नो सन'सनी' विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - सनी लिओनी, रजनीश दुग्गल
  • निर्माता - राजीव चौधरी दिग्दर्शक - राजीव चौधरी
  • Duration - रोमान्स आणि थ्रिलर Genre - 2 तास
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

नो सन'सनी'

जान्हवी सामंत 
 
खरे सांगयाचे तर 'बेइमान लव्ह' या चित्रपटाला परीक्षणची अजिबातच गरज नाही आहे. चित्रपटाच्या निर्मात्याला व्यवस्थित ठाऊक आहे की, या चित्रपटाचा युएसपी सनी लिओनीच आहे आणि त्यामुळे चित्रपटात तिचा जास्तीत जास्त वावर असणे गरजेचे आहे. त्यानुसारच त्याने चित्रपटाचा फोकस हा अतिशय टाईट, हॉट, कमीत कमी कपडे घातलेल्या सनीवरच ठेवला आहे. या चित्रपटाची सगळी कथा ही सनी लिओनीभोवतीच फिरते.  
 
'बेइमान लव्ह' या चित्रपटाची गोष्ट आहे मल्होत्रा कुटुंबाची. मल्होत्रा कुटुंबाचा व्यवसाय सुनैना (सनी लियोनी) या मुलीमुळे तोट्यात जातो. ती पूर्वी त्यांच्याकडे कामाला असते. ती त्यांच्या सगळ्या क्लाईंट्सना चांगल्याप्रकारे ओळखत असल्याने ती सगळ्या क्लाईंट्सना तोडते. पण त्यांचाच मुलगा राज (रजनीश दुग्गल) सुनैनाच्या प्रेमात वेडा झालेला असतो. या नंतर चित्रपटात आपल्याला फ्लॅशबॅक पाहायला मिळतो. फ्लॅश बॅकमध्ये राज हा एक प्लेबॉय दाखवलेला असतो. तो अतिशय निष्काळजी आणि आळशी असतो. एका पबमध्ये तो सुनैनाचा विनंयभग करण्याचा प्रयत्न करतो. सुनैना ही एक चांगली मुलगी असते. ती राजच्या या कृत्याबद्दल त्याच्या श्रीमुखात वाजवते. सुनैनाने आपला अपमान केल्याबद्दल राज तिच्यावर सूड उगवण्याचे ठरवतो. सुनैना त्याच्याच ज्वेलरी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत असते. तो केवळ सुनैनाला पाहाण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये रोज जातो आणि तो एक स्मार्ट बिझनेसमॅन असल्याचे तिला भासवतो. तो आपल्या मेहुण्यासोबत सुनैनाला 10 दिवसांच्या आत पटवण्याची पैजदेखील लावतो. सुनैना ही अतिशय मेहनती मुलगी आहे याची राजला चांगलीच कल्पना असते. त्यामुळे तोही उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबून काम करू लागतो. तसेच ऑफिसमधल्या इतर कर्मचाऱ्यांशी प्रेमाने वागायला लागतो. राजच्या अशा वागण्यामुळे सुनैना अतिशय प्रभावित होते. सुनैनाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी राज तिला आपल्या मढ आयलंडवरील बंगल्यावर बोलवतो, मात्र त्यावेळी तिथे राजचे आई-वडील पोहोचतात आणि राज आणि सुनैनाला रंगेहाथ पकडतात. राज आणि सुनैनाला एकत्र पाहून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत असे राजच्या घरातल्यांना वाटते आणि ते त्यांचे लग्न करण्याचे ठरवतात. पण साखरपुड्याला आलेल्या पाहुण्यांपैकी एकजण सुनैनाची आई बार डान्सर होती तसेच ती वेशाव्यवसायही करायची असा आरोप तिच्यावर लावतो. यावेळी राज हा साखरपुडा फक्त सुनैनावर सूड उगवण्यासाठी करत असल्याचे कबूल करतो आणि साखरपुडा मोडतो. हे घडल्यानंतर राजचे कुटुंबीय सुनैनाच्या आईला आणि तिला तिथून हाकलून लावतात. हा घडलेला प्रकार सहन न झाल्यामुळे सुनैनाची आई आत्महत्या करते. यानंतर मग सुनैना राजचा बदला घेण्याचे ठरवते आणि स्वत:ची कंपनी सुरू करते. मल्होत्रा कुटुंबाचे सगळे क्लाईंट्स आपल्याकडे खेचून घेते. तुम्हाला वाटेल चित्रपटाची कथा इथेच संपली. पण तसे होत नाही. राजचे वडील राजचे लग्न सुनैनापेक्षाही कमी कपडे घालणाऱ्या मुलीशी ठरवतात. पण राज आपल्या होणाऱ्या बायकोला एका परपुरुषाबरोबर बेडरूममध्ये पाहतो आणि यावरून सुनैना ही अतिशय चांगली मुलगी होती अशी त्याला जाणीव होते आणि तो सुनैनाकडे परत जातो. तिच्यासोबत राहायला लागतो. मात्र सुनैनाच्या मनात सूडाची भावना असते.'बेइमान' लव्ह हा सुरुवातीपासूनच कंटाळवाणा चित्रपट आहे. अतिशय रटाळ आणि घिसेपीटे संवाद आणि एक डझनभर लव्ह सीन यात आहेत. पण असे असूनही त्याला आपण हॉट दृश्य म्हणू शकत नाही. सनीचे अभिनय कौशल्य अत्यंत मर्यादित आहे हे आपल्याला माहीतच आहे. मात्र चित्रपटातील इतरांचा अभिनय पाहून या सर्वांमध्ये सनीचा अभिनय उजवा वाटतो. वासरात लंगडी गाय शहाणी असेच काहीसे म्हणावे लागले. सनी लिओनीचा स्टार पॉवरही या चित्रपटाला वाचवू शकलेला नाही. खरे सांगायचे झाले तर सनी लिओनीला सोडले तर हा चित्रपट अतिशय हलक्या दर्जाचा सी-ग्रेड चित्रपट ठरला असता. अगदी सहजपणे तुम्ही हा चित्रपट टाळू शकता.

RELATED VIDEOS

RELATED PHOTOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :