिट्या -टाळ्यांचा वर्षांव होतो. त्याचा सुलतान बनण्यापासून ते त्याच्या प्रेम मिळवण्यापर्यंतचा काळ अतिशय चांगल्या प्रकारे मांडण्यात आलाय. 

सुलतान मनोरंजन करतो का ?  तर या प्रश्नाचे उत्तर होय आहे. सलमानच्या इतर सिनेमांप्रमाणेच हा सिनेमा फुल एंटरटेनिंग आहे. सिनेमा नक्कीच पहावा. बॉक्स आॅफिसवरही सलमानच्या इतर सिनेमांप्रमाणेच तो रेकॉर्डब्रेक कमाई करणार यांत शंका नाही. सिनेमा पाहुन एकच ओळ आठवते ते म्हणजे ''शेवटी प्रत्येक कुस्तीपटूला आखाड्यात स्वत:साठी स्वत:चाच सामना करावा लागतो'' त्याचप्रमाणे सलमान दरवर्षीप्रमाणे स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या तयारीत दिसतोय. 


रेटींग: 3.5 *
स्टारकास्ट : सलमान खान,अनुष्का शर्मा,अमित संध आणि रणदिप हुड्डा 
दिग्दर्शक: अब्बास अली  जाफर 

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :