Tera Intezaar Movie Review:भरकटलेल्या कथेत फक्त सनी लिओनीचा जलवा

Tera Intezaar Movie Review:भरकटलेल्या कथेत फक्त सनी लिओनीचा जलवा विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - सनी लिओनी,अरबाज खान, सलील अंकोला,गौहर खान, आर्या बब्बर आणि सुधा चंद्रन
  • निर्माता - अमन मेहता आणि बिजल मेहता दिग्दर्शक - राजीव वालिया
  • Duration - 2 तास Genre - रोमँटिक थ्रिलर
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Tera Intezaar Movie Review:भरकटलेल्या कथेत फक्त सनी लिओनीचा जलवा

सुवर्णा जैन

सनी लिओनी म्हटलं की रसिकांच्या काळजाची धडकन. तिच्या मादक अदा, बोल्ड अंदाज आणि दिलखेचक नृत्य यामुळं रसिक सारं काही विसरुन जातात. त्यामुळेच सनीच्या 'तेरा इंतजार' या सिनेमाची रसिकांना उत्सुकता होती. तेरा इंतजार हा सिनेमा हा एक म्युझिल रोमँटिक थ्रिलर सिनेमा आहे. यांत सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय सलील अंकोला,गौहर खान, आर्या बब्बर आणि सुधा चंद्रन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सिनेमात सनी तिच्या नेहमीच्या अंदाजात पाहायला मिळेल तर अरबाज खानसह ती पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकली आहे.सिनेमाची कथा ही रौनक (सनी) आणि राजीव (अरबाज)ची आहे. राजीव हा एक चित्रकार असून रौनक ही आर्ट गॅलरीची मालकीण आहे. रौनकला न पाहता राजीव तिचं चित्र काढतो जे हुबेहूब तिच्यासारखंच असतं. हे चित्र पाहून रौनकसुद्धा चक्रावून जाते. याबाबत रौनक त्याच्याकडे विचारणा करते. माझ्या स्वप्नात एक मुलगी येते आणि तिची छबी कॅनव्हासवर चितारल्याचे तो तिला सांगतो. इथूनच रौनक आणि राजीवच्या लव स्टोरीला सुरुवात होते. दोघांमध्ये एक वेगळं प्रेमाचं नातं निर्माण होतं. मात्र त्याचवेळी दोघांच्या लव स्टोरीमध्ये ट्विस्ट येतो. अचानक राजीव गायब होतो. त्यावेळी आपल्या प्रेमाच्या शोधात रौनक निघते. त्यावेळी रौनकला अनेक संकटं आणि अडचणींचा सामना करावा लागतो. काही जण तिच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की रौनकचा तिच्या आजूबाजूच्या लोकांवरुनही विश्वास उडून जातो.शोधाशोध सुरु असतानाच रौनकला राजीवची हत्या झाल्याचे समजते.त्यावेळी संकटात असणा-या रौनकला वाचवण्यासाठी राजीवची आत्मा येते आणि तिचं रक्षण करण्यासोबतच आपली हत्या करणा-यांचा बदला घेते.आता राजीवची हत्या कुणी आणि का केली?, रौनकला कोण आणि का त्रास देते? रौनकला तिचे प्रेम पुन्हा मिळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेरा इंतजार या सिनेमातून मिळतील. या सिनेमात सनी लिओनीचा हॉट अंदाज तुम्हाला क्लीन बोल्ड करेल. सिनेमातील सनीच्या मादक अदांची जादू थिएटरमध्ये तुम्हाला तुमच्या सीटवरच खिळवून ठेवेल. तिनं पुन्हा एकदा सिनेमात दिलेले इंटिमेट सीन्स हा सिनेमाचा यूएसपी म्हणावा लागेल. अरबाज ब-याच कालावधीनंतर मुख्य भूमिकेत पाहायला मिळतोय. सिनेमात त्याने पहिल्यांदाच सनीसह स्क्रीन शेअर केली असून हॉट सीन देताना अरबाजचा अवघडलेपणा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतो.मात्र त्याची सगळी कसर सनीने आपल्या सेक्सी अदांनी भरुन काढली आहे.सनीने फक्त हॉट सीनच दिले नाही तर अरबाजकडून रोमँटिक सीन्स करुन घेतल्याचे दिसून येते.बोल्ड सीन्सशिवाय डान्स नंबर मधूनही सनीचा जलवा पाहायला मिळतो. सेक्सी बार्बी गर्लमधील तिच्या अदा कुणालाही घायाळ करतील.सिनेमात अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी सनीला संकटकाळी मदत करणा-या व्यक्तीची भूमिका साकारलीय.रौनकला तिचे प्रेम मिळवून देण्याच्या संघर्षकाळात ती साथ देते.दुसरीकडे आर्या बब्बरने निगेटिव्ह शेड असलेली भूमिका साकारली आहे.याशिवाय सलील अंकोला आणि गौहर खान यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. उडणारी कार,आपोआप साकारलं जाणारं चित्र ही दृष्य मोठ्या खुबीने दाखवण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे.ही दृष्य पाहून तुमचा थरकाप उडेल. सिनेमाचं चित्रीकरण आकर्षक लोकेशन्सवर करण्यात आलं असून यांत परदेशातील ठिकाणांचाही समावेश आहे.ही आकर्षक लोकेशन्स तुम्हाला सनी इतकीच भावतील.सिनेमाचं संगीतही तितकंच श्रवणीय असून ही गाणी सहज ओठावर रुळतील.मात्र सिनेमाच्या कथेत काही वेगळेपण नसल्याने तुमचा भ्रमनिरास होईल.ही सगळी कसर फक्त आणि फक्त सनी लिओनी भरुन काढण्यात यशस्वी ठरली आहे.त्यामुळे सनीच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा ट्रीट असेल.सनीच्या हॉट आणि मादक अदा पाहायच्या असतील तर हा सिनेमा नक्की पाहू शकता. 

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :