Vodka Diaries Movie Review : सस्पेंसचा ओव्हरडोज

Vodka Diaries Movie Review : सस्पेंसचा ओव्हरडोज विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - कलाकार : के.के. मेनन, रायमा सेन, मंदिरा बेदी, शारिब हाशमी
  • निर्माता - कुशाल श्रीवास्तव दिग्दर्शक - कुशाल श्रीवास्तव
  • Duration - १ तास ५८ मिनिटं Genre - थ्रिलर
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Vodka Diaries Movie Review : सस्पेंसचा ओव्हरडोज

जान्हवी सामंत

हा आठवडा थ्रिलर चित्रपटांचा आठवडा आहे. पण हे सर्व थ्रिलर खूपच गोंधळात टाकणारे आणि कंटाळवाणे आहेत. चित्रपट म्हणून ‘वोडका डायरीज्’ हा ‘माय बर्थ डे सॉन्ग’सारखाच गुंतागुंतीचा आहे. या चित्रपटात एसीपी अश्विनी दीक्षितसारखे दमदार पात्र असतानाही चित्रपट प्रेक्षकांना निराश करतो.  

‘वोडका डायरीज्’ची सुरुवात आश्वासक पद्धतीने होते. सुरुवातीलाच एसीपी अश्विनी दीक्षित (के.के. मेनन) हा त्याची पत्नी शिखा (मंदिरा बेदी) हिच्यासोबत सुट्या घालविण्यासाठी आलेला असतो. दोघांचेही एकमेकांवर प्रचंड प्रेम असते. परंतु पोलिसांतील धावपळीच्या नोकरीमुळे अश्विनी दीक्षित पत्नीला वेळ देऊ शकत नाही. दीक्षित ज्यावेळी कामात असतो, त्यावेळी तो त्याच्या पत्नीच्या रोमॅण्टिक कविता ऐकत असतो. सुट्या घालविल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी दीक्षितवर एका तरुण मुलीच्या तिच्याच घरात झालेल्या हत्येच्या तपासाची जबाबदारी येऊन पडते. 

या प्रकरणात त्याला दोन सुगावे लागतात. एक खुनासंबंधीचे पुस्तक असते, तर दुसरा सुगावा सीसीटीव्हीचे फुटेज असते. हे फुटेज वोडका डायरीज् या क्लबमध्ये झालेल्या एका पार्टीचे असते. ज्यात अनेक जोडपे आलेले असतात. चौकशीला सुरुवात होऊन काहीच कालावधी गेलेला असतो तोच दुसºया दिवशी अनेक तरुणांची हत्या झाल्याचे समोर येते. एक हत्या खोलीत झालेली असते. दुसरी हॉटेल बाहेरच्या बर्फात, तर तिसरी हत्या झाडाला शव लटकवून केलेली असते. दीक्षित उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चौकशी करतो. तो या प्रकरणात अधिकाधिक खोलात जाऊन पोहोचतो. एक दिवस त्याला त्याच्या बायकोच्या फोनवरून कॉल येतो अन् समजते की, त्याची बायकोच हरविली आहे. तो धावत घरी जातो आणि तिथे त्याला दिसते की, त्याच्या घरात घरफोडी झालेली आहे. तो परत त्या हॉटेलमध्ये जातो. त्याठिकाणी त्याला हे समजते की, ज्या व्यक्तीने हे खून केलेले आहेत, तीच व्यक्ती त्याच्या बायकोच्या गायब होण्याच्या मागे आहे. पण, चौकशीचे काम थोडेसेच बाकी असताना त्याला असे दिसते की, त्याने ज्या लोकांना मृत पाहिलेले आहे ते सर्व जीवंत आहेत. यातून प्रेक्षकांना दीक्षितच्या विखुरलेल्या मनाची अवस्थेची झलक दिसते. 

मुख्य पात्र रंगविताना के. के. मेननने त्याच्या ठायीची ऊर्जा भरपूर वापरलेली आहे. पण त्याला पटकथेची साथ लाभली नसल्यामुळे तो नशेत आणि त्रस्थ असल्यासारखा वावरताना दिसतो. मंदिराने थोडा फार उत्साह आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण तिचे कविता वाचन तिला काही शोभलेले नाही. दुसरी खटकणारी गोष्ट म्हणजे चित्रपटातील संवाद आहेत. गरज नसताना काव्यात्मकपणा त्यात दिसतो, तर उथळ विनोद चित्रपटाचे गांभीर्य घालवितात. पार्श्वसंगीत सुद्धा सुसंगत नाही. 

चित्रपट जसा पुढे जातो तसा दीक्षित जरी आश्वासक वाटत असला तरी, प्रेक्षकांना त्याची चौकशी कुठल्या दिशेला चालली हेच कळत नाही. आपण नेमके काय बघतोय नायकाचे आयुष्य की, त्याच्या कल्पना हेही उमजत नाही. सत्य काय आणि असत्य काय असे प्रश्न समोर येतात. पण चित्रपटात तुमच्या प्रश्नांना उत्तरे नाहीत. शेवटच्या २० मिनिटांत ज्यावेळी गूढ उकलले जाते, तिथे चित्रपट थोडासा तग धरतो. पण तोपर्यंत चित्रपट प्रेक्षकांच्या डोक्यावरून गेलेला असतो. 

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :