Secret Superstar Movie Review:सुपरस्टार जायरा वसीमचा थक्क करणारा प्रवास

Secret Superstar Movie Review:सुपरस्टार जायरा वसीमचा थक्क करणारा प्रवास विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - आमीर खान, जायरा वसीम, मेहर विज, राज अर्जुन
  • निर्माता - किरन राव दिग्दर्शक - अव्दैत चंदन
  • Duration - 2.35 Genre - ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Secret Superstar Movie Review:सुपरस्टार जायरा वसीमचा थक्क करणारा प्रवास

गेल्या अनेक दिवसांपासून आमीर खानच्या सीक्रेट सुपरस्टार चित्रपटाची चर्चा होती. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने त्याच्या तारे जमीनपर चित्रपटाप्रमाणे यात ही एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.  आमीरच्या दंगल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेल्या जायरा वसीमभवती या चित्रपटाची कथा फिरते.  जायराने यात 15 वर्षांच्या इंसिया बनी नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. इंसिया वडोदऱ्यात आपल्या कुटुंबीयांसोबत राहत असते.  इंसियाचे स्वप्न असते गायिका होण्याचे. इंसियाला रिअॅलिटी शोमध्ये भाग घेऊन जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायचे असते. मात्र यागोष्टीसाठी तिच्या वडिलांचा तिला विरोध असतो. इंसिया आपल्या आईच्या खूप जवळ असते. इंसियाच्या आईची भूमिका मेहर विजने साकारली आहे. इंसियाची आई लेकीचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आपला हार विकते आणि इंसियाला एक लॅपटॉप विकत घेऊन देते. इंसिया या लॅपटॉपच्या मदतीने युट्यूबवर आपले एक चॅनल सुरु करते. या युट्यूबवर आपली गाणी अपलोड करते. मात्र आपल्या वडिलांपासून ही गोष्ट लपवण्यासाठी ती बुरखा घालून तसेच आपल्या नावाचा कुठेही उल्लेख न करता ही गाणी अपलोड करते. हळूहळू इंसियाची गाणी लोकांना आवडू लागतात आणि एकदिवस तिचे हे चॅनल सीक्रेट सुपरस्टारच्या नावाने फेमस होते.      


इंसियाचा आवाज ऐकून तिला एका संगीतकाराचा फोन येतो. तो फोन असतो संगीतकार शक्ती कुमार याचा (आमीर खान) मात्र इंसिया याकडे फारसे लक्ष देते नाही. याचित्रपटातील आमीर खानचा लूक फारच हटके आहे. आमीरच्या फॅन्सना तो नक्कीच सरप्राईज करेल. यानंतर इंसियाच्या आयुष्यात एक वेगळेवळण येते. तिच्या वडिलांची सौदी अरेबियाला बदली होते. मात्र इंसियाला तिकडे जायचे नसते. तिच्या आईवर होणाऱ्या अत्याचारांपासून तिला बाहेर काढायचे असते. शक्तीने दिलेली ऑफर इंसिया स्वीकारते आणि ते गाणं सुपरहिट होते.यानंतर इंसिया आपले गायिका होण्याचे स्वप्न पूर्ण करु शकते का ?, आपल्या आईला न्याय मिळवून देऊ शकते का? या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. 

जायराने इंसियाचे पात्र अतिशय सशक्तपणे पडद्यावर साकारले आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून अव्दैत चंदनने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. इंसिया वडिलांची भूमिका राज अर्जुनने अत्यंत चोखपणे साकारली आहे. मात्र चित्रपटच्या संगीतबदल बोलायचे झाले तर ते मनाला फारसे भावत नाही. इंसियाचा गायिका बनण्याचा संघर्षमय प्रवास बघण्यासाठी नक्कीच एकदा हा चित्रपट  पाहा.

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :