‘मसान’ बॉक्स आॅफिसवर आपटला

कान्स फिल्म फेस्टिव्हलसह आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत राहिलेल्या ‘मसान’साठी पहिला आठवडा काही चांगला नव्हता. पहिल्या तीन दिवसांतील ‘मसान’चा गल्ला पूर्णपणे निराशाजनक ठरला. चित्रपटाने प्रसार माध्यमातून खूप प्रशंसा मिळविली असली तरी बॉक्स आॅफिसवर त्याला कमाई करता आलेली नाही

‘मसान’ बॉक्स आॅफिसवर आपटला
Published: 15 Mar 2016 11:00 PM  Updated: 15 Mar 2016 10:30 AM

कान्स फिल्म फेस्टिव्हलसह आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत राहिलेल्या ‘मसान’साठी पहिला आठवडा काही चांगला नव्हता. पहिल्या तीन दिवसांतील ‘मसान’चा गल्ला पूर्णपणे निराशाजनक ठरला. चित्रपटाने प्रसार माध्यमातून खूप प्रशंसा मिळविली असली तरी बॉक्स आॅफिसवर त्याला कमाई करता आलेली नाही. पहिलाच दिवस त्याच्यासाठी निराशाजनक ठरला व त्याची एकूण कमाई ६५ लाखांची झाली. नंतरचे दोन दिवसही फार काही कमाईचे ठरले नाहीत. आठवडा संपला तेव्हा ‘मसान’ची कमाई १.२५ कोटी रुपयांची झाल्याचे समजते. गंभीर विषयांवरील चित्रपटाचे चाहते ‘मसान’ला पसंती देतील असे वाटले होते, परंतु तसे झालेले नाही. चित्रपट क्षेत्रातील जाणकारांना या चित्रपटाकडून आता फार आशा नाहीत. एवढे सांगता येईल की छोट्या गुंतवणुकीचा हा चित्रपट पुढे आपल्यावर झालेला खर्च वसूल करील, परंतु फार काही नμयाची आशा करण्यात अर्थ नाही. दुसरीकडे ‘बजरंगी भाईजान’च्या यशाचा आलेख दुसºया आठवड्यातही प्रगतीचाच आहे. कमाईचे अनेक विक्रम जमीनदोस्त करणाºया या चित्रपटाने दुसºया आठवड्याच्या शेवटीही बॉक्स आॅफिसवर धुमाकूळ घातला आहे. तीन दिवसांत १०० कोटी रुपयांची सीमा ओलांडणाºया या चित्रपटाने फक्त ९ दिवसांत २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘किक’नंतर २०० कोटींच्या क्लबमध्ये येणारा हा सलमान खानचा दुसरा चित्रपट आहे. सलमान खानच्या कोणत्याही व्यावसायिक चित्रपटाने केलेल्या कमाईचा आकडा ‘बजरंगी भाईजान’ने मागे टाकून नवा इतिहास घडवला आहे. शनिवारी २० कोटी, रविवारी २४ कोटीसह बजरंगीची आतापर्यंतची कमाई ही २४० कोटींची झाली आहे. या आकड्यांकडे बघितले तर बजरंगी आता ३०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये जाण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे दिसते. या चित्रपटाच्या यशाचा आलेख जसजसा वर जात आहे त्यावरून येत्या आठवड्यात चित्रपट ३०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये दाखल होऊ शकतो. ३०० कोटींच्या क्लबमध्ये सध्या आमीर खानच्या ‘पीके’चा समावेश आहे. तिकडे आश्चर्यकारक कमाई करणारा ‘बाहुबली’ सगळ्याच भाषांत आतापर्यंत ४०० कोटी रुपयांचा व्यवसाय करून बसला आहे. ‘बाहुबली’च्या हिंदी आवृत्तीची कमाई आतापर्यंत ९० कोटींपेक्षा जास्त आहे. येत्या शुक्रवारी अजय देवगणचा ‘दृश्यम’ प्रदर्शित होणार आहे. अनेक दाक्षिणात्य भाषांत तयार झालेला ‘दृश्यम’ आता हिंदीतही बनविण्यात आला आहे. अजय देवगणसोबत प्रदीर्घ काळानंतर तब्बू दिसेल. अजय एका कुटुंबवत्सल भूमिकेत दिसेल. दृश्यमचा प्रसार व प्रचार (प्रमोशन) चांगले असून त्याच्याकडून आशाही तेवढ्याच आहेत.


टॉप 5 चित्रपट
♦मसान -  फ्लॉप 
♦बजरंगी भाईजान - सुपरहिट
♦बाहुबली - सुपरहिट
♦सेकंड हँड हसबंड - सुपर फ्लॉप 
♦गुड्डू रंगीला - सुपर फ्लॉप 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :