बाजीरावची घोडदौड कायम

नवीन वर्षात पहिल्या आठवड्यात कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेला शाहरूख खानचा दिलवाले आणि संजय लीला भन्साली यांचा बाजीराव मस्तानी या चित्रपटांना चांगलाच फायदा झाला.

बाजीरावची घोडदौड कायम
Published: 15 Mar 2016 08:50 PM  Updated: 15 Mar 2016 08:20 AM

नवीन वर्षात पहिल्या आठवड्यात कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेला शाहरूख खानचा दिलवाले आणि संजय लीला भन्साली यांचा बाजीराव मस्तानी या चित्रपटांना चांगलाच फायदा झाला. या दोघांमध्ये सध्या चांगलीच टक्कर सुरू आहे. तिसºया आठवड्यातील आकडेवारी बघितली तर बाजीराव मस्तानी चित्रपटाने दिलवालेच्या पुढे मजल मारल्याचे दिसत आहे. बाजीराव मस्तानी चित्रपटाची कमाई १६० कोटी आणि दिलवालेची कमाई १३८ कोटी एवढी झाली आहे. दुसºया आठवड्यातही बाजीरावचीच घोडदौड अधिक असल्याचे दिसून येत आहे. दुसºया आठवड्यात बाजीरावने ७३ कोटी, तर दिलवालेने ५५ कोटी रुपयांची कमाई केली होती. मागील काही दिवसांची आकडेवारी पाहिली तर बाजीरावची कमाई या शुक्रवारी ८.४ कोटी, तर दिलवालेचा व्यवसाय ३ कोटी रुपये एवढा आहे. शनिवारी बाजीरावचा व्यवसाय ५.७० कोटी, तर दिलवालेचा १.९० कोटी इतका आहे. रविवारी बाजीरावची कमाई ८.४० कोटी, तर दिलवालेची ३.७५ कोटी रुपये आहे. तिसºया आठवड्यात बाजीरावने १५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. एवढा पल्ला गाठणे दिलवालेला अवघड जात आहे. गेल्या दोन आठवड्यांत कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित न झाल्याचा फायदा या दोन्ही चित्रपटांना झाला आहे. येत्या शुक्रवारी नवीन वर्षातील पहिलाच चित्रपट वजीर प्रदर्शित होत आहे. यात अमिताभ बच्चन, फरहान अख्तर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विधू विनोद चोप्रा यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत बिजाय नंबियार. चोप्रा यांच्या बॅनरअंतर्गत येणारा नंबियार यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. फरहान अख्तर यांचाही या बॅनरमधील पहिलाच चित्रपट आहे. अमिताभ यांनी चोप्रा यांच्या एकलव्य या चित्रपटात यापूर्वी काम केलेले आहे. फरहानसोबत अदिती राव हैदरी या चित्रपटाची नायिका आहे. जॉन अब्राहम आणि नील नितीन मुकेश हे चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असणार आहेत. बुद्धिबळाच्या खेळावर आधारित या चित्रपटाकडे बॉलीवूडच्या नजरा लागल्या आहेत.

टॉप ५ चित्रपट
  बाजीराव मस्तानी : हिट
  दिलवाले : हिट
  हेट स्टोरी ३ : सरासरी
  तमाशा : सरासरी
४ प्रेम रतन धन पायो : सुपरहिट


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :