Rukh Movie Review:नातेसंबंधांची सरळ साधी कथा

Rukh Movie Review:नातेसंबंधांची सरळ साधी कथा विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - मनोज वाजपेयी,स्मिता तांबे,कुमुद मिश्रा,आदर्श गौरव
  • निर्माता - मनीष मुद्रा दिग्दर्शक - अतनु मुखर्जी
  • Duration - 2 तास Genre - थ्रीलर
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Rukh Movie Review:नातेसंबंधांची सरळ साधी कथा

'रुख' या शब्दाचे विविध अर्थ आहेत.वेवगवेगळ्या पद्धतीने हा शब्द वापरला जातो. रुख म्हणजे दिशा असाही एक अर्थ असतो. शिवाय अॅटिट्यूड आणि चेहरा याचं वर्णन करतानाही रुख हा शब्दप्रयोग केला जातो. रुख हा अतनु मुखर्जी यांचा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न आहे. कुटुंबातील नातेसंबंधांवर प्रकाशझोत टाकणा-या सिनेमाची कथा साधी आणि सरळ आहे. मुंबईत दिवाकर माथुर (मनोज वाजपेयी) पत्नी (स्मिता तांबे) सह राहत असतो. एका फॅक्टरीमध्ये दिवाकर हा रॉबिन (कुमुद मिश्रा) सह पार्टनर असतो. मात्र अचानक एके दिवशी रस्ते अपघातात दिवाकरचा मृत्यू होतो.वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच बोर्डिंगमध्ये राहणारा त्याचा १८ वर्षीय लेक ध्रुव (आदर्श गौरव) आपल्या आई आणि आजीकडे राहण्यास येतो. त्याचदरम्यान दिवाकरचा मृत्यू हा अपघाती नसून त्यामागे बरीच कारणं असून काहीतरी काळंबेरं असल्याची कुणकुण ध्रुवला लागते आणि या सिनेमाच्या कथेत नवा ट्विस्ट येतो. त्यामुळंच आपल्या वडिलांच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्यासाठी ध्रुवचा संघर्ष सुरु होतो. त्याच्या या लढाईत त्याला जवळच्या मित्रांची आणि व्यक्तींची साथ लाभते. अखेर ध्रुवच्या या संघर्षाचं काय होतं, दिवाकरच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्यात तो यशस्वी होतो का या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला या सिनेमा पाहताना मिळतील. 

रुख या सिनेमाची कथा साधी,सरळ आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली आहे. एकामागून एक समोर येणा-या धक्कादायक गोष्टी यामुळे रुख आणखी रंजक वाटू लागतो ही सिनेमाची जमेची बाजू. दिग्दर्शकाने आपल्या पहिल्याच प्रयत्नात दिग्दर्शनाची चुणूक दाखवलीय. लोकेशन्स, कॅमेरा वर्क सारं काही तुम्हाला तुमच्या सीटवर खिळवून ठेवेल. बाप-लेकाचं नातं साध्या पद्धतीने दाखवलं असलं तरी त्यात वेगळीच जादू अनुभवण्यास मिळते. मनोज वाजपेयीचं मुलावर असलेलं प्रेम आणि लेकाचं म्हणजेच आदर्श गौरवचं वडिलांवर असलेलं प्रेम मोठ्या खूबीनं दाखवण्यात आलंय. आईचं प्रेम दाखवण्यातही दिग्दर्शकानं कोणतीही कसर सोडलेली नाही.तेही तितक्याच गहि-या पद्धतीने दाखवण्यात आलंय.सोबतच ध्रुवच्या संघर्षाला मित्रांचीही साथ लाभते.त्यामुळे नातेसंबंध दाखवणारा 'रुख' असंही या सिनेमाबद्दल म्हणता येईल. 

अभिनयाच्या बाबतीत मनोज वाजपेयीनं त्याच्या वाट्याला आलेली दिवाकर म्हणजेच वडिलांची भूमिका मोठ्या खूबीने साकारली आहे.या भूमिकेतील मनोज वाजपेयीचा अभिनय म्हणजे सिनेमाची मोठी जमेची बाजू. स्मिता तांबेनं जीव ओतून भूमिका साकारत आईच्या भूमिकेला पूरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.आदर्श गौरवने साकारलेली मुलाची भूमिका पाहून कुणालाही त्याचं कौतुक करावसंच वाटेल.कुमुद मिश्रा आणि इतर कलाकारांचे छोटे मात्र तितकेच प्रभावी आणि तगडे परफॉर्मन्स पाहायला मिळतात.कथानुरुप कलाकारांची निवड योग्यरित्या झाली आहे असंच म्हणता येईल.सिनेमातील दोन गाणी 'है बाकी' आणि 'खिडकी' कथेला साजेशी अशीच आहेत. संगीतही तितकंच प्रभावी असून त्यामुळे कथेशी चटकन कनेक्ट होता येतं. 

सिनेमात बॉलिवूड सिनेमांचा मसाला नसून गंभीर गोष्टींना घेऊन रुखचं कथानक पुढे सरकतं ही बाब रसिकांना खटकू शकते.सिनेमाचा वेग खूपच धीमा आहे असं तुम्हाला राहून राहून वाटेल.सिनेमाच्या एडिटिंग दरम्यान कथेला आणखी क्रिस्प करण्याचा नक्कीच वाव होता.सिनेमाची कथा साधी सरळ आहे मात्र त्या कथेत सस्पेन्स आला असता तर रुख आणखी रंजक नक्कीच झाला असता.रुख हा कमी बजेटचा सिनेमा असून सिनेमा आणि कथेच्या मर्यादा दिग्दर्शक तसंच निर्मात्यांना माहिती आहेत.आता 'गोलमाल अगेन' सुपरडुपर हिट,'सिक्रेट सुपरस्टार'ची जादूही कायम असताना तसंच या आठवड्यात रिलीज होणा-या 'जिया और जिया' या सिनेमाचे पर्याय असताना रसिक 'रुख'कडे 'रुख' करणार का हे पाहणं रंजक ठरेल. 

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :