द जंगल बुक : मोगली आया... मस्ती लाया

द जंगल बुक : मोगली आया... मस्ती लाया विषयी आणखी काही

cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

द जंगल बुक : मोगली आया... मस्ती लाया

काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर झळकलेली मोगलीची कथा मुलांना प्रचंड आवडली होती. जंगल बुकवर आधारित ही कथा पुन्हा आली आहे; परंतु यावेळी ती मोठ्या पडद्यावर आहे.

'द जंगल बुक'ला हॉलीवूडने चित्रपटाचे रूप दिले आहे. त्यामुळे अ‍ॅनिमेशनपासून तांत्रिक गुणवत्तेपर्यंत एक सर्वांगसुंदर असा 'द जंगल बुक' हा चित्रपट तयार झाला आहे. 

हा चित्रपट हिंदीत डब करण्यात आला असून नाना पाटेकर, इरफान, ओमपुरी आणि प्रियंका चोप्रा आदी दिग्गजांनी विविध पात्रांना आवाज दिला आहे, तर पडद्यावर प्रत्यक्षात मोगली आहे.

ज्यांना मोगलीची कथा ठाऊक नाही त्यांच्यासाठी थोडक्यात ही कथा. मोगली (नील सेठी) हा एक मानवी मुलगा आहे. मात्र, जंगलातील लांडग्यांचा कळप त्याचा सांभाळ करतो. मोगली त्यांच्यापैकी एक बनतो. शिकारीसह प्रत्येक गोष्टीत तो त्यांच्यासोबत राहतो. 

बिल्ला बघीरा हा मोगलीचा सर्वात चांगला मित्र असून नेहमी मोगलीचे संरक्षण करत असतो. तथापि, जंगलचा राजा शेर खानला मोगली अजिबात आवडत नसतो आणि तो नेहमी त्याच्या विरोधात असतो. त्यावरूनच शेर खान आणि जंगलातील इतर प्राण्यांत संघर्ष होतो. शेर खानमुळे मोगलीला पुन्हा एकदा जंगल सोडून जाण्याची वेळ येते. 

Jungle Book

वाटेत माकडांचा कळप त्याला घेरतो. तेव्हा बिल्ला आणि बल्लू अस्वलाच्या मदतीने तो वाचतो. त्यानंतर मोगली जंगलात परतून शेरखानला मारतो आणि तेथे जंगलचा कायदा प्रस्थापित करतो. या चित्रपटाची वैशिष्ट्ये म्हणजे या एक अ‍ॅनिमेशनपटात मोगली सोडृून उर्वरित सर्व पात्रे अ‍ॅनिमेशनद्वारे तयार करण्यात आलेली आहेत.

मोगलीचे पात्र बाल कलाकार नील सेठीने वठविले आहे. आपली निरागसता आणि धाडसाद्वारे नीलने मोगलीचे पात्र जिवंत केले आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या भारदस्त आवाजाद्वारे शेरखानला खऱ्या अर्थाने खलनायकाचे रूप दिले आहे, तर अस्वलाच्या आवाजात पंजाबी फोडणी देऊन इरफानने या पात्राला मजेदार बनविले आहे. बघीराला ओमपुरी यांनी आवाज दिला आहे. प्रियंका चोप्राने मोगलीवर प्रेम करणाऱ्या जंगलातील नागिणीचा आवाज डब केला आहे. मोगलीचा सांभाळ करणारे अस्वल रक्षाला शेफाली शाहचा आवाज आहे.

अ‍ॅनिमेशनच्या प्रत्येक पातळीवर खूप परिश्रम घेण्यात आले असल्याचे चित्रपट पाहताना क्षणोक्षणी जाणवते. चित्रपट थ्री डी असल्यामुळे अ‍ॅनिमेशनचा आनंद अनेक पटीने वाढतो. 

Jungle Book

चित्रपटाच्या उणिवा :

प्रियंका चोप्राचा आवाज असलेले नागीणचे पात्र लवकर संपते. अनेक दृश्यांची लांबी जास्त आहे. 

चित्रपट का पाहावा :

परीक्षेच्या तणावातून मुक्त झालेल्या मुलांसाठी मोगलीची कथा ही एक चांगली भेट ठरू शकते. हा चित्रपट पाहताना त्यांना खूप मजा येईल. ज्यांनी टीव्हीवर मोगली पाहिलेला आहे, त्यांना आठवणींना उजाळा देता येईल. 

चित्रपट का पाहू नये :

हा अ‍ॅनिमेशन चित्रपट असून मुलांसाठी आहे. एकूण काय, तर जंगल बुक एकप्रकारे जंगल में मंगलसारखा अनुभव असून मुले त्याचा आनंद लुटतील.

दर्जा- 3.5

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :