Tubelight Movie review :​ नावाप्रमाणेच ‘ट्यूबलाईट’!!

Tubelight Movie review :​ नावाप्रमाणेच ‘ट्यूबलाईट’!! विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - सलमान खान,माटिन रे,सोहेल खान आणि चीनी अभिनेत्री झू झू
  • निर्माता - सलमान खान प्रोडक्शन दिग्दर्शक - कबीर खान
  • Duration - 2 तास Genre - ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Tubelight Movie review :​ नावाप्रमाणेच ‘ट्यूबलाईट’!!

 - जान्हवी सामंत

सलमान खानचा चित्रपट म्हटल्यावर उत्सुकता असणे साहजिक आहे. ‘बजरंगी भाईजान’नंतर सुपरस्टार सलमानकडून चाहते वेगळ्या अपेक्षा करू लागलेत. विशेष म्हणते,तीच ती मारामारी, गुंडागर्दी असे  चित्रपट कदाचित सलमानलाही नकोसे वाटू लागलेत. काहीतरी हलके-फुलके, कुटुंबासोबत बघता येतील, असे चित्रपट सलमान निवडू लागलाय. ‘ट्यूबलाईट’ हा सुद्धा याच रांगेत बसणारा ‘बजरंगी भाईजान’नंतरचा सलमानचा आणखी एक चित्रपट. अर्थात ‘बजरंगी भाईजान’पेक्षा ‘ट्यूबलाईट’ हटकेच म्हणायला हवा. अर्थात अगदी चित्रपटाच्या नावाप्रमाणेच याचा ‘ट्यूबलाईट’ ‘आॅन’ व्हायला जरा वेळ लागतो. 
लक्ष्णम(सलमान खान) हे चित्रपटाचे मध्यवर्ती पात्र. लक्ष्मण लहानपणापासून अगदी साधाभोळा मुलगा असतो. थोडासा ‘ढ’ असल्यामुळे गावातले सगळे त्याला ‘ट्यूबलाईट’ म्हणून हाक मारतात. याच ‘ट्यूबलाईट’चे आपल्या लहान भावावर (सोहेल खान)जीवापाड प्रेम असतं. लहान भाऊ भरतही लक्ष्मणला जीवापाड जपत असतो. लोकांच्या हेटाळणीपासून लक्ष्मणला दूर ठेवण्यासाठी धडपडत असतो.
भारत-चीन युद्धादरम्यान भरत भारतीय सैन्यात दाखल होता आणि इकडे लक्ष्मण एकटा पडतो. नेमक्या त्याचसुमारास लक्ष्मणच्या जगतपूर गावात मायलेकाचे एक चीनी कुटुंब राहायला येते. (चीनी अभिनेत्री झूझू आणि बालकलाकार मार्टिन रे टंगू या दोघांनी यात माय-लेकाची भूमिका साकारली आहे.)चीनसोबत सुरु असलेल्या युद्धामुळे गावकºयांची या कुटुंबावर नजर असते. पण गांधीजींच्या आदर्शांवर जगणारा लक्ष्मण या कुटुंबाशी मैत्री करून सगळ्या गावाशी शत्रुत्व ओढवून घेतो.‘ जर तू भारतीय असशील तर भारत माता की जय का म्हणत नाहीस?’, असे लक्ष्मण छोट्या चीनी गुओला(मार्टिन रे टंगू) विचारतो. त्यावर ‘तू सांगतोस म्हणून मी भारत माता की जय म्हणू का? तुझ्यापेक्षा ओरडून म्हटल्याने मी काय तुझ्यापेक्षा मोठी भारतीय होईल?’ असा प्रतिप्रश्न गुओ लक्ष्मणला करतो. याचदरम्यान युद्धाच्या काही दृश्यांचा मारा होतो आणि इथून पुढे कथेला एक वळण मिळते. युद्धाच्या देशाच्या सीमेवर लढावयास गेलेला भरत  परत येत नाही. त्याचे आपल्यासोबत नसणे लक्ष्मणच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी देऊन जाते. याच वळणावर माटिन रे तंगू (गुओ) आणि झू झू यांच्या भूमिका अधोरेखित होतात.

चित्रपटाच्या कथेत फार ड्रामा नाहीच. पूर्वाधात चित्रपट एकाच मार्गाने जातो. पण साधी कथा, संथ सुरूवात याऊपरही या भागातील हलका फुलका विनोद आपल्याला खिळवून ठेवतो. वेंधळा, भोळा-भाबडा सलमान  मनाला भावतो. अर्थात उत्तरार्धात मात्र लक्ष्मणची कथा बरीच लांब आणि कंटाळवणी वाटायला लागते. नाही म्हणायला अधून मधून काही दृश्ये चित्रपटाला ट्रॅकवर आणतात. पण आधी म्हटल्याप्रमाणे ‘ट्यूबलाईट’ ‘आॅन’ व्हायला वेळ लागतो.
सलमान, सोहेल आणि झिशान आयुब हे तिघेच या चित्रपटाचा प्राण आहेत. यांच्याशिवाय अन्य कलाकारांच्या वाट्याला फार काहीही काम नाहीय. चीनी अभिनेत्री झू झू हिच्या वाट्यालाही फार मोठी भूमिका नाही. पण तिच्या मुलाची भूमिका साकारणाºया चिमुकल्या गुआने मात्र अफलातून अभिनय केलाय.
देशात सध्या सुरु असलेल्या राष्ट्रीयत्व, राष्ट्रप्रेमाच्या वादावर दिग्दर्शक कबीर खान याने या चित्रपटातून बरेच रोखटोक विचार मांडले आहेत.  जे भारतीय दिसत नाहीत, त्यांना आपल्या भारतीय असण्याचा अधिक पुरावा द्यावा लागतो, अशा परखड शब्दांत स्वत:ची काही निरीक्षणे त्याने नोंदवली आहेत. आपल्या देशाच्या भवितव्यासाठी ‘विश्वास’ खूप महत्त्वाचा आहे, असा संदेश हा चित्रपट देतो.

 
 

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :