पहिल्या सहा महिन्यात बॉक्स ऑफिसवर सन्नाटा

पहिल्या सत्रात 90 पैकी फक्त 13 हिंदी चित्रपट यशस्वी, मराठीमध्ये 60 पैकी 3 चित्रपट यशस्वी

पहिल्या सहा महिन्यात बॉक्स ऑफिसवर सन्नाटा
Published: 04 Jul 2016 06:12 PM  Updated: 04 Jul 2016 06:12 PM

पहिल्या सत्रात 90 पैकी फक्त 13 हिंदी चित्रपट यशस्वी
2016 चे पहिले सत्र बाॅक्स आॅफिससाठी तसे वाईटच गेले. या सत्रात जवळपास 90 हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले आणि यापैकी फक्त 13 चित्रपट यशस्वी झाले. त्यापैकीसुद्धा गुंतवणूक आणि त्यावरील नफा हे पाहिले तर फक्त सोनम कपूरचा नीरजा हा चित्रपट सुपरहिट या सदरात मोडतो. चित्रपटाची प्रदर्शित होण्यापर्यंतची गुंतवणूक 20 कोटीच्या जवळपास होती आणि चित्रपटाने 75 कोटीपेक्षा जास्त धंदा केला. गूंतवणूक आणि नफा या प्रमाणावर दुसऱ्या नंबरवर करण जोहर निर्मित आणि शकून बात्रा दिग्दर्शित कपूर अॅंड सन्स या चित्रपटाचा नंबर लागतो. सिध्दार्थ मल्होत्रा आणि आलिया भट ही हिट जोडी असलेल्या चित्रपटाने 73 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाची गुंतवणूक 30 कोटींच्या आसपास होती. तिसऱ्या नंबरवर टाइगर श्रॉफ आणि श्रध्दा कपूरचा बागी हा चित्रपट आहे. या चित्रपटानेसुद्धा 75 कोटींच्या आसपास गल्ला जमविला. या चित्रपटाची गुंतवणूकसुद्धा 30 कोटींच्या आसपास होती. हा चित्रपट सैराटसोबत प्रदर्शित झाला होता आणि महाराष्ट्रात याला सैराटच्या झंझावाताचा जबर फटका बसला. अर्जून कपूर आणि करिना कपूर या जोडीच्या कि आणि का या चित्रपटाने 50 कोटींच्या वर गल्ला जमविला. एअरलिफ्ट हा अक्षयकुमारच्या कारकिर्दितला एक अतिशय चांगला चित्रपट आहे. या चित्रपटाने 125 कोटींचा गल्ला जमविला. याची गूंतवणूक 90 कोटींच्या आसपास होती, अक्षय कुमारच्या हाउसफुल 3 या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटाची गुंतवणूक ही 90 कोटींच्या आसपास होती.
उडता पंजाब या चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती, त्याचा चित्रपटाला फायदा झाला. चित्रपटावरील गूंतवणूक 35 कोटींच्या जवळपास होती आणि चित्रपटाने 55 कोटींच्या वर व्यवसाय केला. यशराज फिल्म्स् आणि शाहरुख खान ही हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी निर्माते आणि कलाकार जोडी परंतु या जोडीच्या फॅन या चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही. चित्रपटाने 85 कोटींच्या आसपास धंदा केला. गेल्या कित्येक वर्षात शाहरुख खानचा चित्रपट म्हटला की तो 100 कोटींचा आकडा पार करतो असे समीकरण आहे. पण या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला नाही. वजीर या चित्रपटाने केवळ 42 कोटीच कमवले. घायल वन्स अगेनने 40 कोटींचा आकडा पार केला तर जय गंगाजलने 32 कोटी, सनम रे ने 27 कोटी आणि हिमेश रेशमियाच्या तेरा सुरुरने 20 कोटींचा गल्ला जमविला.

मराठीमध्ये 60 पैकी 3 चित्रपट यशस्वी


मराठी चित्रपटांच्या बाबतीत म्हणावयाचे तर 60 मराठी चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी फक्त 3 चित्रपट यशस्वी ठरले, यात झी स्टुडिओच्या नटरंगने 40 कोटींच्यावर रेकाॅर्ड ब्रेक व्यवसाय केला तर झी स्टुडिओच्याच सैराटने 90 कोटींचा आकडा पार करुन इतिहास घडविला. वायकाॅमच्या पोस्टर गर्ल चित्रपटाने 4 कोटींच्या वर गल्ला जमविला.  इतर 57 मराठी चित्रपटांची पार वाताहत झाली.


- एन. पी. यादव 
 ट्रेड अॅनालिस्ट 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :