film review : ‘रनिंग शादी’ म्हणजे निराशा!

film review : ‘रनिंग शादी’ म्हणजे निराशा! विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - तापसी पन्नु, अमित सध,अर्श बाजवा
  • निर्माता - शूजित सरकार दिग्दर्शक - अमित रॉय
  • Duration - 2 तास 13 Genre - कॉमेडी
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

film review : ‘रनिंग शादी’ म्हणजे निराशा!

-जान्हवी सामंत

‘पिंक’फेम तापसी पन्नू आणि अमित साध यांच्या ‘रनिंग शादी’ या चित्रपटाची बरीच प्रतीक्षा होती. ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर या चित्रपटाच्या नावाला कात्री लावली गेली. ‘रनिंग शादी डॉट कॉम’हे नाव बदलून ‘रनिंग शादी’ असे चित्रपटाचे नवे नामकरण करण्यात आले. या नव्या नावासह ‘रनिंग शादी’आज(१७ फेबु्रवारी) प्रदर्शित झाला. तापसी पन्नू या चित्रपटात एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत असल्याने तिच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून बरीच अपेक्षा होती. पण दुर्दैवाने चाहत्यांच्या अपेक्षेवर चित्रपट कुठेही खरा उतरत नाही.

 ‘रनिंग शादी’ एक निराश करणारा चित्रपट आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. सुरूवातीलाच हे सांगण्याचे कारण, काही चार-दोन विनोदी दृश्ये यापलीकडे या चित्रपटात काहीही नाही. चित्रपटात कुठलाही माल-मसाला तर नाहीच. शिवाय अभिनय आणि पटकथेच्या बाबतीतही यात काहीही दम नाही.
भरोसे(अमित साध) हा एक गोड चेहºयाचा एका साडीच्या दुकानातला सेल्समन. या साडी दुकानदाराच्या मालकाची मुलगी म्हणजे निम्मी(तापसी पन्नू). भरोसे  निम्मीची मदत करतो आणि मग काय, भरोसे निम्मीच्या फुल टू प्रेमात पडतो. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला निम्मीला ती तिच्या शाळेच्या कुण्या मित्रापासून प्रेग्नंट असल्याची भीती वाटू लागले. ती भरोसेला मदत मागते. भरोसे तिला क्लिनिकमध्ये घेऊन जातो. निम्मीचे काम होते आणि इथून भरोसे हा तिचा अगदी भरवशाचा मित्र बनतो. यानंतर निम्मी कॉलेजात पाऊल ठेवते. कॉलेजात नव-नव्या मित्रांसोबत निम्मीची अशी काही गट्टी जमते की ती भरोसेला टाळू लागते. निम्मी आपल्या पारड्यात बसणारी नाही, हे तोपर्यंत भरोसेला पुरते कळून चुकते. त्यामुळेच कुटुंब निवडेल अगदी त्याच मुलीशी लग्न करण्याची मनाची तयारी तो करून घेतो. याचदरम्यान सेल्समनची नोकरी सोडून भरोसे सरबजीत उर्फ सायबरजीत (अर्श बाजवा) या मित्रासोबत मिळून ‘रनिंग शादी’ ही बेवसाईट सुरु करतो. घरातून पळून जाणाºया कपल्सचे लग्न लावून देणारी ही वेबसाईट बरीच लोकप्रीय होते, तशीच चित्रपटाची कथाही पुढे सरकते. तोपर्यंत निम्मी पुन्हा एकदा भरोसेच्या जवळ येते. केवळ जवळच येत नाही तर त्याच्यासोबत लग्नाची योजना बनवून घरातून पळूनही जाते. पण याचवेळी भरोसेला त्याने त्याच्या बिहारी मामूला दिलेले वचन आठवते. तो मामूशी बोलून त्यांच्या आवडीच्या मुलीशीच लग्न करण्याचा निर्णय घेतो. पुढे या कथेत अनेक टिष्ट्वस्ट येतात.
तापसी पन्नूने या चित्रपटात स्वत:चे काम काढून घेण्यासाठी लोकांचा वाट्टेल तसा वापर करणाºया स्वार्थी मुलीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे या चित्रपटात तिच्या वाट्याला फार कमी सहानुभूती येते. अमित साध ‘भरोसे’च्या रूपात गोड वाटत असला तरी निम्मीपुढे जरा जास्तच दुबळा वाटतो. यामुळे त्याच्या वाट्याला थोडीफार सहानुभूती येते. पण चित्रपटची भटकणारी पटकथा या सगळ्यांवरच पाणी फेरते. चित्रपट क्षणाक्षणाला भरकटतो.

पहिल्या हाफमध्ये दिसते ते केवळ निम्मीचे पंजाबी कुटुंब. त्यामुळे हा फर्स्ट हाफ संयमाची परिक्षा म्हणावी इतका लांबतो. सेकंड हाफमध्ये चित्रपटाची कथा भरोसेच्या कुटुंबाकडे वळते. काही सहाय्यक कलाकारांच्या अभिनयामुळे हा भाग तुलनेने बराच सुसह्य वाटतो. पण कथेत दम नसल्याने एका क्षणाला सगळेच कंटाळवाणे वाटते. भरोसे निम्मीसारख्या स्वार्थी मुलीच्या प्रेमात का पडतो? निम्मी भरोसे सारख्या खेडूत(ज्याला सूसू केल्यानंतर हात धुवायचे सांगावे लागते) मुलात पे्रमात पडण्याजोगे काय पाहते? हे सगळेच आकलनापलिकडचे जरणवते. निम्मी व भरोसेच्या कुटुंबामधील पराकोटीची दरी मिटणे,हेही मेंदूला पटत नाही. एकंदर काय तर चित्रपट अखेरपर्यंत आपल्या संयमाची परीक्षा घेतो. सरतेशेवटी काय तर, असा चित्रपट टाळलेलाच बरा.

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :