Judwaa 2 Review : पुन्हा एकदा उडणार निखळ आनंदाचे फवारे...

Judwaa 2 Review : पुन्हा एकदा उडणार निखळ आनंदाचे फवारे... विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस, तापसी पन्नू, सलमान खान, अनुपम खेर
  • दिग्दर्शक - डेव्हिड धवन Duration - २ तास ३० मिनिटस
  • Genre - कॉमेडी
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Judwaa 2 Review : पुन्हा एकदा उडणार निखळ आनंदाचे फवारे...

-जान्हवी सामंत

‘चलती है क्या ९ से १२’ असे म्हणत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या  सलमान खानच्या ‘जुडवा’चा रिमेक आज रिलीज झाला. सेम कथानक, सेम संगीत, सेम टपोरीगिरी अन् सेम साजुकपणा दाखविण्यात आलेल्या या चित्रपटात बघायचे तरी काय? असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित केला जात होता. परंतु सलमान खानपेक्षाही काहीशी सरशी एनर्जी आणि फ्रेशनेसपणा असलेल्या वरुण धवनची अदाकारी बघण्यासारखी असून, चित्रपटात नाविण्यता निर्माण करणारी आहे. त्यातच जॅकलीन फर्नाडिस आणि तापसी पन्नूच्या अदा घायाळ करणाऱ्या  असल्याने चित्रपट निखळ आनंद देवून जाईल यात शंका नाही. 

‘जुडवा २’ हा चित्रपट प्रेम आणि राजा (वरूण धवन) या दुहेरी व्यक्तिरेखांवर आधारित आहे. टिपीकल स्टोरीलाईननुसार, जुळी मुलं चित्रपटाच्या सुरूवातीलाच एकमेकांपासून वेगळे होतात. एकीकडे एकजण हसला की, दुसरीकडे दुसरा हसतो. तसेच एक रडला की दुसरा... राजीव मल्होत्रा (सचिन खेडेकर) यांची गँगस्टर चार्ल्स यांच्यासोबत असलेल्या शत्रुत्वामुळे राजा आणि प्रेम या जुळ्या बाळांना वेगळे केले जाते. मुंबईतील एका कोळीण बाईला राजा मिळतो. तर प्रेमला लंडनमध्ये राहणारे एक जोडपे घेऊन जाते. नंतर कथानक पुढे सरकते. दोघे मोठे होऊ लागतात. राजा हा मुंबईत रोजच मारामारी, गुंडागर्दी करत असतो. त्याच्या भागातील गँगस्टर्स त्याला मुंबई सोडायला भाग पाडतात. पासपोर्टच्या मदतीने पप्पू, प्रेम आणि नंदू हे लंडनला रवाना होतात. ‘जुडवा २’ ची कॉमेडी ही मुख्य ‘जुडवा’ पेक्षा फार काही प्रभावी नाही. पण, वरूणचा ‘मैं तेरा हिरो’ प्रेक्षकांमध्ये गाजला कारण चित्रपटातील सर्वांचेच परफॉर्मन्सेस उत्कृष्ट होते. चित्रपटाचे संपूर्ण स्टारकास्ट म्हणजेच अनुपम खेर (जॅकलिनचे वडील), अतुल परचुरे (जॅकलिनचा मामा), पवन मल्होत्रा (इन्स्पेक्टर ढिल्लोन), अली असगर (सायकियाट्रिस्ट), राजपाल यादव (तोतला नंदू) आणि उपासना सिंग (रूपा आंटी) हे चित्रपटात फुल्ल टू कॉमेडीच्या मूडमध्ये दिसतात. 

अशाप्रकारे, प्रेम आणि राजा यांना एकाच वेळी सारख्याच गोष्टींना सामोरे जावे लागते. प्रेमला जर कुणी मारत असेल तर राजाही त्याच्यासमोरच्या व्यक्तीला बेदम मारायला सुरूवात करतो. जर राजा एखाद्या मुलीला किस करत असेल तर प्रेमही सेम तसेच करतो. यामुळे साहजिकच कन्फ्युजन आणि विनोदी परिस्थिती निर्माण होते. थोडक्यात काय तर, ‘जुडवा २’ पूर्णपणे एंटरटेनर आहे. प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करणार यात काही शंका नाही. प्रेक्षकांना जुन्या छपरी आणि छिछोरा या दोन्ही कन्सेप्टचा पुन्हा एकदा यानिमित्ताने अनुभव घ्यायला मिळाला. ‘जुडवा २’ मध्ये एक गोड भावनिक वळण कथानकाला मिळाले आहे. अर्थात याचे श्रेय दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि संगीतकार अनु मलिक यांना जाते. हे नवे वळण त्यांना जुडवा मध्ये लक्षात आले नाही पण त्यांनी ते ‘जुडवा २’ मध्ये प्रेक्षकांच्या समोर आणले आहे. संगीतकार अनु मलिक यांनी ९०च्या दशकातील संगीत आणि मूड निर्माण करायला बरीच मेहनत घेतलेली दिसून आली. चित्रपटाचा पहिला भाग हा पूर्णपणे एंटरटेनिंग असून दुसरा भाग केवळ मध्यंतरापासून ओढल्यासारखा वाटतो. पण, एकंदरित काय तर धम्माल मुव्ही बघायलाच हवा.

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :